दिवाळीपासून पुण्यात एकंदरीत मस्त वातावरण असतं. हवा चांगली असते. सणासुदीचे, सुट्ट्यांचे दिवस असतात आणि त्यात सवाई, पुणे मॅरेथॉन, पिफ सारखे वार्षिक कार्यक्रम येतात. गेल्यावर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ ला हजेरी लावली. अनुभव इतका सुंदर होता की ह्या वर्षी जायचं हे ठरलेलं होतच. गेल्यावर्षीचा कंपू यंदाही होता. ठरवाठरवी करता फोन, एसएमएस च्या जोडीला यंदा 'व्हॉट्स अॅप' ही आलं होतं. त्यावर तर ग्रुप करून जोरदार चर्चा वगैरे झडल्या. सकाळी उठून आवरून धावतपळत थिएटरला पोचायचं. लोकं वेळेत भेटली तर सगळे मिळून अन्यथा एकट्याने किंवा असतील तितक्यांनी मिळेल तिथे बसून सिनेमा पहायचा. मग बाहेर येऊन पुन्हा रांगेत लागायचं, मधल्या ब्रेकमध्ये मिळेल ते खाऊन घ्यायचं असं ते रूटीन. नंतर लोकं साग्रसंगीत डबे घेऊन यायला लागले होते. एकदा दिवसातल्या शेवटच्या सिनेमाच्या आधी इतकी भुक लागली की मी, चिन्मय, श्यामली आणि मिनू अश्या चौघांनी मिळून श्यामलीच्या डब्यातली अर्धी पोळी आणि वांग्याची भाजी आणि मिनूच्या पर्समधलं एक सफरचंद आणि एक पर्क वाटून खाल्लं! शिवाय चिन्मयने जवळच बसलेल्या त्याच्या ओळखीच्या एका काकूंना तुमच्याकडे काही खायलं आहे का? असंही विचारून पाहिलं !
यंदाच्या वर्षी आम्हांला गेल्यावर्षीप्रमाणे संक्रांतीची सुट्टी नव्हती. त्यामुळे मी एक दिवस सुट्टी घेऊन टाकली. 'पिक्चर बघण्यासाठी सुट्टी' ही कारण मलाच गंमतशीर वाटलं.
पिफचं आयोजन यंदाही गेल्यावर्षीसारखच होतं. अतिप्रोफेशनल नाही की ढिसाळही नाही. फक्त यंदा प्रत्येक सिनेमानंतर हॉल रिकामा करायचा होता. त्यामुळे त्याच हॉलमध्ये पुढचा सिनेमा पहायचा असला तरी तिथेच डेरा टाकून बसता येत नव्हतं. 'जागा अडवून ठेऊ नका' असं आयोजकांनी वारंवार सांगूनही अनेक जण ते करताना दिसत होते. एका ज्ये.ना. काकूंनी कोणासाठीतरी जागा अडवून वर आमच्याशीच भांडण केलं. शिवाय जब्बार पटेल, समर नखाते वगैरे मंडळींना एकेरीत संबोधून आपण फार मोठ्या असल्याच्या बतावण्याही केल्या!
ह्यावर्षी मी गेल्यावर्षीपेक्षा एक जास्त म्हणजे एकूण १२ चित्रपट पाहिले. सगळे अतिशय उत्तम होते. मी बघितलेल्यांपैकी एकही महायुद्धासंबंधी नव्हता. जितके बघितले त्यापेक्षा जास्त बघायचे राहिले.. वेळ, न जुळणारं वेळापत्रक किंवा इतर काही कारणं! गेल्यावर्षी प्रमाणेच युरोपियन चित्रपट अतिशय नेत्रसुखद होते! ह्यावर्षी एक इराणी सिनेमाही पाहिला. तर यंदा पाहिलेल्या चित्रपटांबद्दल थोडसं.
१. अॅना अरेबिया : उद्धाटनाचा इस्रायली सिनेमा. इस्राईलच्या सिमेवरील प्रदेशातल्या एका वस्तीत ज्यु आणि अरब लोकं एकत्र रहात असतात. धर्म वेगळे असले तरी त्यांचे प्रश्न आणि आनंद दोन्ही सारखेच. एक पत्रकार त्या वस्तीत येते आणि तिच्या तिथल्या लोकांच्या संभाषणातून कथा उलगडत जाते. वैशिष्ट्य म्हणजे ८१ मिनीटांचा हा सिनेमा एकच शॉट म्हणजे सिंगल कट आहे! एकंदरीत चांगला असला तरी उद्धाटनाच्या सिनेमापेक्षा पुढचे सिनेमे जास्त आवडतात हा गेल्यावर्षीचा अनुभव ह्यावर्षीही आला!
