मागे वळून पहाताना..

मागे वळून पहाताना...... (मागे वळून पहाताना आज जरा मान दुखत्ये... मी उत्साहाच्या भरात जरा जास्तच swimming केलं..) :।
बापरे ह्या नवीन blog ची सुरुवात ह्या महा P. J. नी झाली...:D..
हं तर मागे वळून पहाताना.. मला St.Louis ला येउन परवा १ वर्ष झालं.. सहजच मनात वर्षभरात घडून गेलेल्या अनेक घटना आल्या...
घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. तसच कामानिमीत्त परदेशी देखिल पहिल्यांदाच येत होतो...त्यामुळे एकूणच उत्सूकता खूप होती... St.Louis(stl) ला office मधलेच बरेच ओळखिचे आधीपासून होते त्यामुळे जास्त त्रास होणार नाही असा अंदाज होता...
सुरवातीला इथे खूप उन्हाळा होता...तसच stl खूप मोठ शहर नसल्याने आपण अमेरीकेत आहोत असं वाटायचच नाही... घराच्या आसपासचा परीसर खूप छान वाटला... टेनिस कोर्टपण असल्याने खूप मजा यायची.. पहिला अठवडा ज्यांच्याकडे रहात होतो तिथे अगदी पुणेरी पाहूणचार झाला... :) पहिल्याच दिवशी "काही हवं आहे का असं विचारलं जाणार नाही... पाहीजे असेल तर हाताने घ्यावं." अशी खास पूणेरी भाषेत सुचना मिळाली (फ़क्त पाटिच लवायची बाकी राहीली होती.. :P)... नंतर स्वतःच्या घरी रहायल्या गेल्यावर नव्याची नवलाई खूप enjoy केली.. स्वतःचं असं घर पहिल्यांदाच असल्याने ते लावताना, सजवताना खूप छान वाटायचं... घर आणि परीसर छान असला तरी office आणि shopping च्या द्रुष्टीने अतिशय गैरसोयीचा होता... Public Transport नसल्याने आणि आमच्याजवळ गाडी पण नसल्याने सारखं कोणावर तरी अवलंबून रहावं लागायचं... दिपकनी गाडी लवकर घेतल्याने बरीच सोय झाली.. आणि तो मद्त पण खूप करायचा... मी अमेरीकेत पहिल्यांदाच आलो असल्याने creidt history नावाचा प्रकार नव्हता..त्यामूळे bank account, credit card, mobile हे सगळं करताना खूप त्रास झाला...कधिकधि माझी खूप चिडचिड व्ह्यायची.. आणि मग "बास झालं US..दिपक ला मी सांगून टाकणारे की मला परत पाठव.." असं मी जाहीर करून टाकायचो.. :) एकदातर मी चिडून रात्री १०:३० ला gym मधे गेलो होतो..!!! हया सगळ्या प्रकारात माणस ओळखणं मात्र बरच कळायला लागलं.. खर मदत करणारं कोण आणि नुसतच बोलबच्चन कोण हे ओळखता यायला लागलं..
बरोबरीने अमेरीका अनूभवणं चालूच होतं.. shopping malls, cars, parties, bowling, movies हे सगळं चालू होतं.. तसच स्वयपाक करणं हाही एक रोजचा अनूभव होता.. कधिकधि प्रयोग पण चालायचे आणि मग थालिपीठ जळलं की "जळलं नाही खमंग लागण्यासाठी मुद्दामच जास्त भाजलय" वगैरे खूलासे चालायचे.. :) माझे rommies ही एकदम चांगले असल्याने निदान घरात तरी issues नव्ह्ते...
इथे आल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी आमची गाडी आली..त्यावेळी पण खूप आनंद झाला होता... गाडीच डिल चांगलं होतं आणि मझ्या car partner कडे license नसल्याने सुरवातीच्या दिवसात गाडी चालवायची हौस भागवून घेता आली.. :) आम्ही गाडीच्या फोटोंचा एक portfolio च बनवला होता.. :)
तोपर्यंत routine पण बर्यापैकी बसलं होतं...
