विजेता..

काल library मधून बाहेर पडता पडता एक पुस्तक दिसलं.. छोटसच होतं ६०/६५ पानी.. मी ते घेऊन counter वर गेलो तर तिथली आज्जी म्हणाली "अरे.. हे chindren section मधलं आहे.. तुला नक्की हवय का हे.." म्ह्टलं ठिके chindren तर children पण दे मला... मला ते लगेच तिथेच बसून वाचावसं वाटत होतं.. तर ते पुस्तक होतं.. The Great Athlete : Pete Sampras. १९८८ ते २००३ अश्या तब्बल १५ वर्षांच्या कारकिर्दित सुमारे १२ वर्ष तरी ह्याने Men's tenis वर सत्ता गाजवली...



वॉशिंग्टन मधे जन्मलेल्या आणि नंतर पालकांबरोबर कॅलिफ़ोर्नियाला गेलेल्या पिट ने वयाच्या ७ व्या वर्षी रॅकेट धरली... डॉ. फिशर ह्यांच्या मार्गदर्शना खाली टेनिस खेळायला सुरुवात केलेल्या पिट ने त्यांच्याकडून long term उपयोगी पडतिल अश्या काही गोष्टी शिकल्या.. त्याच्या वयोगटात तो जिंकत असताना डॉ. फिशर ह्यांनी त्याला दोन हातांनी मारायचा बॅक हँड मारण्यास बंदी केली आणि single handed backhand घोटून घ्यायला सुरुवात केली... त्याचा सगळ्यात हुकमी असलेला हा फटका मारणं बंद केल्याचा सहाजिकच त्याच्या खेळावर परीणाम झाला आणि तो सामन्यांमागून सामने हरू लागला... ह्या प्रकारात त्याचा संपूर्ण एक season वाया गेला आणि junior ranking सुद्धा जोरदार ढासळलं... पण तरिही डॉ. फिशर त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि single handed backhand चा सराव करून च घेत होते.. पुढे हेच त्याचे सगळयात महत्त्वाचे अस्र ठरले आणि ह्याचा जोरावर त्याने समोरच्याला नामोहराम केले.. खरच तो बॅकहॅंड पासेस ज्या सहजतेने मारत असे ते पाहून "बॅकहॅंड मारणं इतकं सोप्प असत?" असं कितीतरी वेळा वाटून जात असे.. ह्या फटक्याबद्द्ल पिट म्हणतो.. "I accepted that it was a shot I was going to hit forever. The older and stronger I got, the better the shot became." डॉ. फिशर त्याच्या कडून सर्व्हिस चा सराव करून घेताना देखिल त्याने बॉल वर फेकल्यावर त्याला कोणत्या प्रकारची सर्व्ह करायची आहे हे ओरडून सांगत.. ह्यामूळे सर्व्हिस कोणत्याही प्रकारची असो, त्याच्या सुरुवातिच्या हालचालीवरून येणारी सर्व्ह कोणत्या प्रकारची असेल ह्याचा समोरच्याला अजिबात अंदाज लागत नसे....ह्याबरोबरच ते त्याला त्याचापेक्षा मोठ्या वयोगटात खेळायला लावत.. ह्यामुळे त्याला सुरुवातिला काही सामन्यांमधे हार पत्करावी लागली पण नंतर त्याचा नक्कीच फायदा झाला...
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायिक टेनिसपटू व्ह्यायचं ठरवलं... पहिल्या वर्षात विषेश चमक न दाखवू शकलेला पिट पुढच्या मोसमापासून मात्र चमकदार कामगिरी करू लागला.. पहाता पहाता पहिल्या १०० खेळाडूंमधे तो जाऊन पोचला... १९८९ च्या अमेरीकेन ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत त्याची गाठ गतविजेत्या मॅट्स विलेंडर बरोबर होती... त्याने विलेंडर ला पराभवाचा धक्का देऊन दुसरी फेरी गाठली.. त्याच्या कारकिर्दितली ही सर्वोत्त्म कामगिरी होती... ह्या बद्द्ल तो म्हणतो.. "I just couldn't get over it.. I remember driving back to the hotel around midnight, and I just couldn't believe I was still in the tournament when everyone expected me to loose."