२. फॉरेन बॉडीज : एक सुंदर इटालियन सिनेमा. ह्याच्या दिग्दर्शकाला विभागून बक्षिस मिळालं. कॅन्सर उपचार घेत असलेल्या आपल्या बाळाची काळजी घेणार्या एका बापाची गोष्ट. बाळाची काळजी, आर्थिक सोय, दुर असलेल्या बायको आणि दुसर्या मुलाची काळजी आणि शिवाय आजुबाजूला नको असलेले मोरक्कन लोकं. ह्या मोरक्कन लोकांशी त्याला अजिबात मैत्री करायची नसते. पण हळूहळू त्यांच्यात नातं तयार होत जातं आणि अगदी शेवटी तो आपल्या मुलाला त्या मोरोक्कन माणसाला 'फ्रेंड' म्हणायला सांगतो. अतिशय हळूवार प्रसंगांतून उलगडत जाणारी कथा सुखांत असल्याने चांगली वाटते. बापाचं काम करणार्या कलाकाराने उत्कृष्ठ अभिनाय केला आहे.
३. वन शॉट : क्रोएशियात घडलेल्या या सिनेमात दोन टीनएजर मुलींच्या हातून एका माणसाला अजाणतेपणी गोळी लागते आणि तो माणूस मरतो. ह्यात त्या मुलींची तसच पोलिस इन्सपेक्टरची उपकथानकं पण आहेत. मुली आधी गुन्हा कबूल करत नाहीतच. पुढे जिच्या हातात बंदूक असते तिने गुन्हा कबूल करेपर्यंतच्या प्रवासात ही उपकथानकं उलगडत जातात. पोलिस इन्सपेक्टरचं काम करणार्या अभिनेत्रीने सुंदर अभिनय केला आहे. शिवाय पूर्ण सिनेमाभर एक सेपियन छटा आहे. क्रोएशियन सिनेमा असल्याने मी आपलं कुठे गोरान इव्हानिसेव्हिच दिसतो का ते बघत होतो.. कारण आमच्या क्रोएअशियाशी संबंध तेव्हडाच!
४. अॅक्रीड (Acrid) : मी पाहिलेला पहिला इराणी सिनेमा. हा सिनेमा म्हणजे पूर्णपणे दिग्दर्शकाचं कौशल्य. एकातून दुसरी दुसर्यातून तिसरी अश्या कथा गुंफत नेल्या आहेत. मला कळेना की आता वर्तुळ पूर्ण कसं करणार. पण शेवटी एकदम मस्त वळण घेतलं आहे. ह्या चित्रपटातल्या सगळ्या नायिका पूर्ण बाह्यांचे आणि डोकी झाकणारे कपडे घातलेल्या होत्या ! आपल्या डोळ्यांसमोर इराणचं एक चित्र रेखाटलेलं असतं. पण ह्या सिनेमात तिथे भारी गाड्या, मोठे मोठे हायवे, शहरात मेट्रो ट्रेन तसच पुरुष स्त्रीरोग तज्ञ आणि त्याच्या कडे तपासायला येणार्या स्त्रीया हे सगळं होतं. कुठलंही पार्श्वसंगीत नसलेला, मोजकेच संवाद असलेला हा चित्रपट उकृष्ठ दिग्दर्शन आणि नैसर्गिक अभियनामुळे खूप खुलला!
५. द क्वीन ऑफ माँट्रियल : ह्या पिफमधला हा पहिला फ्रेंच सिनेमा. नवरा गेल्याने उध्वस्त झालेल्या एका बाईची गोष्ट. विधवा ते तिच्या आयुष्याची 'राणी' असा प्रवास ह्या सिनेमात दिसतो. जमैका ते आइसलँड प्रवासादरम्यान माँट्रीयलमध्ये अडकलेले एक माय लेक आणि एक सील तिच्या आयुष्यात येतात आणि सगळं हळूहळू बदलत जातं. हलके फुलके प्रसंग, भाषांच्या गोंधळातून उडालेले विनोद ह्यांमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटला. मला एकंदरीत प्लॉट खूप आवडला.
