आराम आणि Kabul Express....

काल खूप दिवसांनी शनिवार जरा आरामात गेला...नाहितर प्रत्येक वेळी काही ना काही प्लॅन, कुठेतरी जाणं किंवा ४/५ तास चालणारं Grossary shopping... म्हणजे week day पेक्षा जास्त धावपळ... शुक्रवारी रात्री project party आणि नंतर झालेल्या पत्ते session मुळे झोपेपर्य़ंत शनिवार उजाडला होताच...त्यामूळे मी शनिवारी मी ११ ला उठूनही काय पहाटे उठून बसलास अशी comment मझ्या rommie नी ऐकवली.. ! त्याच्यानंतर प्रचंड फोनाफोनी करून दुपारी कोण कुठल्या गाडीतून कुठे जाणार ह्याचा प्लॅन बनवून झाला... मला मधे १ तास मोकळा वेळ दिसताच मी लगेच YMCA त पळालो.. बाहेर छान हावा होती.. अगदी summer मधला typical दिवस वाटत होता... आणि YMCA च्या swimming pool वर गर्दी ही नव्हती... मला अगदी स्वतंत्र लेन मिळाली... Apartment च्या pool मधे पोहायला जितकी मजा येते तितकी YMCA मधे येत नाही... कारण तिथे मधे थांबून timepass करता येत नाही आणि पाण्यात डूंबत रहाता येत नाही..compulsary laps मारा नाहीतर बाहेर पडा...पूणेरी पाट्या लावल्या आहेत अगदी तिथे.. :) घरी येऊन लगेच गौतम, निशांत साठी गाडी बघयला एका delaer कडे गेलो... मी इथे येऊन बरेच दिवस झाल्यामूळे हल्ली लोकं मला delaer कडे deal final करायला वगैरे घेऊन जातात... :।
त्या dealer कडे मी मागच्या वर्षी कधितरी एका मित्राबरोबर गेलो होतो.. कसं काय माहित पण तिथल्या तो फ़िरंगी salesman आणि त्याचा खडूस boss ह्या दोघांनाही मी अगदी चांगला लक्षात होतो... :) "तुझ्या सारख्या खडूस पूणेरी कोकणस्थाला कोण विसरणार... " असं conclusion आमच्या gang नी काढलं... !!!
दूपारी निवांतपणे घरी बसून आईनी पाठवलेला साप्ताहिक सकाळ चा दिवाळी अंक वाचला... अंक मस्त आहे एकदम.. त्याबद्दल detail मधे परत कधितरी...पण हे सगळ करण्याच्या नादात routine कामं म्हणजे घर vaccum करणं, कपडे धूणं, इस्री करणं etc राहूनच गेलं... :( wallmart जाऊन उगाच भटकायच ही राहिलच...
इतर प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन असल्याने मी, चंदना आणि LP असे तिघच much awaited काबूल एक्सप्रेस ला जायला निघालो... पिक्चर overall चांगला असला तरी जरा अपेक्षाभंग च झाला...त्याची publicity जशी केली होती त्यावरून मला तो Boarder, Refugee ह्यांच better version असेल असं वाटलं होतं... Black commedy असली तरी त्यात जे काय दाखवलय त्याचं shooting करण्यासाठी अगदी अफ़गाणिस्तानापर्यंत जायची काही गरज नव्हती...अर्शद वारसी मुन्नाभाई mode मधून बाहेरच येत नाही... अफ़गाणिस्तानात reporting साठी गेलेला पत्रकार इतके जास्त PJ मारतो.. I mean मला तरी ते फ़ारसं realistic वाटलं नाही....:(
पिक्चर ची सुरवात इतकी संथ आहे की काबूल एक्सप्रेस च्या ऐवजी काबूल पॅसेंजर वाटायला लागते...