पुढच्या वर्षीच्या अमेरीकन ओपन स्पर्धेत देखिल त्याच्याकडून एखाद दुसरा अनपेक्षित विजय सोडल्यास फारशी अपेक्षा कोणी ठेवली नव्हती... पण पहिल्या काही फेर्यांमधे इव्हान लेंडल, जॉन मेकॅन्रो अश्या दिग्गज्यांना धक्के देत त्याने थेट अंतिम फेरीत धडक मारली... शांत, थंड डोक्याचा, पांढरे कपडे घालून खेळणारा, कोर्ट वर अजिबात अवाक्षरही न काढणारा सॅंम्प्रस विरुद्ध रंगिबेरंगी कपड्यात वावरणारा, लांब केस, कानात डूल, जोरदार अशी style आणि ओरडा आरडा करणारा आगासी अशी ही लढत म्हणजे विरोधाभासाचा उत्तम नमूना होती... आगासी चा ३ सेट मधे धुव्वा उडवून सॅंम्प्रस वयाच्या १९ व्या वर्षी सर्वात तरून अमेरीकन विजेता ठरला.. ह्या सामन्यानंतर आगासी ची प्रतिक्रीया देखिल खूप काही सांगून जाते.. "I came here looking forward to putting on a good show, but surely the better man won. When you can hit a serve with 120 miles of speed on the line, there is not much you can do about it." त्या वर्षी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ३ अमेरीकेन होते.. आणि अध्यक्ष बूश ह्यांनी कोणा एकाचं फोन करून अभिनंदन करायचं असं ठरवलं होतं... सॅंम्प्रस जिंकून सुद्धा बूश ह्यांनी आगासी ला फोन केला होता... हयाबाबत त्याला छेडलं असता "No no.. my phone was off the hook.." असं उत्तर देऊन वाद संपवून टाकला होता... डॉ. फिशर ह्यांनी पिट ला शिकवलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट वर कोणत्याही भावना व्यक्त न करणं... ह्यामुळे समोरच्याला आपल्या मानसिकतेचा अंदाज येत नाही आणि तो गाफ़िल रहातो असं डॉ. फिशर सांगत... पिट कोर्ट्वर इतका शांत किंबहूना भावानाशून्य वावरत असे की पत्रकार त्याच्याबद्द्ल "He has ice water in his veins" असं लिहित असतं...
पुढच्या वर्षी दुखापतींमुळे किंवा वाढलेल्या अपेक्षांमुळे त्याची कामगिरी ढासळली... विंबल्ड्न आणि फ्रेंच स्पर्धेत लवकर पराभव झाल्यावर अमेरीकन ओपन मधेही त्याचा जिम कुरीयर कडून पराभव झाला... मुलाखती देण्यात तसेच शब्द्संपत्ती च्या बाबतित कमकूवत असणार्या पिट ने ह्या पराभवानंतर दिलेली प्रतिक्रिया त्याच्या चांगलीच विरोधात गेली.. " I' ve found out what Michael Chang meants when he said being the youngest champion of slam is like carrying a back pack full bricks around for the next year. That load is now dropped from my shoulders and now I am feeling relieved." त्याच्या "feeling relieved" बद्द्ल मिडिया ने तसेच इतर खेळाडूंनी टिकेची झोड उठवली... आणि पुढे त्याचा खेळ खालावतच राहिला... सॅंम्प्रस देखिल one slam wonder ठरणार अशी टिका समिक्षकांनी केली...
पुढे टिम गुलिक्सन च्या रुपाने त्याला नविन कोच मिळाला आणि त्याचा खेळ परत उंचावू लागला.. १९९३ च्या विंबल्डन मधे तो आणि आगासी फायनल मधे आले... प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा showman आगासी ला होता आणि सॅंम्प्रस ची मिडिया आणि प्रेक्षक देखिल "Bore Pete" म्हणून जोरदार खिल्ली उडवत... पण जाराही विचलित न होता त्याने ५ सेट च्या झुंजित आगासी ला हरवले आणि दुसरे ग्रॅंड स्लॅम जिंकले... आपल्या आनंदाचे प्रथमच प्रदर्शन करीत पिट ने आपले २ टि शर्ट आणि रॅकेट प्रेक्षकांमधे फेकले आणि पुढेही ही परंपरा कायम ठेवली... ब्रिटिश मिडिया ने पिट चे "कौतूक" BORED ON THE FOURHT JULY अश्या headline ने केले..!! कदाचित त्यांना त्यावेळी अंदाज नसावा की हाच BORE PETE पुढे ८ वर्ष ह्या हिरवळीवर राज्य करणार आहे...
