हे पोस्ट असचं.. उगीच.. खर्या अर्थानी "लोकाग्रहास्तव" :D
इथे परत आल्यापासून वाचन वाढल्याने ब्लॉग अपडेट करणं कमीच झालय... काही वेळा लिहायचं असतं पण राहून जातं.. काही वेळा आळस नडतो.. तर काही वेळा उगीच टाळाटाळ होते.. पण आज सकाळ पासून जरा जास्तच जणांनी ब्लॉग बद्दल विचारल्यावर मात्र आज लिहून बघायचच असं ठरवलं होतं.. बघू या हा tempo किती दिवस राहातोय ते...
गेले अनेक दिवस चालत आलेल्या पण माझ्या अलिकडेच लक्षात आलेल्या काही गोष्टी..
१. प्रत्येक apprisal cycle मधे माझ्या टिम ला काहीही ratings दिली तरी "तू तुझ्या टिम शी फारच linient वागतोस.." अश्या शब्दातल्या माझ्या बॉस च्या आणि "कितीही काम केलं तरी तू आम्हाला हवी ती ratings कधीच देत नाहिस" अश्या माझ्या टिम च्या म्हणजे दोन्ही कद्डच्या शिव्या मलाच खाव्या लागतात.. आणि तरीही दोघांचही समाधान होईल अशी काहितरी थातूर मातूर उत्तर ही द्यावी लागतात..
२. कुठल्याही खेळाशी related hindi movie मधे अगदी (लगान पासून गोल पर्यंत via चक दे इंडिया..) भारतीय वंशाच्या खेळाडूंसाठी तो फक्त सामना नसून "जीने मरने का" किंवा "सर उपर उठाके चलने" का वगैरे सवाल असतो.. भारतीय लोकं एखादा खेळं हा खेळं म्हणूनच का नाही खेळू शकतं?
३. एखादा पाकिस्तानी खेळाडू इतर कोणत्याही देशाविरुद्ध चांगला खेळत नसला तरी भारताविरूद्ध मात्र खोर्य़ाने runs किंवा wickets काढतो.. e.g. अकिब जावेद (आठवतोय का हा?), सलिम मलिक किंवा आत्ताचे सलमान बट, मिसबाह इ..
४. पूर्ण कपड्यांमधे बिपाशा बसू कितीही चांगली दिसत असली तरी एकदा तरी तिला कमी कपडे घालायला लावल्याशिवाय कुठचिही movie पूर्ण होऊ शकत नाही.. ! (आठवा.. गोल मधला तो पिवळा ड्रेस..)
५. कुठच्यही प्रकारच्या लाईन मधे उभं असताना म्हणजे रेल्वे रीझर्वेशन असो किंवा अगदी कॅंटिन मधली कुपन घ्यायची लाईन असो..आपण उभं असतो ती सोडून दुसरी लाईन भराभर पुढे सरकते..
६. मला जेव्हा फारच बोर झालेलं असतं तेव्हा messenger वर कोणिच online भेटत नाही आणि जेव्हा मी call वर किंवा desk वर कोणाशी बोलत असतो तेव्हा कधिही न उगावणारे लोक पण धुमकेतू सारखे अचानक येऊन मला ping करून शिव्या घालून जातात पण.. आणि वर इतर सर्व माध्यमातून "तू हल्ली reply पण करत नाहिस" वगैरे वगैरे शिव्या पुढचे अनेक दिवस घालत बसतात..
७. मला जेव्हा वेळेवर घरी जायला निघायचं असतं तेव्हा बॉस ला निघायच्या आधी १५ मिनीट काहीतरी अति महत्त्वाचं काम सुचतं आणि ते करण्यात माझी बस हमखास चूकते.. !
८. जेव्हा मला खूप काम असतं तेव्हा एका वेळी चार चार जणं कॉफी ला जायचं का म्हणून विचारतात आणि नाही तेव्हा त्या चारही जणांना कामं असतात..
९. कॉल चालू असताना, मिटींग मधे, session मधे, बस मधे मला एखादा लई भारी topic सुचून ह्या वर खूप सही पोस्ट होईल असं वाटून जातं आणि प्रत्यक्षात घरी येऊन लिहायला बसल्यावर काहीच सुचत नाही.. आणि नंतर मग उगिच ह्या सारखं एखादं टुकार पोस्ट टाकलं जातं... :)
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
18 प्रतिसाद:
laei bhari.............
ekdam manatl.....
आयला, मस्तच रे! :)
हाताखालच्या लोकांवर रौंक झाडायचा रे, घाबरायचं नाय त्यांना. म्हणा, हे आहे असं आहे, पटत नसेल तर ग्रूप / कंपनी बदला! :)
तू बिप्सचं इतकं कौतुक केलंयेस की तिच्या येलो ड्रेससाठी पहावा लागेल आता ’धन धना धन गोल’.. बाकी, ’काही लोक’ जर जॉन साठी पाहू शकतात तर आपल्यालाही बिप्ससाठी पहायचा ’नैतिक’ अधिकार आहेच, नाही का? ;)
’हे असंच चालायचं’ नावाची वपुंची एक धमाल कथा होती - हे तुला माहित आहे कां?