६. मिस्टर मॉर्गन्स लास्ट लव्ह : पॅरिसमध्ये रहाणारा फिलॉसॉफीचा वृद्ध प्रोफेसर मॅथ्यू मॉर्गन आणि सालसा डान्स शिकवणारी तरूण, सुंदर पाओलिन ह्यांची ही कथा. पत्नीच्या निधनानंतर पॅरीसमध्ये एकटा रहात असलेला हा अमेरिकन प्रोफेसर बसमध्ये पाओलिनला भेटतो. अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोघांमध्ये छान मैत्री निर्माण होते. पाओलिनच्या बाजूने तरी ती फक्त मैत्रीच असते. पुढे घटना अश्या घडत जातात की कथा खूप वळणं घेते. पाओलिन हे मॅथ्यू मॉर्गनचं शेवटचं 'प्रेम' ठरतं. देखणं पॅरिस, सुंदर कलाकार, त्यांच्या त्याहून सुंदर अभिनय, संयत हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन ह्यांमुळे हा सिनेमा अतिशय आवडला. नंतर कितीतरी वेळ त्यातले प्रसंग, संवाद आठवत होते. ह्याची डीव्हीडी मिळाली तर नक्की विकत घेणार आहे. पॅरिसमध्ये घडत असला तरी संपूर्ण सिनेमा इंग्रजीतच आहे. त्यामुळे सबटायटल्स न वाचायला लागता, पॅरिस अगदी डोळेभरून बघता आलं!
७. द लव्ह स्टेक : ही एक जर्मन प्रेमकथा. पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करणारी एक कूक आणि तिथेच काम करणारा एक मसाजर. अतिशय विजोड आणि भिन्न स्वभावाचे असे हे दोघे डेटींग करतात, प्रेमात पडतात. एकमेकांच्या सहवासात राहून त्यांच्या व्यक्तीमत्त्वात चांगले बदलही होतात जसं की तो तिचं दारूचं व्यसन सोडवायचा प्रयत्न करतो, ती त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करते. त्यांच्या प्रेमातले चढ उतार सिनेमात चांगले दाखवले आहेत. दोघांचाही अभिनयही चांगला होता.
८. द विकेंड : पश्चिम जर्मनीतल्या 'रेड आर्मी फॅक्शन'चा, म्हणजेच कम्युनिस्ट ग्रुपचा, सदस्य बर्याच वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटतो. त्याची बहिण त्याच्या सुटकेनिमित्त काही जुन्या मित्र-मैत्रिणींना विकेंडला घरी बोलावते. ह्यात त्याची जुन्मी प्रेयसी असते तसेच रेड आर्मी फॅक्शनमधले जुने सहकारीही असतात. एकंदरीत तणावपूर्ण वातावरणात भडका उडायला एक ठिणगी पुरेशी ठरते. जुन्या गोष्टी पुन्हा निघतात, काही गोष्टी एकमेकांना नव्यानेच कळतात! घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' असतो. कलाकारांचे नैसर्गिक अभिनय आणि मुळात सशक्त कथा ह्यामुळे हा सिनेमा खूप आवडला. ह्यातही जर्मनीतली सुरेख लँडस्केप्स होती.
९. द पॅशन ऑफ मायकेलँजेलो : आपल्या 'ओह माय गॉड'चं हे दक्षिण अमेरिकन व्हर्जन. चिले मधल्या एका गावात एक मुलगा व्हर्जिन मेरी आपल्याशी बोलते असा दावा करत असतो. तो सांगतो त्यावेळी आकाशात धुराचे वेगवेगळे आकार दिसतात. त्याला अमाप प्रसिद्धी मिळते. चर्चला नक्की काय भुमिका घ्यावी ते समजत नाही आणि त्यामुळे ते प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका पाद्रीला पाठवतात. तो पाद्री एका फोटोग्राफरच्या मदतीने प्रकरणाचा तपास लावतो. पुढे खरी गोष्ट कळल्यावर गाव मुलाला मारायला धावतं. शेवटी तो पाद्रीच त्या मुलाला वाचवतो आणि गावापासून दुर घेऊन जातो. हा खर्या गोष्टीवर आधारीत सिनेमा आहे. एकंदरीत चांगला आहे.