पाठोपाठ अमेरिकन ओपन देखिल जिंकून त्याने टिकाकारांची तोंडं बंद केली... नंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही एकूण ७ विंबल्ड्न सह १४ ग्रॅंड्स्लॅम जिंकून त्याने विक्रम केला... एरवी कोर्टवर बर्फासारखा थंड राहाणारा पिट आपला कोच आणि जवळचा मित्र टिम ह्याच्या असाध्य आजारपणाची बातमी ऐकून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत भर कोर्ट वर ढसाढसा रडला होता... पुढे ही स्पर्धा त्याने जिंकली पण ती त्याच्यासाठी सगळयात अवघड स्पर्धा होती...
ह्या काळात त्याचा खेळ बघणं किंवा त्याच्या आणि आगासी च्या जोरदार लढती बघणं खरच मेजवानी असे... सॅंम्प्रस चा कट्टर फॅन असल्याने (आणि आगासी विशेष आवडन नसल्याने) मी त्यांच्या लढतिंमधे कायम सॅंम्प्रस च्या बाजून असे आणि बहूतेक वेळा तो जिंकल्याने मित्राकडून पैजेचा वडापाव देखिल उकळत असे.. :)
पुढे २००१ मधे रॉजर फेडररच्या झंवातात विंबल्डनने देखिल साथ सोडल्यावर सॅंम्प्रस च्या मनात निवॄत्तिचे विचार यायला लागले... ज्या अमेरीकन ओपन ने त्याला पहिले आणि शेवटचे देखिल ग्रॅंड्स्लॅम विजेतेपद दिले, बॅड्पॅच मधून बाहेर पडायला मदत केली त्याच flashing medows वर त्याने एका विषेश कार्यक्रमात साश्रू नयनांनी टेनिस जगताचा निरोप घेतला.... एक विजेता निवॄत्त झाला आणि टेनिस मधले एका पर्व समाप्त झाले............!
काल अचानक हे पुस्तक वाचून सॅंम्प्रस च्या मॅचेस च्या अनेक आठवणी जाग्या झाल्या... आणि एक चांगलं पुस्तक वाचल्याचं समाधान पण मिळालं... अधून मधून अशी positive पुस्तकं वाचत राहावित विनाकारण येणारं frustration दूर करायला बरी पडतात... :)

San Fransisco rocks..

परत एक प्रवास.. अजून एक प्रवास वर्णन... :)
शेवटी आमची किंवा माझी म्हणू पाहिजे तर much much awaited san fransisco (SF) ट्रिप अखेर final झाली.. म्हणजे ट्रिप सगळ्यांची होती.. पण much much awaited निदान माझ्यासाठी होती.. मागे एकदा इथली काही मंडळी तिथे गेली असताना माझं इथे रहायचं नक्की ठरत नव्हतं त्यामूळे cancel झालं होतं तर डिसेंबर मधे मोठठा प्लॅन बनवून bad whether मूळे flight cancel होऊन त्याचा पोपट झाला होता..!!! आता ह्यावेळी तरी काय होतय असं अशी जरा काळजीच वाटत होती.. पण नेहमीप्रमाणे चर्चांची गुर्हाळं होऊन bookings आणि plan फ़ायनल झाला... आपल्याकडे कशी हल्ली समविचारी पक्षांची आघाडी होते तसे आमच्या इथे ही हल्ली समविचारी लोकांचे छोटे छोटे ग्रूप तयार झालेत.. co-ordinate करायला ही बरं पडतं आणि उगाच कोणाचे राग, लोभ, कंटाळे, priorities etc etc संभाळत बसावे लागत नाहीत.. असो त्याबद्द्ल कधितरी detail मधे नंतर... तर आमची जी सधारण ११ जणांची समविचारी आघाडी आहे त्यापैकी ७ जणांनी जायच नक्की केलं आणि बाकीच्यांचाही बाहेरून पाठिंबा होताच म्हणजे आम्हाला air port वर सोडायला न्यायला येणे, लागतिल