लिखते रहो!
Thanks Milinda.. :)
Circuit... ho ho agdi barobare.. 'lok' JA sathi kontehi picture pahatat.. apan bips sath ekhada pahila tar kahich harkat nahi.. :D corporate pahila nasshil tar to hi paha.. fakta bips sathi.. !
circuit mhanto tasa bips chya tya yellow dress karta Goal pahaaylaa paahije aata :D
yaadi mast jamli aahe. jasa jamel, tasa lihit jaa... tu mhantos tey agdi patla - ekhaadi idea suchte... pan nantar thodya velaani aapan jevha ti lihaayla gheto, tevha jamat naahi neet... mag parat "kaa ugich mi kahitari lihit basat aahe"... ase vichaar yetaat :D
pratyek veles aapan aaplya swataha baddal chya apeksha unchaavat jaato...
pan harkat naahi.. lihilyaavar ek veglach satisfaction milta... lokaanchya kaay comments yetil.. hey kutuhal raahta.. aani gammat mhanje, s'times ppl do give u different perspectives... mhanje tu lihitaanaa tujhya manaat kaay aahe, hey tyanna kalo na kalo - pan tyaanchi comment vaachlyaavar, u will definitely get a different/fresh perspective :)
lihit rahaa asaach!
parag, ek post 'bips' varach lihi na.. kinwa 'kahi lokanna JA kasa kay awaDoo shakato bara????' asa paN chalel :-PPP
पूनम, ’काही लोकांना JA कसा काय आवडू शकतो बुवा?’ ह्या टायटलचं पोस्ट लिहीणं फ़ार टेम्प्टिंग आहे; पण तसं करून आणखी मातब्बरांशी पंगा घ्यायची हिंमत कमी पडत्येय , त्याचं काय? ;)
’काही लोकांना JA कसा काय आवडू शकतो बुवा?’ हे पोस्ट त्याच्या टायटल सकट सुमार दर्जाचं, टुकार आणि अजिबात क्रिएटिविटी नसणारं आहे हा माझा अभिप्राय मी आत्ताच नोंदवून ठेवते. पूनम मुझे तुमसे तो ये उम्मीद नही थी.
बाकी गोल मी [अर्थातच:))]पाहीलाय पण त्यातल्या बिप्सचा तो यलो वगैरे ड्रेस माझ्या लक्षातही नाहीये. त्यात इतर बरंच काही बघण्यासारखं होतं:D पण एकंदरच ’तिच्यावर’ हा असा पिवळ्या रंगाचा ( किंवा कोणताही) ड्रेस असणं जरासं visually assaulting च कस्काय नाही वाटलं तुम्हांला?:P
Thanks Ketan.. :)
Poonam, blog sathi naveen topic suchavlyabaddal dhanyawad.. :D :D
Circuit.. Ugach prasthapintanshi pange gheu nayet.. :D :D
Tulip.. thanks barka.. mazya "tya" blog var me swatch tuzya nave comment lihun taken.. (chala.. eka tari comment chi soy zali..) :P :P
Yes. I totally agree. Pan jevha changle topics suchtat - tevha te barech divas cold storage madhye ka re rahtat?
ekdum chhan yadi banalye!
apan ubhe ahot ti raang kayamch slow pudhe sarakate ha nehemichach anubhav ahe.. pan mag nehemi prashn padato ki tya dusrya linit kon ubha asta?tyanchyabarobar asa ka nahi hot?
parag sahi lihilayes....mala pan GOAL baghava lagel asa vattay....
hmmm sahich barakaa? apunako sabkuch patya.... :)
hi
khup diwasani changala marathi blog vachalyla millala . if you don't mind can you write in bigger font or make the background lighter. keep writing.
yeu det ki nav kahi... kiti sustavaNar?
आणि प्रत्यक्षात घरी येऊन लिहायला बसल्यावर काहीच सुचत नाही.. आणि नंतर मग उगिच ह्या सारखं एखादं टुकार पोस्ट टाकलं जातं... :)
Can't agree more. But this one is, sure a very good post :-)
आणि प्रत्यक्षात घरी येऊन लिहायला बसल्यावर काहीच सुचत नाही..>>> keep diary with you! :)
barobar aahe ..
samadukhhi
तुझ्या पहिल्या गोष्टीवरुन सुचलेल्या अजून काही गोष्टी ... अर्थात related to software field ....
आय.टी वाल्या लोकांना मनासारखा project बहुतेक कधीच मिळत नाही :)
मिळालाच तर तो बरेचदा स्क्रॅप होतो ... ( तसेही न आवडलेले ही स्क्रॅप होतच असतात :) )
आपण हे काय काम करत बसलोय असा फील खूपदा येत असतो.
..... आणि मग इतरांशी बोलल्यावर सगळ्यांचं थोडंबहुत आपल्यासारखंच झालंय असं लक्षात येतं ... आणी उगीचच बरं वाटतं ! :)))))
-अश्विनी.
Post a Comment