म्हणजे बराच वेळ अर्शद वारसी चे PJ वगळता काही घडतच नाही... इम्रान खान नावाच्या तालिब ची entry झाल्यावर जरा speed यायला लागतो... त्याने ह्या हिरोंना किड्नॅप केल्यावर त्याचे आणि अर्शद वारसी चे गाडीतले संवाद मजेदार असले तरी त्या situation ला शोभत नाहीत... हातात बंदूक असलेल्या अतिरेक्याने कोणा पत्रकाराला किडनॅप केलेलं असताना तो त्याच्याशी इम्रान खान चांगला की कपिल देव चांगला असा वाद घालेल हे पटत नाही... बिचार्या जॉन अब्राहीम ला तर काही कामच नाही... तो पत्रकाराच्या ऐवजी इतर कोणीही म्हणजे engineer, doctor, social worker आहे असं सांगितलं असत तरी पटल असतं कारण तो पत्रकार आहे असं विशेष कुठे establish च होत नाही... शिवाय त्याच्या role मधे वेगळं असं काही नाहिये.. अर्शद वारसी ला निदान त्या तालिब शी वाद घालण्याचं काम तरी आहे... जॉन ला तेही नाहिये आणि कुठे त्याचे muscles दाखवायची ही संधी नाहिये... :) त्याच्याजागी कोणीही सोम्यागोम्या पण चालला असता...
पटत नसतानाही तो इम्रान खान म्हण्जे तो तालिब हे सगळं करत असतो त्यामूळे त्याच्याबद्दल सहानूभूती निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न ही somehow न पटण्यासारखा आहे... त्याला पटत नसलं तरी ultimately तो अतिरेकीच आहे so काय फ़रक पडतोय ??
बापरे जरा जास्तच शिव्या घातल्या मी.. :) बर्याच चांगल्या गोष्टी पण आहेत त्यात...:D Main म्हणजे उगाच ओढून ताणून गाणं आणलं नाहिये...किंवा कोणी अफ़गाणी मुलगी आणि तिच एका कोणत्यातरी हिरो बरोबर प्रेमप्रकरण असलं काहितरी नाहिये... तसच बंदूकधारी तालिब आणि आपले तगडे हिरो ह्याची मारामारी किंवा गाडी ला लटकण किंवा इतर typical bollywood stunts दाखवण्याचा आचरटपणा केला नाहिये... :)
अफ़गाणिस्तान बद्दलची वातावरणनिर्मिती आणि locations खूप मस्त आहेत.. वाळूची लांबच लांब बेटं आणि त्याच्या background वर हिमशिखरं..खूप मस्त दिसतं.... मला तर मधे मधे वाटत होतं ह्याचे फोटो काढायला किती मजा येइल...:D आणि तसं पिक्चर मधे तालिबान, अमेरीका, पाक ह्याचाबद्दल बोललेल आहेच.. so बघतान पण नाही पण नंतर त्याबद्दल विचार केला जातोच....
एकूण काय मला पिक्चर आवडला नाही असं नाही पण जितका आवडला तितकात अपेक्षाभंग पण झाला... :(
so माझा शनिवार आणि काबूल एक्सप्रेस दोन्ही not bad but could have been better... !!!! :)

Ice Ice Baby.....!

ह्या वर्षी हिवाळ्याची सुरुवात जरा जास्तच लवकर झाली... मागची वर्षी thanks giving च्या आधिच्या week end ला पहिल्यांदा jackets,gloves घालायची वेळ आली होती... यंदा मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यापासूनच winter accessories वापराव्या लागतायत... मागच्या वर्षी snow fall, skiing हे सगळ enjoy करून देखिल ह्या वर्षी पण snow fall ची वाट बघणं चालू होतच.. आणि हे मी आमच्या ऑफ़िस मधल्या फ़िरंग्यांना सांगितल्यावर त्यांच्या शिव्या पण खाव्या लागल्या.. :) त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सारखे "परप्रांतिय" इथे येउन snow fall व्ह्यायची वाट बघतात आणि मग snow fall झाला की त्रास त्यांना सहन करावा लागतो.. !