तेव्हा नेट वरून drections शोधून देणे, जे एका प्रोजेक्ट मधे आहेत त्यांनी back up म्हणून काम करणे etc etc... आमच्यातल्या चौघांना आधी LA ला पण जायचं होतं त्यामूळे ते एक दिवस आधिच रवाना झाले आणि मी, निशांत आणि मिता एक दिवस उशिरा निघून त्यांना SF ला भेटणार होतो.. आमच्या ट्रिप ची सुरुवात अगदी Just in time झाली.. आम्ही सुमारे तास भर लवकर air port वर पोचून देखिल तिथे security मधे भली मोठी लाईन... !! आधी WTC चा आणि नंतर त्या लंडन मधला liquids वापरून करायच्या स्फ़ोटांच्या प्लॅन चा इथे एकूण इतका धसका घेतलाय की security check ह्याला लागणारा वेळ दिवसेंदिवस वाढतच चाल्लाय.. पण काय करणार तो आवश्यक देखिल आहे.... शेवटी flight ची last and final announcement होत असताना आम्ही कसेबसे गेट वर पोचलो... आदल्या दिवशीच्या जागरणाने flight take off व्हायच्या आधी मला झोप लागली पण..! नंतर बराच turblulance पण होता म्हणे... आणि निशांत नी मला उठवायचा प्रयत्न केला होता आणि मी उठलो नाही.. त्यांनी माझ्या झोपेचे किस्से नंतर बर्याचदा लोकांना रंगवून सांगितले.. !! फिनिक्स ला माझा मित्र अश्विन मला air port वर भेटायला येणार होता.. दिड तासाचाच break होता.. आणि सकाळ्च्या अनुभवाने शहाणपण न येऊन मी त्याच्याशी गप्पा मारत बसून अर्धातास आधी security च्या लाईन मधे आलो.. ते आटोपून मला जोरदार धावत गेट पर्यंत पोचावं लागलं.. सकाळी छान व्यायाम झाला आणि जॅकेट, स्वेटर ह्यामूळे जिम मधे येतो तसा घाम पण आला.. !! परत एकदा just in time.. :) सॅन होजे airport ला उतरल्यावर बाहेर आल्याआल्याच एकदम छान वाटलं... हिवाळा असूनही सगळीकडे हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मुख्य म्हणजे उबदार हवा आणि लख्ख सूर्यप्रकाश... !! ह्या वर्षी आमच्या इथे इतका वाईट हिवाळा होता.. :( बर्फ़ ज्या ज्या प्रकारांनी पडू शकतो म्हणजे snow fall, ice rain, flurries, slit etc etc त्या सगळ्याप्रकारांनी पडून झाला.. temp 0 deg celcius झालं की आम्हाला ते गरम वाटायचं.. वारा पाऊस होतेच आणि उरलं सुरलं tornedo पण परवा होऊन गेलं... ह्या सगळ्यामूळे १०/१२ deg celcius आणि ऊन म्हणजे तर अगदी परवणीच... मला आमच्या सॅन रॅमोन च्या ऑफ़िस मधे काही clients ना भेटायला जायचं होतं.. त्यामूळे निशांत मिता ला हॉटेल मधे सोडून मी लगेच तिकडे गेलॊ.. जाताना चा drive जबरी होता... दोन्ही बाजूला डोंगर, हिरवळ, त्यात चरणार्या गाई, मेंढ्या आणि मधे मधे दिसणारी कौलारू घरं... एकदम चित्रातल्या सारखं.. switzerland किंवा typical युरोप मधली जशी वर्णनं असतात त्या सारखं... आमचं ऑफ़िस देखिल एकदम पॉश निघालं.. तिथे लेक साईड canteen आहे.. एव्हड्या scenic आणि सुंदर ऑफ़िस मधे बसून लोकं काम कशी काय करतात कोण जाणे.. मी तिथे either फोटो काढत बसलो असतो किंवा खिडकीतून बाहेर बघत बसलो असतो...

