सूप्त इच्छा

प्रत्येकाच्या मनात काहितरी सूप्त इच्छा असतातच.. म्हणजे काहितरी अत्रंगी प्रकार करावे असं प्रत्येकाला कधितरी वाटतचं.. परवा Mask movie बघताना सहज विचार आला की खरच आपल्याला हवं ते काहिssssssही करायची एक दिवस permission मिळाली तर कित्ती धमाल येईल.. मी काय काय करेन "त्या" दिवशी??
आमच्या घरासमोर रहाणार्या एका फ़िरंगी बाई कडे एक मांजर आहे.. इथल्या लोकांप्रमाणेच त्या मांजरीच्या तोंडावर भयंकर देखिल मंद भाव असतात.. खावून खावून ती फ़ार जाड पण झालिये..(थोड्क्यात माजलिये..!) का कोण जाणे ती मला फ़ार irritating वाटते.. मला एकदा chance मिळेल तेव्हा तिच्या पेकटात लाथ घालायचिये... एक जोरदार लाथ बसल्यावर तरी तिच्या तोंडावरचे मंद भाव बदलतात का ते पहायचयं..
मिसळणाचा डबा ही स्वैपाकघरातील एक important गोष्ट आहे हे मला इथे आल्यावर कळलं... एकदा त्यातला हळदिचा लहान डबा थोडा हलला आणि हळद इतर डब्यांमधे गेली.. तेव्हापासून मला पूर्ण भरलेला मिसळणाचा डबा घट्ट बंद करुन गदागदा हलवून आत तयार होणार्या मिश्रणाचा रंग कोणता होईल ते पहायचं आहे.. :) पण हे मी mostly पूण्याला गेल्यावरच करेन कारण नंतर तो राडा निस्तरत कोण बसणार ?
मुंबाईला असताना रात्री पाणी येत असे..त्यामूळे पिण्याचं पाणी तेव्हा भरून ठेवावं लागे.. आम्ही एका कळशी मधून पिंपात पाणी ओतत असू.. मला ती पूर्ण भरलेली कळशी हातातून धपकन पाडून "जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे" करायची खूप इच्छा होत असे.. पण मी हे चुकून आई जवळ बोललो आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीमूळे कधि करता आलं नाही.. :( नंतर कळशी भर नाही पण लोटी भर पाणी मी माझ्या पूतण्यांना सांडायला देउन ही इच्छा थोडीफ़ार तरी पूर्ण केली.. :)
ऑफ़िस मधे आमच्या मजल्यावर एक गुबगुबीत काका बसतात...फ़िरंगीच आहेत..त्यांचे गाल मस्त गुबगुबीत आहेत आणि जरा थंडी पडली लाल होतात.. ते समोर दिअले की मला त्यांचे गाल ओढायची तीव्र इच्छा होते.. अर्थात ही कधिच पूर्ण न होणारी इच्छा आहे.. मी असं काही करायचा प्रयत्न जरी केला तरी मला ऑफ़िस मधून हाकलून देतिल...
अमेरीकेच्या वाह्तूक व्यवस्थेत पादचारी हा भयंकर लाडावलेला घटक आहे.. फ़ार जास्त डोक्यावर चढवून ठेवलेला.. मला इथे एखाद्या पाद्चार्याला जोरदार कट मारून घाबरवायचं आहे.. :)
Mixer वर milkshakes किंवा juices बनवण एकदम सोप्प असतं.. म्हणजे फळं, दूध आणि साखर घालून mixer चालू करायचा..पण मला एकदा mixer चं झाकण बंद न करता तो चालू करुन काय होतं ते बघायचयं..!!! हे पण मला पूण्यालाच करून बघाव लागणारे आणि ते पण घराला नविन रंग देण्याच्या आधी... :)
काही काही लोकं खूप डोक्यात जातात... म्हणजे कोणीही अगदी मित्र मैत्रिणी, ऑफ़िस मधले किंवा नातेवाईक.. कधिकधि ते इतकी जास्त डोक्यात जातात की ते दिसले की मला त्यांच्या एक कानाखाली माराविशी वाटते...माझी अशी एक यादीच आहे की ज्यांना मला एकदातरी श्रिमूखात द्यायचीच आहे.. !!!
आता माझच मला असं जाणवायला लागलय की माझे विचार फ़ारच distructive होत चाल्लेत.. :) त्यामूळे उगाच स्व्प्न न बघत बसता उठून काहितरी constructive कामाला लागावं.. :)

P.S. "आता प्रवास वर्णनं पूरे.. कहितरी वेगळं लिहा" असा "feedback" मिळाल्यामूळे जरा वेगळं लिहीलयं.. feedback देणार्यांनो वाचताय ना... ;)

ग्रॅंड कॅनियन...एक अनुभव...!