Thanks giving ची चाहूल लागली आणि थंडी चांगलीच वाढू लागली.. गाडीवर रोज सकाळी snow flakes दिसू लागले..त्यातच east coast वर बर्यापैकी बर्फ़ पडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या.. आमचा १९ जणांचा कोलोरॅडो ला जवळ जवळ १५ तास drive करुन जायचा मेगा प्लॅन बनत होता...लोक जास्त चालणारी डोकी ही जास्त त्यामूळे rounds of discussion होऊन ट्रिप final झाली... ह्या ट्रिप मधे overall सगळंच मेगा होतं... डोकी १९, ३ SUVs, १७/१८ तासांचा मोठा drive, रहायला घेतलेली २ मोठी cabins सगळच huge...आधी मी christmas ट्रिप च्या ठरवाठरवीत आणि नंतर परत एकदा शिकागो ला गेल्यामुळॆ, कोलोरॅडो ट्रिप च्या organization मधे मी अजिबातच involve नव्हतो...आणि "तरूण रक्ताला वाव देण्याचा उदात्त हेतू" ही त्या होत..:D अर्थात अर्पणाच्या शिव्या खाव्या लागल्याच त्यामूळे...:)
  Posted by Picasa
डेन्वर ला पोहोचता पोहोचता उजाडलं आणि रस्त्यावरून rocky mountains च्या शिखरांचं सुंदर द्रुष्य दिसलं..त्याच्यावर बर्फ़ शिंपडल्यासारख दिसत होतं.. आम्ही west ला drive करत असल्याने सूर्योदय दिसत नव्हता .. पण अचानक मागे लक्ष गेलं आणि एव्हडे सूंदर रंग दिसायला लागले...त्या रंगांचे गाडीतूनच जमतिल तेव्ह्डे फोटो काढले.. पण exit घेउन थांबे पर्यंत ते रंग गायब झाले... Denver ते brekenridge चा drive होता साधारण १५० मैल चाच पण पूर्ण डोंगरा मधून..आणि जसे जसे वर जाऊ तसा बर्फ़ वाढ्त होता...आजूबाजूला द्रुष्य खूप छान दिसत होती पण गाडी चालू असल्याने फोटो निट घेता येत नव्हते...
कोलोरॅडो ट्रिप मधली एक मुख्य activity म्हणजे snow mobilling... snow mobiling च्या track वर अर्थातच पूर्ण बर्फ़ होता आणि एव्हडच काय तिथे तर नजर जाई पर्यंत सगळी कडे बर्फ़ च बर्फ़ होता... सगळी कडे पूर्ण पांढरा रंग..मधे मधे तूरळक हिरवळ.. काही भाग सूर्यप्रकाशात चकाकणारा आणि त्यात धावणार्या आमच्या snow mobils..!!
  Posted by Picasa मधूर snow mobil चालवत असताना मी मागे बसून फोटो काढायाची हौस भागवून घेत होतो... overall ते सगळं इतकं सूंदर होतं की किती ही वेळ पहिलं आणि किती ही फोटो काढले तरी समधान च होतं नव्हतं..
त्यादिवशी रात्री vail नावाच्या गावाला drive करत असताना अचानक snow fall चालू झाला...तो पूर्ण रस्ता नदी काठून होत्ता.. नदी काठून जाणारा drive, चालवायला SUV, बाहेर होत असलेला हलकासा snow fall आणि गाडीत चालू असलेली आशा भासलेंच्या जून्या गाण्यांची CD.. ह्या पेक्षा आधिक ideal condition काय असू शकते...
ह्याच ट्रिप मधे skiing देखिल करायचं होतं.. skiing चे tracks अर्थातच डोंगर उतारावर होते...तिथे जात असताना समोर त्याचं द्रुष्य दिसत होतं.. डोंगरावर भूरभूरलेल्या बर्फ़ात मधे मधे तयार झालेली सपाटी आणि त्यावरून खाली घरंगळणारे काळे लाल ठिपके..आपल्याकडे दिवाळीच्या किल्ल्यांवर बनवण्यासाठी हा एकदम perfect scene आहे. :D
  Posted by Picasa
skiing tracks अजस्र्त होते...तिथे registration करत असताना counter वरची मुलगी अगदी काळजीने सांगत होती की गेले ८ दिवस बर्फ़ पडला नाही..आता पडायलाच हवा नाहितर ski resort ला problem होईल.. मला आपल्याकडच्या पावसाची वाट बघणार्या शेतकर्याची आठवण आली..!! skiing करतानाही मनसोक्त बर्फ़ात खेळून झालं...