दरम्यान गणपती, नवरात्री आणि दांडीया, बंगाली दुर्गापूजा असे सण इथे साजरे करणं चालू होतं... भारताबाहेर आल्यावर तुम्ही फ़क्त "भारतीय" असता.. मराठी, बंगाली, गुजराथी अश्या इतर काही ओळखी नसतात...त्यामूळे सगळेच जण सगळ्या सणांमधे हौशीनी सहभागी होतात... प्रत्येक long week end पण उत्साहात चालला होता... दरम्यान आई बाबांची इथे चक्कर झाली... त्यांना सगळ दाखवताना, फ़िरवताना खूप मजा आली... आणि त्याचा मुक्काम दिवाळी च्या वेळी असल्याने खूपच मजा आली... मुख्यम्हणजे दिवाळी आहे असं वाटत होतं...
पहिल्या ५ महिन्यात माझ्या नायगारा, शिकागो, फ़्लोरीडा, लास वेगास, LA अश्या ५ मोठ्या ट्रिप झाल्या... त्यापैकी LA, LV ला आई बाबा बरोबर होते... ते परत गेल्यानंतर मात्र महिनाभर खूप bore झालं...त्यात माझा १ rommie अश्विन भारतात परत गेला...तो माझा US मधला अगदी best friend होता... आणि दूसरा roomie त्याची family आल्यामूळे दूसरीकडे राहायला गेला...त्यामूळे आणखिनच bore :(...
अमेरीकेतल्या उन्हाळ्याची किंमत इथे एक हिवाळा काढल्यावर कळते...भयंकर गारठा, वेळी अवेळी पडणारा पाउस, वारा आणि बर्फ़ ह्यानी काही करता येत नाही.. :( तरी पण आम्ही उत्साही लोकांनी gym, shopping, parties हे सगळं नित्यनियमाने चालू ठेवलं होतं...हिवाळ्यात वाईट हवामान, खूप काम आणि सूट्टी नाही ह्यामूळे एकंदर आयूष्य बरच रटाळ चाललं होतं... मग त्यावर उपाय म्हणून New York चि ट्रिप झाली... New York खूप सुंदर शहर आहे आणि अगदी मुंबई ची आठवण होते....
वर्षभरात अनूभव चिक्कार आले.. चांगलेही आणि वाईट ही...माणसही खूप प्रकारची भेटली...हिशोबावरून भयंकर कट्कट करणारे, कामापूरता मामा प्रव्रुत्तिचे, लायकी नसताना माज करणारे, तोंडावर गोड आणि मदत करायची वेळ आली की हात वर करणारे लोक भेटले तसेच माझ्यापेक्षा बराच senior आणि अबोल पण तरीही मी कधी गप्प बसलो तर मला "बरं वाटत नाहीये का? चहा करून देऊ का?" असं विचारणारा माझा rommie नरेश, घरी गोड पदार्थ केले की आवर्जून बोलावणारी अर्पणा, होळीच्या दिवशी मला दूकानात पूरण पोळ्या मिंळाल्या नाहीत म्हणून स्वतः घरी बनवून देणारी हिमाली... मला air port वर घ्यायला येणारे आणि सुरवातिच्या काळात मदत करणारे अशिष आणि प्रिया, माझ्या सारख्या dance अजिबात न येणार्या माणसाला salsa dance चे funde न थकता देणारी मंजिरी, कुठच्याही बाबतित वाद न घालणारा आणि कधिही न चिडणारा (जे मला अजिबात जमत नाही) माझा car partner कौशिक आणि माझा नविन roomie अमेय, stl मधे नसलेले तरिही लागेल तेव्हा फोन वर funde देणारे श्रिष माणि श्रवंती आणि ज्याच्या बरोबर मी खूप timepass, मस्ती, मारामारी अगदी भांडण सुध्दा केलं असा अश्विन (तो कालच इथे परत आलाय.. :) हे देखिल भेटले... आणि ह्या सगळ्यांमुळेच घरापासून लांब राहून ही इथल वास्तव्य बरच सुसह्य झालं... इथली मैत्री अर्थातच शाळा, college मधल्या इतकी खोल नाही आणि बर्याचदा प्रासंगिक असते पण हाही एक अनूभव च होता...