ऑगस्ट महिना सुरू झाल्या झाल्याच लोकांचं सप्टेंबर मधल्या long week end चे प्लॅन करण चालू झालं... आमच्या इथली एक गॅंग न्यूयॉर्क ला US Open बघायला जाणार होती... तर दुसरी कॅलिफ़ोर्निया ला जाणार होती.. मला दोन्ही कडे जायचं होतं..;) पण कामामुळे कुठे जाता येइल की नाही ते ठरत नव्हतं..आणि मग मी कुठेच न जाता stl मधेच बसतो का काय असं वाटायला लागलं.. शेवटी १५ दिवस आधी मला जाता येणारे हे नक्की झालं.. पण तोपर्यंत न्यूयॉर्क आणि कॅलिफ़ोर्निया दोन्हीची tickets इतकी महाग झाली होती की मला गणपती साठी भारतात जाउन येणं स्वस्त पडलं असतं.. :)
मधेच एकदिवस सुक्रुत चा फोन आला..नेहमी प्रमाणे त्याच्या शिव्या ऐकून झाल्यावर तो मला म्हणाला long week end ला तू, मी आणि निलेश (म्हणजे आमचा कॉलेज मधला rather कोथरूड ग्रुप मधला अजून एक मित्र) ट्रिप ला जायचं का? मी काय तयारच होतो.. आणि आम्ही तिघं जणं जवळजवळ १.५ वर्षांनी एकत्र भेटणार होतो. आमचा कोथरूड ग्रुप मधला चवथा member अनिकेत पण खरं US मधेच आहे... पण त्यानी as usual कहितरी माज करून ट्रिप ला यायला जमणार नाही असं सांगितलं..(पण बहूतेक ह्यावेळी कहितरी genuin reason होतं म्हणे..:) निलेश फ़िनीक्स ला असल्याने ग्रॅंड कॅनियन नक्की होतं.. आधी चाललं होतं की लास वेगास ला जाऊ पण तिघांनीही ते पाहिलं असल्याने सॅन डिएगो ला जायचं ठरलं. मुख्य म्हणजे तिघांनी एकत्र मजा करणं महत्त्वाचं होतं... आणि as per my picnic related fundas कंपनी चांगली असली की ठिकाणं immaterial असतं.. (माझ्या roomie चं सध्या ह्या विषयावर वैचारीक चिंतन चालू आहे.. त्या बद्दल detail मधे पुन्हा कधितरी.. :) सुक्रुत ची त्यावेळेला सुट्टी चालू असल्याने ट्रिप च्या planning ची सगळी जबाबदारी proactively त्यानीच घेतली. अगदी माझं flight चं deal पण त्यानीच शोधलं.
१ सप्टेंबर ला संध्याकाळी flight नी निघून साधारण ६.३० ला मी फिनीक्स मधे पोचलो.. security मधे वाटला तेव्हडा त्रास झाला नाही... air port ला पोचल्यावर नेहमी प्रमाणे सुक्रुत आणि निलेश ला झालेला उशिर, मग आल्यावर मी वेगळी कडे उभा ते वेग्ळ्याच गेट ला गेलेले मग फोनाफोनी हे सगळं नित्यनियमाने पार पडल्यावर आमची एक्दाची भेट झाली.. सुक्रुत अमेरिकेला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच एकत्र भेटत होतो.. खूप जबरी वाटलं.. कॉलेज च्या दिवसांची आठ्वण झाली... Enterprise car rental मधून माझी आवडती Pontiac grand prix घेतली.. गाडी एकदम नविन कोरी होती.. फ़क्त ८०० मैल चाललेली.. साधारण ८.३० चा सुमारास ग्रॅंड कॅनियन कडे प्रयाण केले.. बाहेर पडता पडता फ़िनिक्स शहराचं दर्शन झालं.. अमेरीकेच्या एकदम south ला असलेल्या ऍरिझोना राज्यातलं हे मोठ शहर.. south ला असल्याने खूप उन्हाळा आणि सगळी कडे वाळवंट.. शहरात मधे मधे रस्त्यांवर देखिल निवडूंगाची झाडं आहेत.. ऍरिझोना राज्याचं चिन्ह सुद्धा निवडूंगाचं झाडंच आहे..शहर छान आटोपशिर आहे...मी पोचलो तेवहा तिथे जवळ जवळ ४० deg. temp होतं...ग्रॅंड कॅनियन फ़िनिक्स च्या उत्तरेला तसच उंचावर आहे.. रस्ता वळणावळणाचा आणि बर्याच डोंगरांमधून जाणारा होता..निलेश गाडीत बसल्याबसल्या लगेचच झोपला.. माझी आणि सुक्रुत ची अखंड बडबड चालू होती...मी माझ्या CDs न्यायला विसरल्याने गाडीत पूर्ण वेळ रॅप नावाचा प्रकार चालू होता..लोक ते एव्ह्ड्या आवडीने का ऐकतात काय माहित.. एकाच सुरात अखंड पणे काहितरी म्हणSSSSत बसतात.. ना सूर ना ताल..हे मी सुक्रुत आणि निलेश ला सांगितल्यावर त्यांनी माला "गाढवाला गुळाची चव काय" types look दिले.. :)
साधारण शेवटचा अर्धा तास हायवे संपून लहान रस्त्यावारुन drive होता.. त्या रस्त्यावर इतका अंधार होता कि आम्हाला वाटलं आम्ही चूकलो.. म्हणून सुमारे १० मैल परत्त उलट दिशेला आलो..पण रस्ता तोच असल्याच कळलं.. तिथून Grand Canyon National Park ची हद्द चालू होत होती त्यामूळे speed limit पण बरच कमी होतं.. मधेच १०-१२ हरीणांचा एक कळप रस्ता ओलांडून गेला...आणि रस्त्याच्या कडेला एक सांबर पण सामाधी लावल्यासारखं स्तब्ध उभं होतं.. आम्ही त्यारात्री camping करणार होतो.. Camp site शोधल्यावर बरोबर नेलेला तंबू उभारला..