एकूण SF किंवा bay area चा पहिलं दर्शन फ़ारच सुंदर होतं... नंतर आम्हाला संध्याकाळी mystery spot ला जायचं होतं... निशांत आणि मिता ला घेऊन आम्ही लगेच तिकडे निघालो.. तो रस्ता ही खूपच मस्त होता... आणि शेवटचे काही मैल तर घाट आणि घनदाट जंगलातून होता.. दिवस भरातल्या just in time परंपरेनुसार तिथेही शेवटची tour चालू व्ह्यायच्या ५ मिनीटं आधी आम्ही तिथे पोचलो... आधि बराच वेळ तो प्रकार optical illusion आहे असं मला वाटत होतं.. पण काही काही experiments नंतर कळत नाही exact भानगड काय आहे किंवा खरच mystery आहे.. पण एकूण अनूभव चांगला होता.. 45 Deg मधे वाकून उभं रहालेले फोटो काढताना किंवा खालून वर roll होणारा ball पहाताना खूप मजा आली.. :) रात्री आमची LA हून येणारी gang पण एकदम वेळेवर आली... त्यामूळे आम्ही लगेच SF downtown कडे निघालो... तिथे जायच्या आधी SF ला मिळणार्या देसी जेवणाबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकलं होतं.. काय वाट्टेल ते करा पण शालिमार मधे जाऊन याच असं सांगितलं होतं.. आम्ही १० $ पार्कींग मधे घालवून ते शालिमार शोधलं पण तिथे जोरदार पोपट झाला.. ते एखाद्या धाब्यासारखं होतं.. आणि food पण not so good type होतं.. !!! एकूण SF downtown एकदम मस्त आहे... एकतर एकतर डोंगर उतारावार असल्याने सगळे रस्ते एकदम steap आहेत.. सगळी कडे छान हिरवळ आहे.. आणि मधे मधे cable cars आणि tram आहेत... new york, chicago पेक्षा खूप वेगळं वाटतं तिथे.. हल्ली मला chicago downtown म्हणजे घरच्या सारखं, आपलं असं वाटायला लागलय.. :) तशी ही माझी california ची तिसरी ट्रिप.. एकदा LA ला तर दुसर्यांदा San Diego ला... LA हा पूर्णपणे अपेक्षाभंग होता.. LA बघून मला वाटलेलं की लोकं एव्ह्डं california california करत का नाचतात?? नुसताच hype आहे.. आणि आपल्याकडे ज्या "कोकणचं कॅलिफ़ोर्निया" वगैरे घोषणा होत असतात त्यापेक्षा कॅलिफ़ोर्नियाचच कोकण बनवा कारण तेच कितीतरी जास्त सुंदर आहे.. San Diego छान आहे.. पण त्याच सौंदर्य आणखिन वेगळं आहे... म्हणजे ऐकून मनात जी कॅलिफ़ोर्निया बद्दल ची image होती त्याच्याशी जूळणारं नाहीच.. पण SF exceeded all the expectations.. Bay area चं एव्हडं कौतूक का केलं जातं ते बघायचं असेल तर SF ला गेल्या वर कळतं.. ! Europian look, छान हवामान, सगळं कसं आखिव रेखिव आणि मूख्य म्हणजे निपजलेलं नैसर्गिक सौंदर्य ह्या सगळ्यामूळे SF चटकन आवडून जातं...

दुसर्या दिवशी सकाळी alcatraz चा तुरूंग पहायचा प्लॅन होता... हा typical american marketing चा उत्तम नमूना आहे... तसं बघायला गेलं तर अमेरीकेतल्या ऐतिहासिक गोष्टी म्हणजे फार फार तर ३००/४०० वर्ष जून्या... त्यात ही बर्याच ठिकाणी इतिहास ओढून ताणून आणल्यासारखा वाटतो... alcatraz चं तुरूंग पाहिल्याजाणार्या आमच्या पैकी एकानेही अंदमानातील स्वातंत्र्य़वीर सावरकरांच तुरूंग पाहिलेलं नाही !!! एक ठिकाण म्हणून पाहायला ते ठिक आहे पण ऐतिहासिक वगैरे वाटत नाही.. पण एकून ते सगळं पाहिल्यावर खूप उदास व्हायला होतं... त्या तुरूंगातल्या काही cells उघड्या आहेत... audio tour च्या दरम्यान त्याच्या आत घेऊन जातात... त्या ४ X ४ च्या जागेत नुसतं २ सेकंद उभं राहिलं तरी स्वातंत्र्याचं महत्त्व काय हे कळतं... आणि नुकतात योगेश च्या shwashank redemtion वरचा blog वाचलेला असल्याने जरा जास्तच strong feelings जाणवली... त्या बेटावरून SF downtown, bay, bay bridge आणि golden gate bridge खूप छान दिसतात... नंतर fisherman's warf वर थोडावेळ timepass केला... तिथून पण छान फोटो काढता येतात... overall ती एकदम happening जागा आहे... एकदम शिकागो च्या nevy pier साराखी... तिथे sea food पण एकदम सही मिळतं... !