अजून किती दिवस इथे रहायचय माहित नाही पण पुढील दिवशी चांगले जातिल आणि मुख्य म्हणजे माझ खूप फ़िरून आणि बघून होइल आशी अपेक्षा आहे.. :)

सुख म्हणजे नक्की काय असतं...??

शुक्रवारी संध्याकाळी कुठेही पार्टीला न जाता घरीच बसावं.... साधाच पण ताजा आणि गरम वरण भात खाऊन लवकर झोपून जावं...शनीवारी सुट्टी असूनही पहाटे (?) ९ वाजता स्वत:हून जाग यावी... fresh mood मधे उठून kitchen मधे यावं...पहावं तर rommie नी आदल्यादिवशी ची सगळी भांडी घासून ठेवलेली असावी... स्वच्छ kitchen मधे छान चहा बनवून patio मधे बसून तो प्यावा... एकीकडे सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स मधल्या ताज्या बातम्या वाचाव्या..(अर्थात laptop वर...) बाहेर छान ऊन पडलेल असावं.. (हो..!!! US मधे उन्हाला छान म्हणतात...!) बाहेर पडून gym मधे जावं.. तास भर छान व्यायाम करावा.. gym मधेच एकीकडे टिव्ही वर एखादी serial किंवा टेनिस पहावं...
नंतर swimming pool मधे मस्त डुंबावं... pool वर मोजकीच पण "छान" लोकं असावी... ज्यामुळे swimming नीट करता येइल...(गर्दी नसली की swimming नीट करता येतं ना..! ) पाण्यात खेळून झालं की घरी येऊन मस्त गरम cofee प्यावी...tub मधे मनसोक्त अंघोळ करावी...आवरून याहू वर online जावं.. भारतातल्या मित्र मैत्रिणींशी chat करावं.. किंवा इथल्यांशी फोन वर खूप गप्पा माराव्या... office मधले असतील तर थोडफार gossiping पण करावं..(आजूबाजू ला काय चाल्लय हे महिती हवं ना..!!) जेवणाचं काय करावं ह्याचा विचार करत असताना एखाद्या couple कडून lunch invitation यावं...अत्यानंदानी त्यांच्या कडे जावं.. पोटभर सुग्रास जेवण जेवावं.. घरी येवून काहितरी वाचता वाचता झोपून जावं... तासभर झोप काढल्यावर परत आपोआप जाग यावी... बाहेर छान पाऊस पडत असावा... मस्त आल्याचा चहा पिताना कोणाचा तरी देवळात जायचं का म्हणून फोन यावा.. पावसाळी हवेत silent and romantic गाणी (आमच्या गाडीतल्या एका CD चं नाव silent and romantic songs असं आहे.) ऐकत देवळापर्यंत drive करावा..देवाचं दर्शन घेउन प्रसन्न वातावरणात तिथे १०-१५ mins. बसून रहावं...येतायेता उगाच wallmart किंवा Dierbergs मधे शिरावं.. थोडफार वायफ़ळ shopping करावं...मित्रांचा बाहेर जायचा (dinner) plan अधिच ठरलेला असावा आणि "इतके वाजता ह्या hotel मधे जायचय" असा फोन यावा... कुठल्यातरी फ़िरंगी hotel मधे मस्त sea food किंवा chicken हाणावं.. (त्यातही प्रत्येकाने वेगवेगळी डिश घ्यावी म्हणजे भरपूर पदार्थ खायला मिळतात..) वर ice-cream किंवा desert खावं..(specially Belly's chocolate bar मधे जाऊन...)परत आल्यावर कुणाच्यातरी घरी बसून timepass करावा..किंवा खा खा खाल्लेलं पचवण्यासाठी colony मधे शतपावली करावी... घरी येउन orkut वर timepass करावा..किंवा परत chatting करावं... झोपता झोपता अचानक आठवावं की अरे आज तर शनिवार होता..weekend चा अजून पूर्ण १ दिवस बाकी आहे... :)
सुख म्हणजे आणखिन काय असतं..????