हा एव्हडा बर्फ़ कमी पडू नये म्हणून का काय तर आम्ही st louis ला परत आल्यवर ४ च दिवसात Ice Rain ची alert यायला लागली...गुरुवारी त्या निमित्ताने ऑफ़िस मधून लवकर सटकताही आलं...:)
  Posted by Picasa पावसाबरोबर बर्फ़ ही पडत होता...हा ना धड snow होता ना गारा होत्या...हवा पण इतकी थंड होती की पडणारं पावसाचं पाणी गोठत होतं... इतकच काय झाडांवरून, घराच्या छ्परावरून घरंगळणारं पाणी पण गोठून जात होतं...हे असच रात्र भर चालू होतं...
  Posted by Picasa
दुसर्या दिवशी ऑफ़िस ला जाताना सुमारे तास भर गाडी खणून काढण्यातच गेला...जवळ जवळ १५ मिनिटं तर गाडीची दारच उघडत नव्हती... मला तर handle तुटून हातात येतं का काय अशी भिती वाटत होती... wipers मधेही एतका Ice जमा झाला होता की ते हलत पण नव्हते... आरसे तर संध्याकाळ पर्यंत साफ़ झालेच नाहीत... आधी तास भर गाडी स्वच्छ करणे आणि नंतर तास भर drive करून आमची gang एकदाची ऑफ़िस ला पोचली...बाहेर अजूनही Ice slit आहे..  Posted by Picasa
एकूण काय गेल्या ८/१० दिवसात मिळून आत्तापर्यंत पाहिला त्याच्यापेक्षा हजारपट बर्फ़ पाहून झाला...पहावं तिकडे "Ice Ice Baby" अशीच अवस्था आहे.. ! :)

बर्निंग ट्रेन

परवा पुतळाविटंबने वरून महाराष्ट्रात झालेल्या दंगलीत डेक्कन क्वीन पेटवल्याची सचित्र बातमी वाचली.. राणिची झालेली अशी दुर्दशा पाहून कुठेतरी वाइट वाटून गेलं...लहानपणा पासून डेक्कन क्वीन बद्दल खूप कुतूहल होतं.. पण ही कल्याण ला थांबत नसल्याने आम्हा डोंबिवली करांना तिचा तसा काहीच उपयोग नव्हता..डेक्कन क्वीन मधून पूण्याला जाण्याची हौस भागवण्यासाठी एकदातर आज्जी मला दुपारी डोंबिवली हून आईच्या office मधे, VT पर्यंत सोडायला आली होती आणि मग मी आणि आई डेक्कन क्वीन ने पूण्याला गेलो होतो..त्यावेळी ही एकच सूपर फ़ास्ट दर्जाची गाडी असल्याने त्यातून प्रवास करण म्हणजे prestige समजलं जात असे..टाय सूट घालून कामनिमित्त मुंबईला जाणार्या executive पूणेकरांबरोबरच सुट्टी साठी आपल्या दादर पार्ल्याच्या नातेवाईकांकडे जाणारे प्रभात रॊड डेक्कन वरचे शिष्ठ पूणेकर देखिल "आम्ही डेक्कन क्वीन सोडून दुसर्या गाडीने मुंबई ला जात नाही" असं अगदी अभिमानानी सांगत..
राणिचा थाट ही तसा शाहीच.. ब्रिटीशांनी रेस खेळ्ण्यासाठी सकाळी मुंबई ला येता यावे म्हणून सुरू केलेली ही गाडी पुढे रोज सोडण्यात येऊ लागली..रेस खेळ्णारे उच्चभ्रू अस्ल्याने सहाजिकच राणिला कायम पहिला मान असे... पावसामूळे delay झालेली वाहातूक असो की अन्य कोणत्याही फ़ालतू कारणाने झालेला typical centra railway खोळंबा असो, जागा मिळेल तेव्हा बाकीसग्ळ्यांना बाजूला सारून राणी मात्र ऐटीत पुढे निघून जात असे..In fact ह्याच मुळे मुंबईकरांना राणी बद्द्ल कधी विषेश प्रेम वाटलच नाही... सकाळी ९/९:३० च्या आसपास डोंबिवली स्टेशन भरून वाहत असताना आणि लोक पुढ्च्या फ़ास्ट लोकल साठी थांबलेले असताना "platform no 5 च्या किनार्यापासून दूर उभे रहा एक वेग्वान गाडी पुढे जात आहे." अशी annoucement झाली की हमखास समजावं की आता डेक्कन क्वीन सगळ्यांना चिडवत पुढे निघून जाणार..
