हे असचं चालायचं...

हे पोस्ट असचं.. उगीच.. खर्या अर्थानी "लोकाग्रहास्तव" :D
इथे परत आल्यापासून वाचन वाढल्याने ब्लॉग अपडेट करणं कमीच झालय... काही वेळा लिहायचं असतं पण राहून जातं.. काही वेळा आळस नडतो.. तर काही वेळा उगीच टाळाटाळ होते.. पण आज सकाळ पासून जरा जास्तच जणांनी ब्लॉग बद्दल विचारल्यावर मात्र आज लिहून बघायचच असं ठरवलं होतं.. बघू या हा tempo किती दिवस राहातोय ते...

गेले अनेक दिवस चालत आलेल्या पण माझ्या अलिकडेच लक्षात आलेल्या काही गोष्टी..
१. प्रत्येक apprisal cycle मधे माझ्या टिम ला काहीही ratings दिली तरी "तू तुझ्या टिम शी फारच linient वागतोस.." अश्या शब्दातल्या माझ्या बॉस च्या आणि "कितीही काम केलं तरी तू आम्हाला हवी ती ratings कधीच देत नाहिस" अश्या माझ्या टिम च्या म्हणजे दोन्ही कद्डच्या शिव्या मलाच खाव्या लागतात.. आणि तरीही दोघांचही समाधान होईल अशी काहितरी थातूर मातूर उत्तर ही द्यावी लागतात..
२. कुठल्याही खेळाशी related hindi movie मधे अगदी (लगान पासून गोल पर्यंत via चक दे इंडिया..) भारतीय वंशाच्या खेळाडूंसाठी तो फक्त सामना नसून "जीने मरने का" किंवा "सर उपर उठाके चलने" का वगैरे सवाल असतो.. भारतीय लोकं एखादा खेळं हा खेळं म्हणूनच का नाही खेळू शकतं?
३. एखादा पाकिस्तानी खेळाडू इतर कोणत्याही देशाविरुद्ध चांगला खेळत नसला तरी भारताविरूद्ध मात्र खोर्य़ाने runs किंवा wickets काढतो.. e.g. अकिब जावेद (आठवतोय का हा?), सलिम मलिक किंवा आत्ताचे सलमान बट, मिसबाह इ..
४. पूर्ण कपड्यांमधे बिपाशा बसू कितीही चांगली दिसत असली तरी एकदा तरी तिला कमी कपडे घालायला लावल्याशिवाय कुठचिही movie पूर्ण होऊ शकत नाही.. ! (आठवा.. गोल मधला तो पिवळा ड्रेस..)
५. कुठच्यही प्रकारच्या लाईन मधे उभं असताना म्हणजे रेल्वे रीझर्वेशन असो किंवा अगदी कॅंटिन मधली कुपन घ्यायची लाईन असो..आपण उभं असतो ती सोडून दुसरी लाईन भराभर पुढे सरकते..
६. मला जेव्हा फारच बोर झालेलं असतं तेव्हा messenger वर कोणिच online भेटत नाही आणि जेव्हा मी call वर किंवा desk वर कोणाशी बोलत असतो तेव्हा कधिही न उगावणारे लोक पण धुमकेतू सारखे अचानक येऊन मला ping करून शिव्या घालून जातात पण.. आणि वर इतर सर्व माध्यमातून "तू हल्ली reply पण करत नाहिस" वगैरे वगैरे शिव्या पुढचे अनेक दिवस घालत बसतात..
७. मला जेव्हा वेळेवर घरी जायला निघायचं असतं तेव्हा बॉस ला निघायच्या आधी १५ मिनीट काहीतरी अति महत्त्वाचं काम सुचतं आणि ते करण्यात माझी बस हमखास चूकते.. !
८. जेव्हा मला खूप काम असतं तेव्हा एका वेळी चार चार जणं कॉफी ला जायचं का म्हणून विचारतात आणि नाही तेव्हा त्या चारही जणांना कामं असतात..
९. कॉल चालू असताना, मिटींग मधे, session मधे, बस मधे मला एखादा लई भारी topic सुचून ह्या वर खूप सही पोस्ट होईल असं वाटून जातं आणि प्रत्यक्षात घरी येऊन लिहायला बसल्यावर काहीच सुचत नाही.. आणि नंतर मग उगिच ह्या सारखं एखादं टुकार पोस्ट टाकलं जातं... :)