स्मोकी माऊंट्न... (भाग २)

white water rafting चा अनुभव खूपच अफ़लातून होता. सगळ्यांनी खूप enjoy केलं. नंतर बराच वेळ त्याबद्दल बोलणं चालू होतं. तिथे cofee, hot chocolate, chips etc वर ताव मारताना एकीकडे नदी काठचं photo session चालू होतं. परत येताना रस्त्यातही बरेच फोटो कढून झाले. संध्याकाळी Gatlinberg मधे चक्कर मारायचं ठरलं. Gatlinberg एकदम म्स्त शहर आहे. typical hill station सारखं. एक मोठा रस्ता आणि दोन्ही बाजूला दुकानं, hotels, तिथल्या वेगवेगळ्या जागांची माहिती देणारी आणि booking करणारी offices etc. तिथे acquarium, rope way, bus tour etc गोष्टी होत्या. अमेरीकेतल्या इतर acquiarium प्रमाणेच ह्यांनी ही "larget acuarium in USA" अशी जाहिरात केलीच होती. :) आम्ही ह्याच्यापॆकी कश्यातही न जाता नुसताच timepass केला. थोडीफार बारीकसारीक खरेदी, खाणंपिणं हेही चालूच होतं. हे सगंळं होईपर्यंत ८ वाजत आले होते त्यामूळे cabin वर परतून timpass करायचा असं ठरलं. येताना खायच्या पदार्थांची खरेदी झाली आणि पून्हा तो प्रचंड चढ चढून आमची वरात cabin मधे पोचली.
घरी गेल्यावर दिपक आणि पल्लवी नी chiken ची आणि हेमाली आणि हिरल नी veg ची जबाबदारी घेऊन एकदम धडाक्यात कामाला सुरवात केली. बाकीचे आपले (including me :) उगाच काहितरी करतोय असं दाखवून इकडे तिकडे timepass करत होते :). chiken चा वास एकदम मस्त सुटला होता. त्यामुळे cooker चं झाकणं पडेपर्यंही कोणाला धिर नव्हता. दरम्यान veg वाल्यांनी आम्हाला चिडवून खायला सूरवात पण केली. हरप्रकारे प्रयत्न करून एकदाचं ते झाकण उघडलं आणि सगळ्यांनी जेवणावर जोरदार ताव मारला. जेवण झाल्यावर गप्पांचा अड्डा जमला. सगळे होते त्याच जागी हातही नं धूता २-३ तास तसेच बसले होते. आलोकचा वाढदिवस असल्याने cake कापणे, तो त्याच्या तोंडाला लावणे हे सगळंही रात्री १२ ला प्रथेप्रमाणे पार पडलं. :)
आदल्या दिवशी दिपक ने सगळ्यांना लवकर उठवल्याने आज त्याला दोरीने बांधून झोपवा अशी idea अर्पणा ने दिली. शेवटई सग्ळ्यांनीच धमक्या दिल्याने दुसर्या दिवशी त्याने कोणाला उठवायची हिंम्मत केली नाही. :) सगळए नीवांत पणे १०- १०:३० ला उठले. नंतर टिव्ही बघत बसले. मला एकदम रविवारी सकाळी उठून घरी टिव्ही बघत बसायचो त्याची आठवण झाली. chicago च्या मंडळींनी यायला फ़ारच उशिर केला. शेवटी एकदाचे आम्ही १ वाजता बाहेर पडलो. Gatlinberg tourist centre मधे माहिती घेउन पुढे निघालो. smokey mountains मधल्या सर्वात उंच ठिकाणी जायचे होते. गाडी park करून सधारण mile भर चालत जावे लागते. पण तिथे डांबरी रस्ता असल्याने trecking chi मजा येत नाही. फोटो काढायला खूप scope आहे. या ठिकाणी झाडांवर किड लागली आहे. त्यामुळे झाडांची पानं जाऊन खराटे झाले आहेत. पण त्यामुळे फोटो काढायला बरं पडतं. :)