तंबू उभारत असताना लक्षात आलं की बाहेर चांगलीच थंडी आहे.. फ़िनिक्स मधलं ४० deg आणि इथलं १०/१२ deg.. हवेत खूपच फ़रक होता.. आमच्या कडे २ च sleeping bags असल्याने रात्री खूपच जास्त थंडी वाजायला लागली... शेवटी मी गाडीत जाउन full blow वर heater लावून झोपलो..
सकाळी उठल्यावर आजुबाजूचा परीसर दिसला.. खूपच छान होता.. जंगल, थंड हवा, पक्षांची किलबिल, झाडीत मधेमधे उभारलेले तंबू आणि नुकताच होत असलेला सूर्योदय सगळ खूप छान होतं... इथे camp sites पण एकदम सोईस्कर असतात.. म्हणजे आसपास एखादं दुकान, shower rooms, rest rooms वगैरे सगळं असतं पण त्यामुळे camping खोटं खोटं वाटतं.. आपल्याकडे गडावर जाऊन राहिल्यावर जसा अनूभव येतो तसं नाही वाटतं..
सकाळी photo session करून झाल्यावर आणि आवरून झाल्यावर (स्वतःला पण आणि तंबू पण)आम्ही बाहेर पडलो..Grand Canyon National Park मधे स्वत:चे २/३ bus routs आहेत.. ह्या सर्व बसेस natural gas वर चालतात आणि मुख्य म्हणजे free आहेत.. :) ह्यामधला red route आहे तो canyon च्या rim जवळून जातो आणि प्रत्येक point ला stop आहे... ही बस पहिल्या stop वर आल्यावर Grand Canyon चं पहिलं दर्शन झालं..आहाहा.. !!! खोल खोल दरी आणि डोंगरांचे errorion मुळे झालेले आकार, प्रत्येक डोंगरावर मातिची वेगळ्य़ा रंगाची shade आणि नजर पोहोचते तिथ पर्यंत हेच द्रुष्य.. निसर्ग किती करामती आहे ह्याचा हा उत्तम नमूना आहे...

कोलोरॅडो नदीच्या प्रवाहा मूळे आणि जमिनीतील इतर हालचालींमूळे हा अजस्त्र canyon तयार झाला आहे...दरीमधे एकदम खोल कोलोरॅडो नदी दिसते आणि जर तिथपर्य़ंत खाली उतरून गेलं तर white water rafting पण करता येतं... Canyon जवळ जवळ २७७ मैल लांब आहे आणि पूर्ण पणे Arizona राज्यात आहे.. इथे राज्याराज्यांमधली स्पर्धा पण खूप जास्त आहे त्यामूळे जिथे तिथे Arizona Arizona लिहिलेलं असतं.. :)

तिथल्या होपी आणि मोहोव पॉईंट वरून खूप सुंदर द्रुष्य दिसतात.. फोटो काढायला लागलं की थांबतवतच नाही.. Hermits Rest हा तिथला शेवटचा पॉईंट आहे जिथे बस जाउ शकते.. आणि मधे मधे बरेच trails आहेत जे खाली नदी पर्यंत जातात... आम्ही एका trail वरुन चालत खाली गेलो पण पूर्ण खाली जाण्याएव्हडा वेळ नव्हता...
 