१०. नाईट ट्रेन टू लिस्बन : स्वित्झर्लँडमध्ये भाषा शिकवणारा एक प्रोफेसर कॉलेजला जात असताना एका पुलावरून उडी मारून आत्महत्या करू पहाणार्या तरूणीला पहातो. तो खूप प्रयत्नपूर्वक ती आत्महत्या थांबवतो. तो तिला आपल्या वर्गात घेऊन जातो. पण ती वर्गातून पळून जाते. मात्र तिचा कोट तिथेच विसरून जाते. त्या कोटाच्या खिशात एक पुस्तक असतं. तो त्या पुस्तकावरून तिचा माग काढायचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याला पुस्तकात ठेवलेली लिस्बनला जाणार्या आगगाडीची तिकिटं सापडतात. ती तरूणी गाडीच्या वेळेला स्टेशनवर येईल ह्या आशेने तो तिथे जातो. काय करावं ह्या विचारात तो लिस्बनच्या गाडीत चढतो आणि प्रवासात ते पुस्तक पूर्ण वाचून काढतो आणि तिथून सुरु होते एक शोधयात्रा! त्या पुस्तकात काय असतं आणि ती तरूणी कोण असते हे चित्रपटातच पहावं! स्वित्झर्लँड आणि लिस्बनमध्ये घडत असलेला हा सिनेमा पूर्ण इंग्रजीत आहे. पिफमधला मला सर्वांत आवडलेला हा चित्रपट! अतिशय वेगवान कथा, उत्कृष्ठ आणि अतिशय कल्पक दिग्दर्शन आणि सगळ्यांचे सुरेख अभिनय! सगळीच भट्टी फार मस्त जमली आहे. मिळेल तेव्हा नक्की पहावा असा चित्रपट.
११. यंग अँड ब्युटीफूल : पॅरिसमध्ये रहाणारी, चांगल्या घरातली, कॉलेजमध्ये शिकणारी एक यंग अँड ब्युटीफूल मुलगी कोणतही ठोस कारण नसताना, केवळ एक थ्रील म्हणून 'कॉलगर्ल' म्हणून काम करायला लागते. घरी अर्थातच काही माहित नसतं. एका अघटीत प्रसंगामुळे हा सगळा प्रकार घरी कळतो. पुढे अर्थातच घरी ओरडा, मानसोपचार तज्ज्ञ वगैरे सगळे प्रकार होतात. पण मुलीला त्यातून बाहेर पडणं खूप अवघड जातं. नवीन बॉयफ्रेंड मिळाला तरी त्याच्या बरोबर एकापेक्षा जास्त रात्री घालवूच शकत नाही. मग अजून एक असा प्रसंग घडतो की ती सगळा प्रकार संपवते आणि पुन्हा आपल्या सामान्य आयुष्याकडे वळते. असं काही बघून खर सांगायचं तर भिती वाटली! एकंदरीत चित्रपटाची हाताळणी जरा भडक होती पण ती विषयाची गरज होती. भडकपणात कुठे काही अचाट आणि अतर्क्य किंवा मुद्दाम दाखवायचे म्हणून काही प्रसंग दाखवलेत असं मात्र मुळीच वाटलं नाही.
१२. द क्लबसँडविच : सिंगल मदर आणि तिच्या टिनेजर मुलाची ही मेक्सिकन कथा. आईसाठी मुलगा हेच विश्व असतं. त्यांच्यातलं नातही अतिशय खुलं असतं. ते एकदा रिसॉर्टवर सुट्टीसाठी आलेले असताना त्याला एक मैत्रिण भेटते. वयाच्या परिणामामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. आईला मुलाचा आयुष्यात आपल्याला मिळू लागलेलं दुय्यम स्थान पचवणं फार अवघड जातं. नंतर नंतर तिला ते पटायला लागतं. सुरुवातीचा काही भाग खूप संथ आहे पण आई मुलातलं नातं दाखवण्यासाठी ते आवश्यक होतं असं वाटलं. नंतर मात्र छोट्या छोट्या विनोदी प्रसंगांतून कथा भराभर पुढे सरकते. तिनही प्रमुख कलाकारांनी सुरेख अभिनय केला आहे.
हा मी पाहिलेला पिफमधला शेवटचा चित्रपट. हा आवडला नसता तर आणखीन एक पहाणार होतो कारण शेवट चांगला करायचा होता. पण शेवटच्या चित्रपटा कडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या !
तर असे हे १२ चित्रपट. ह्याही वर्षी सुंदर कथा, उत्कृष्ठ अभिनय आणि दिग्दर्शन आणि युरोपातली सुरेख लँडस्केप्स हे सगळं हाती लागलं!!

2 प्रतिसाद:
mast mahiti. khar ter yatla kuthlach movie mi pahila nahi :-( pan atta wattay savad kadhun pahilech pahijet
Aniket
http://manaatale.blogspot.in
Thanks Aniket.. :)
Post a Comment