तिथून खाली येउन दुसर्या डोंगराच्या पायथ्याशी गेलो. मधे st. louis हून तिथे आलेली अजून एक gang भेटली. त्या डोंगरावर rainbow waterfall आहे. सुमारे ३ mile चालून जावं लागतं. खूप दाट झाडीतून पायवाट जाते. एकाबाजूला झरा आहे. आम्ही वर जायला सुरूवात केल्यावर लगेचच ग्रुप विभागला गेला. पल्लवी, मी आणि देनीश सगळ्यात पुढे होतो. मधे मधे परत येणारी लोकं भेटत होती. बरेच जणं म्हणत होते की तुमच्याकडे tourch नसेल तर वर जाऊ नका कारण परत येई पर्यंत अंधार पडेल. पण तरीही आम्ही चालतच राहीलो. मधे मधे झरा ओलांडण्यासाठी लाकडी पूल होते. तो rainbow धबधबा फ़ार काही भारी नव्हता. पण तिथे जायला यायला खूप मजा आली. येताना खाली येई पर्यंत अंधार पडलाच होता. आणि भराभर खाली यायच्या नादात सगळे घसरून पडायला लागले. :) पण एकूणच सगळं म्हणजे झाडी, जंगलातला ओला वास, मधेच लांबून कुठूनतरी येणारे पक्ष्यांचे आवाज सगळं छान होतं. निर्सगाच्या सानिध्यात नेहमीच छान वाटत.

घरी परतल्यावर chieken barbecue चा बेत होता. पल्लवी नी एकदम tasty chicken बनवलं होतं. परत आदल्यादिवशी प्रमाणे ३-४ तास गप्पा झाल्या. देनीश mimicry expert असल्याने तो ही कार्य़क्रम झाला. नंतर भांडी dish washer मधे लावायचं काम मला आणि देनीश ला दिलं होतं. overall सग्ळ्या महिलांनी मिळून kitchen मधे खूप पसारा घातला होता. :( (आमचं bachelors चं kitchen पण त्याच्यापेक्षा स्वछ असतं. :P) दुसर्या दिवशी निघायचं होतं. त्याचे plan झाले. ८ पासून सुरूवात होऊन शेवटी १०:३० ही वेळ ठरली आणि प्रत्यक्षात आम्ही ११ ला निघालो. :) त्या cabin मधे एकदम पूणेरी style नी पाट्या लावलेल्या होत्या. e.g कचरा बाहेर ठेवला नाही तर १०$ दंड. किल्ली इथेच ठेवावी, towels तिथेच ठेवावे इत्यादी. :) त्यामूळे ते सगळं तपासण्यात अर्धा तास गेला. येताना Gatlinberg मधे go karting दिसल्यावर तिथे ही जाणं झालं.

येतानाचा प्रवास दिवसा होता त्यामूळे जाताना जे काही बघता आलं नव्हतं ते पण बघता आलं. drive अतिशय प्रेक्षणिय होता. येतानाच्या रस्त्यात Indiana राज्यं पण लागलं. येताना मी पण गाडी चालवली. :) एव्हडी मोठी गाडी मी पहिल्यांदाच चालवत असल्याने अर्पणा ला जरा भिती वाटत होती. पण मझ्यावर लक्ष ठेवायला दिपक ची खास नेमणूक झाली होती.( तरीपण अर्पणा मागे बसून माझ्या बाबांच्या style मधे "पराग, तो truck वाला इकडे येतोय,..तिकडे पोलिस आहे.... ही गाडी गेली की मग lane change कर.." अश्या सूचना देत होती. ..मला खूप हसू येत होतं..:)
देनीश ने गण्यांच्या एव्ह्ड्या CDs आणल्या होत्या की ३ दिवस ऐकूनही त्या संपल्या नव्हत्या. एकूण ट्रिप फारच छान झाली होती. अगदी ऐनवेळी ठरूनही कुठलेही गोंधळ, issues न होता व्यवस्थित पार पडली होती. मुख्य म्हणजे सगळ्यांनी पूरेपूर enjoy केली होती. (म्हणजे निदान वाटत तरी होतं तसं. :) ग्रुप चांगला असेल तर तुम्ही कुठेही गेलात तरी खूप मजा येते आणि ह्या ट्रिप मधे नेमक तेच झालं.