संध्याकाळी देखिल आई आणि तिच्या मैत्रिणींना यायल्या उशिर झाला की हमखास ठरलेलं कारण म्हणजे "डेक्कन क्वीन रखडली आणि आमच्या फ़ास्ट ट्रेन लेट झाल्या"...सुमारे ७६ वर्षांच्या हिच्या प्रवासात खंडाळ्याचा एक अपघात सोडला तर destination च्या आधी ही कधिच terminate झाली नाहीये...
बाकीच्यांपासून वेगळं ठेवण्यासाठी डेक्कन क्वीन चे रंग देखिल किती बदलले..पांढरा,पिवळा,लाल एव्हढ्च काय तर मधे कधितरी काळ्पट grey पोशाख देखिल हिनी घातला..पण लोकांना तो अजिबात न आवडल्याने आठच दिवसात तो बदलण्यात आला..डेक्कन क्वीन चा पांढरा रंग खूप वर्ष होता...नंतर मग सध्या असलेल्या निळा रंग आला..."मिले सुर मेरा तुम्हारा" मधे दाखवलेल्या डेक्कन क्वीन च्या वळण घेणार्या द्रुष्यामूळे तर ती जवळजवळ देशभरात कुतूहलाचा विषय बनली होती...
डेक्कन क्वीन निघताना पूणे आणि मुंबई स्टेशन वर सनई देखिल वाजलली जात असे..
डेक्कन क्वीन च्या प्रवाशांच तिच्यावर भयंकर प्रेम.. गणपती,दांडीया, सत्यनारायण, भजनं ह्यापासून पत्त्यांच्या अड्ड्यापर्यंत अनेक गोष्टी गाडीत साजर्या केल्या जातात...डेक्कन क्वीन चा ६० वा, ७५ वा वाढदिवस देखिल अगदी दण्क्यात साजरे झाले अगदी आरास, रांगोळ्या, मिठाई सकट...
मुंबई पुणे प्रवासी संख्या वाढल्यावर इंद्रायणी, प्रगती, शताब्दी अशा अनेक गाड्या चालू झाल्या पण डेक्कन क्वीन चा थाट मात्र कायम होता..इतर कुठल्या गाडी च्या वाढदिवशी पेपर मधे अग्रलेख लिहिले गेल्याच मला तरी आठवत नाही.. आणि इतर ही अनेक लेखांमधे,गोष्टींमधे डेक्कन क्वीन इतका दुसर्या गाडी चा उल्लेख दिसत नाही.. तिचा वक्तशिरपणा, तिचा वेग, तिचा रंग, तिची pantry car, तिचं मोजून ३ स्टेशन वर थांबणं, अगदी त्यात मिळणारं 20/25 रुपये किमतिचं omlet आणि cheese toast ह्या सगळ्याचा तिच्या प्रवाशांना अगदी पूणेरी style चा "जाज्वल्य" अभिमान असतो.. :)
Express highway चालू झाल्यावर आणि volvo पर्व आल्यावर राणीची शान थोड्याफ़ार प्रमाणात का होइना घसरलीच...आणि परवा तर ती अगदीच बिचारी वाटली...
जळण्यार्या डेक्कन क्वीन चे फोटो बघताना जाणवलं की ब्रिटीशांनी चालू केलेल्या ह्या राणी ची अवस्था पण त्यांच्या खर्या राणी सारखीच आहे..राणी राणी फ़क्त म्हणायला प्रत्यक्शात मात्र नुसती नावापुरती, रया गेलेली...!