नंतर muir woods नावाच्या जवळच्या एका जंगलात गेलो.. तिथे जाणारा रस्ता घाटातून जाणार होता... आणि त्यावेळेला अवंती drive करत असल्याने तिला सगळ्यांनी खूप पिळलं पण.. :) SF dowtown पासून १५ मैल च्या अंतरावर एव्हडं दाट जंगल असेल ह्यावर विश्वास बसत नाही... एथली builder lobby विशेष सक्रीय दिसत नाही... ;) हे खूप उंचच उंच वाढणार्या झाडांचं rain forest आहे.. तिथे मधे मधे चालण्यासाठी trails केले आहेत.. एकून २/३ तास जंगलात भटकण्यासाठी मस्त जागा आहे.. जरा आत शिरलं की तिथे camping वगैरे करण्यासाठी पण जागा आहे..

SF downtown मधलं chinatown हे US मधलं सगळ्यात मोठं chinatown आहे असं म्हणतात.. त्यांचा new year day नुकताच येऊन गेल्यामूळे तिथे दिवे, कंदिल वगैरे लावलेले होते.. तिथली दुकानं पण एकदम मस्त होती.. सगळीकडे एकदम enthu वातवरण होतं... आमच्या ग्रूप मधल्या मुलींनी एका दुकानात किमोनो घालून फोटो काढून घेतले... आणि त्या sales girl च लक्ष गेल्यावर "आम्हाला हा किमोनो मोठा होतोय तुम्ही तो alter करून देणार का हो? " असं उगिच अगदी शहाण्यामूलींसारखी तोंडं करून विचारून typical देसी गिरी केली.. :D मधे आम्ही १/२ वेळा रस्ता चुकून एकदम गोल्डन गेट ब्रिज वरच पोचलो.. हे पण SF मधलं एक attraction आहे... may be आम्ही रस्ता हरवून तिथे पोचलो असल्याने म्हणा किंवा परत येताना toll भरावा लागणार ह्या भितीने म्हणा.. ;) आम्हाला तो विषेश आवडलाच नाही.. एकतर तो खूप भारी आहे असं निदान वाटलं तरी नाही आणि दुसरं म्हणजे लंडन ब्रिज किंवा new york च्या brooklyn bridge वर जसं सहीSSS किंवा romantic वाटतं तसं काही तिथे वाटलं नाही...

त्या रात्री जेवलेलं इतर देसी restaurants मधलं जेवण एकदम मस्त होतं... एकतर खूप Indian जनता असल्याने एकदम homely वाटत होतं...
दुसर्या दिवशी सकाळी जो US मधला most scenic drive म्हंटला जातो अश्या highway 1 वर जायचं होतं... तिथे १७ मैल्स चा एक टप्पा tourist point म्हणून develop केला आहे...गाडी पार्क करायला आणि फोटो काढायला जागा, तसच बसायला बाक आणि जिथे शक्य आहे तिथे समुद्रकिनारा असं एकूण स्वरूप आहे.. एकूण खूप सुरेख जागा आहे... आम्ही गेलो तेव्हा नेमकं पावसाळी वातावरण होतं आणि त्यामूळे खूप चांगले फोटो काढता आले नाही.. किंवा फ़ार पाण्यात पण शिरता आलं नाही... पॅसिफ़िक चं पाणी ही खूप थंड होतं त्यामूळे आम्ही फक्त "पाय लागू.." करून आलो... :) हवेतही खूप गारवा होता.. actually हा असा scene जरा नविन होता.. म्हणजे समोर समुद्र, खारा वारा, उन पावसाचा खेळ आणि थंडी.. आपल्या इथे कोकणातल्या कोणत्याही समुद्रकिनार्यावार मी तरी थंडी अनुभवली नाहिये.. !! १७ मैल drive संपवून लगेच air port वर येऊन flight पकडायचं होतं.. येताना गाडी मधे गाणी, PJ ह्यांना उत आला होता... माझ्या ट्रिप related फंड्यांप्रमाणे चांगली कंपनी असली तर १/२ गोष्टी कमी बघून झाल्या तरी काही फरक पडत नाही.. पण ह्या ट्रिप मधे ग्रूप चांगला होताच आणि बघून ही खूप झालं.. त्यामूळे "good one" category त मोडणारी ट्रिप झाली...
Overall SFO rocks !!!!!! :)