साधारण १० ला आम्ही परत पोचलो. आणि अचानक "oh no... उद्या office" अशी आठवण काढून सगळे वास्तवात परत आले. :)

स्मोकी माऊंट्न... (भाग १)


मागच्या महिन्यात सुट्टी घेउन पुण्याला जाउन आलो. इथे परत येउन बघतो तर सगळे जोरदार memorial day long week end च्या ट्रिप च्या तयारी ला लागले होते. खूप जणांच्य़ा ट्रिप ठरलेल्या होत्या किंवा मी जाउन आलेल्या ठिकाणी जाणार होते. त्यामुळे long week end १५ दिवसांवर येउन ठेपला तरी काही ठरतच नव्हते. मला भिती वाटायला लागली की सुट्टी वाया जाते का काय? अचानक एक दिवस माझा PM म्हणाला तुझं काही ठरलं नसेल तर आपण smokey moutains जाऊ. आजून दोघ जण पण सापडले ज्यांचं काही ठरलेलं नव्ह्तं. पण problem हा होता की ५ जणांपैकी ४ जण married आणि मी एकटाच bachelor (कबाब मे हड्डी). शेवटी असं ठरलं की मला company म्हणून अजून एक bachelor शोधायचा. शोधाशोध केल्यावर कळलं की आमच्याच colony मधे राहाणार्या अणि आमच्या चांग्ल्या ओळखीच्या अजून तिघांचा काही plan झालेला नाही. त्यामुळे ते लगेचचं यायला तयार झाले. अखेर २ couples आणि ४ bachelors असा ८ जणांचा ग्रुप ठरला. त्यातल्या एका couple नी (शंतनू & अर्पणा पाल) smokey आधि पाहिलेलं होतं त्यामुळे ग्रुप ठरल्यावर location वरून "चर्चा" चालू झाली. पण आमच्या PM नी (दिपक) "PM गिरी" करून त्यांना smokey ला चलायला तयार केलं. शंतनू आणि अर्पणा चं २ संध्याकाळी मिळून सुमारे ६ तास डोकं खाऊन आणि माझा स्वत:चा पूर्ण शनिवार घालवून अखेर pigonforge गावात एक cabin ( जंगलातलं अत्याधुनीक सोइंनी सुसज्ज लाकडी घर) आणि ८ जण बसू शकतिल अशी गाडी book केली. आम्ही चौघ (मी, देनीश, शिखा आणि हिरल) तिथे काय काय करता येइल ह्याची शोधाशोध करायला लागलो आणि अर्पणा आणि आमच्या PM च्या "ह्या" (हेमाली), बरोबर घेउन जायच्या गोष्टींची यादी करायला लागल्या. cabin मधे well equiped kitchen असल्याने barbecue चा बेत ठरला होता. शंतनू नी ती यादी इतक्या सुंदर अक्षरात लिहीली की मी ती वाचून इमेल मधे type करताना ice च्या जागी rice आणि बेसन च्या जागी मॆदा लिहीलं आणि त्याच्या अक्षरात नाही माझ्या वाचण्यातच problem आहे असं conclusion निघून अर्पणा आणि हेमाली च्या शिव्या खाव्या लागल्या. निघायच्या दिवशी सकाळी white water rafting चं booking करून आणि driving directions, booking receipts etc च्या printouts घेऊन साधारण २:३० लाच office मधून सटकलो. त्या दिवशी office मधे वातावरण पण मस्तं होतं. जवळ जवळ ६ महिन्यानी long week end असल्याने सगळेच म्हणजे देसी पण आणि फ़िरंगी पण ट्रिप ला जायच्या तयारीत होते.
आमच्या गाडीत सामान ठेवायला जागा खूपच कमी होती त्यामुळे ८ जणांच सगळं सामान गाडीत बसवताना खूप त्रास झाला. पाण्याच्या आणि cold drink च्या बाट्ल्या आणि chips ची पाकीटं तर जागा मिळेल तिथे कोंबली होती. (एकदा पाण्याची बाटली सापडत नसताना हेमाली नी शंतनू ला सांगितलं होतं "जरा जोरात break दाबा. कुठ्ल्यातरी seat खालून पाण्याच्या बाटल्या बाहेर येतिल." :) तर एकंदर सर्व तयारीनीशी आमचा लवाजमा southmoor मधून बाहेर पडला. साधारण १० तासांचा प्रवास होता. आम्ही illinios, kentucky आणि Tenessee राज्यांमधून जाणार होतो.
Illiniose ची हद्द संपून Kentucky सुरू झाल्यावर एकदम हिरवळ आणि झाडी वाढली. (बहुतेक Illiniose आणि Missouri, US मधली भकास राज्ज असावित. st louis- chicago drive फार उदास आहे.) बाहेरील देखावे खूपच सुंदर होते. दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि मधून जाणारा हायवे. फोटो काढायचा मोह आवरत नव्हता. देनिश साहेबांच्या क्रुपे ने गाडीत "समग्र Bobby Deol" गाणी चालू होती. देनिश Bobby Deol चा खूप मोठा fan आहे. कधिही न ऐकलेली गाणीही ऐकून झाली. Bobby Deol ला कळलं की आपल्याला एव्हडा जबरदस्त fan आहे तर त्यालाही आश्चर्यच वाटेल. :) मधे मधे आमचेही अंतक्षरी आणि तत्त्सम प्रकार चालू होते. हिरल आणि शिखा कडे ह्या बाबतित खूप चं नविन idea होत्या. शिखा आणि देनिश चा हिंदी movies अणि गाणी ह्या बद्द्ल चा database ही अफाट आहे. craker barrel मधे मस्त dinner झाल्यावर सगळेच पेंगुळले. दिपक आणि शंतनू एकमेकांना जागं ठेवायचं काम करत होते. एकूण प्रवास चांगला झाला.
Gatlinberge, TN शहरात पोचल्यावर directions बघुन cabin शोधण्याचं काम चालू झालं. त्यावेळेला कल्पनाही आली नाही की आमच्या adventure trip मधलं ते पहिलं "साहस" ठरेल. cabin booking मी केलेलं असल्याने आणि सकाळी मी त्या माण्साशी फोन वर बोललेलो असल्याने एकदम "पराग ला उठवा" असा गलका चालू झाला. आधि एका गल्लीत सुमारे ३ miles जाउनही पुढचा रस्ता येइचना...मग u-turn असा कार्य़क्रम प्रथे प्रमाणे २-३ वेळा पार पडला. अखेर त्या directions मधली शेवटून दुसरी step असलेला रस्ता आला. तो रस्ता म्हणजे जंगलातली, जेमतेम एक गाडी जाऊ शकेल अशी, गल्ली. दोन्ही बाजूंना घनदाट झाडी आणि मिट्ट काळोख. त्या रस्त्यावार u-turn मारायलाही जागा नव्हती. त्यामुळे dead-end पर्यंत जायचं आणि कशिबशी गाडी वळवून परत यायचं असा प्रकार चालू होता. मधे मधे एखादं पडकं घर किंवा तुटकी गाडी दिसत होती. ते सगळं एखाद्या horror movie मधे शोभेल असं होतं. त्या रस्त्यावरच्या सगळ्या गल्या शोधुन संपल्या तरी आमचं cabin कुठे दिसेना. आता मात्र सग्ळ्यांची झोप उडली होती. तेव्ह्ड्यात तिथे एक जरा बरं घर दिसलं. त्याच्यासमोर अधिच गाड्या उभ्या होत्या पण कदाचित दुसरी बाजू आम्हाला दिली असेल असा निष्कर्श काढून आम्ही त्याचं दुसरं दार शोधायचा प्रयत्न करु लागलो. एका दारा समोर आल्यावर तिथला दिवा अपोआप चालू झाला. तेव्हातर सगळे एकदम टरकले होते. शेवटी त्या गल्ली मधून बाहेर निघून main road ला लागायचं ठरलं. ते करत असताना आणखी एक गल्ली दिसली आणि एव्हडं शोधलच आहे तर एथेही पाहू असा विचार करून तिथे शिरलो. तिथे प्रचंड चढ होता आणि आता गडी उलटी मागे जाते की काय अशी भिती वाटायला लागली. अखेर तो गड चढल्यावर अचानक आमचं cabin समोर दिसलं. computer, mobile, map ह्यांचा वापर न करता सगळ्या engineers नी मिळून आखेर cabin शोधून काढलच होतं. :) cabin एकदम छान होतं. ३ बेडरूम, २ toilets, बाहेर मस्त patio, सगळी electronic euipmets आणि सुसज्ज kitchen. तिथे पोचल्यानंतर सगळे भूतांच्या आठवणी काढून हसत होते.

दुसर्या दिवशी सकाळी white water rafting ला जायचा कार्य़क्र्अम होता. दिपक ८ वाजल्यापासूनच सगळ्यांना उठवत होता आणि अगदी office मधल्यासारखं दर १० मिनीटांनी follow-up पण घेत होता. तो पर्यंत महिलामंडळानी kitchen चा ताबा घेउन पोहे आणि चहा बनवला.(चहा पोहे नाही. :) सग्ळ्यांचं आवरे पर्यंत chicago हून येणारा ग्रुप (पल्लवी, आलोक, नील) पण आला. ६ मराठी (त्यातही २ मुंबई २ पूणे आणि २ उत्तर महाराष्ट्र) , २ गुजराथी, २ बंगाली आणि १ उत्तर भारतिय असा अगदी विविधतेत एकता असलेला आमचा ग्रुप होता. :)
white water rafting Tenesse आणि north carolina राज्यांच्या सीमेवर होतं. cabin पासून साधारण १ तासाच्या अंतरावर होतं. तिथे जाता जाता आदल्यादिवअशी रात्री कुठल्या रस्त्यांवरून फ़िरत होतो हेही बघायला मिळालं. :) Gatlinberg आणि pigonforge परीसर खूप सुंदर आहे. अगदी हिमालयातल्या hill stations ची आठवण करून देणारा. खूप घनदाट जंगल, वळ्णावळणाचे रस्ते फोटो कढायला तर खूपच छान. मधे मधे फोटो काढण्यासाठी खास जागा ही तयार केल्या आहेत. आमची ही २-३ photo sessions करून झाली. रस्ते अरूंद असूनही वाहातूक आणि parking अतिशय शिस्तबद्ध होती. (weekend ला आपल्याकडे सिंह्गड वर होणारा mess आठवा.)
whitewater rafting site वर गेल्यावर आधि सगळ्या formalities पूर्ण केल्या. नंतर आम्हा ११ जणांना ५ आणि ६ अश्या २ ग्रुप मधे विभागलं. नंतर आमच्या instructor नी आम्हाला life jacket आणि helmet etc दिलं आणि rafting बद्दलचे फ़ंडे सांगितले. आमचा instructor एकदम उत्साही आणि खूप बडबड्या होता. नंतर आम्हाला एका बस मधून rafting च्या starting point ला नेलं. तिथे पून्हा थोड्या सूचना दिल्यावर rafting चालू झालं. instrctor सांगेल त्याप्रमाणे वल्हं मारत आणि स्वत:चा तोल संभाळत rafting चालू होतं. रबरी बोटीत बसून नदीच्या जोरदार प्रवाहा बरोबर हेलखावे खाणं खरच वर्णन करण्याच्या पलिकडचं आहे.

एकदातरी प्रत्येकाने हा अनूभव घ्यायलाचं हवा. नदी काठाचा परिसर ही अतिशय रम्य होता. आणि instuctor बरीच माहिती देत होता. शिवाय आम्हा सग्ळ्यांना खूप उत्साह असल्याने, raft पाण्यात गोल फिरवणे, प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने raft नेणे अश्या गोष्टी ही तो आमच्याकडून करून घेत होता. rafting साधारण ३ mile होतं आणि सुमारे २ तास लागले. शेवटच्या टप्प्यात नदी संथ आणि खोल असल्याने swimming ही करणं झालं. पण नदीचा प्रवाह खूप संथही नव्हता आणि त्यामूळे दिपक, हेमाली आणि हिरल ला दोरी टाकून पाण्याबाहेर ओढावं लागलं. :)