साधारण चार पर्यंत परत येउन आणि lunch करुन आम्ही फ़िनिक्स च्या परतिच्या प्रवासाला सुरुवात केली.. परत एकदा grand canyon चं दर्शन झालं... जितक्यावेळा पहाल तितकं ते वेगळं आणि सुंदर दिसतं की तिथून निघवतच नाही.. आणि आकारानी देखिल ते इतकं प्रचंड आहे की निसर्गापुढे आपण किती शुल्लक आहोत ह्याची जाणिव होते..
 
जाताना चा drive रात्री होता त्यामुळे आजूबाजूच काही दिसलं नव्हतं पण परतिचा प्रवास दिवसा असल्याने ते ही बघता आलं.. आपल्या कडाच्या घाटांची खूप आठवण झाली.. पावसाळ्यात असतं तस typical वातावरण होतं ! फ़िनिक्स पर्यंत पोचेपर्यंत पाऊस चालू झाला आणि नंतर तो इतका वाढला की गाडी चालवणं अवघड होत होतं... रात्री घरी गेल्यावर इतकी गाढ झोप लागली की मला वाटलं नव्हतं की मी सकाळी लवकर उठू शकेन.. पण आम्ही तिघेही अगदी ७ ला तयार होऊन सॅन डिएगो ला जायला निघालो पण.. !
आधिचे दोन दिवस सुक्रुत नी बराच वेळ गाडी चालवल्याने हा drive मला कारायचा होता...फ़िनिक्स मधून बाहेर पडल्यावरब संपूर्ण वाळवंट होतं... मधे मधे cactus ची झाडं होती.. हा drive मेक्सिको boarder वरून जातो.. युमा नवाच गाव arizona, California आणि Mexico तिन्हीच्या सिमांवर आहे. युमा गावापासून पुढे कॅलिफ़ोर्निया सुरु होतं.. मला वाटलं होतं कॅलिफ़ोर्निया आल्यावर तरी वाळवंट संपेल.. उलट आणखिन वाळूच्या टेकड्या ही दिसायला लागल्या.. मला तर dubai च्या आसपास कुठे drive करतोय का असं वाटत होतं... ऎकलेलं कॅलिफ़ोर्निया आणि बघत होतो ते कॅलिफ़ोर्निया ह्यात फ़ारच जास्त फ़रक होता.. थोड्यावेळाने डोंगर चालू झाले तेही पूर्ण खडकाळं.. एकावर एक दगड रचून ठेव्ल्यासारखे कधिही कोसळतिल की काय असं वाटणारे... दूरदूर पर्यंत एकही झाड दिसत नव्हतं.. एक अतिशय वेगळा अनूभव होता...
 
Speed Limit जास्त असल्याने drive करायला ही खूप मजा येत होती... सॅन डिएगो १० मैंल वर आलं तरी डोंगर संपतच नव्हते... सुक्रुत ला दाट शंका होती की either आम्ही रस्ता चूकलोय किंवा रस्त्यावरच्या पाट्या चूकीच्या आहेत... :) पण नंतर अचानक शहर चालू झालं समूद्र दिसायला लागला... सॅन डिएगो पण छान शहर आहे.. टेकड्यांवर वसलेलं.. Hotel मधे chek-in करून आम्ही लगेच sea world ला गेलो..
इथलं sea world US मधलं सगळ्यात मोठं आहे म्हणे... तिथे प्रचंड गर्दी होती... पण देसी आणि Mexicon लोकच जास्त होते... शामू ह्या Dolphin मश्याचा खेळ बघितला.. Sealc चा Dance पण खूप छान होता... :)इथल्या सगळ्या parks मधे अपंग आणि senior citizan ह्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी खूपच चांगली सोय असते.. त्यामूळे ते ही इतरांएव्ह्डच enjoy करू शकतात... आणि मुख्या म्हणजे बाकीचे लोकं ही co-operate करतात !
 
संध्याकाळी cable car मधून शहराचं सुंदर द्रुष्य दिसत होतं.. हवा देखिल चांगली असल्याने त्यान खूप मजा आली.. sea world मधे जवळ जवळ १० तास घालवून साधारण १२ च्या सुमारास परत आलो... sea wordl हा ही एक चांगला अनूभव होता...सकाळी उठून समुद्र किनार्यवर चककर मारली...
 
सॅन डिएगो हे एक महत्त्वाचे बंदर आहे.. त्यामूळे तिथे बर्याच लहान मोठ्या बोटी नांगरून पडल्या होत्या.. star of India नावाची बोट देखिल होती..
मला संध्याकाळी फ़िनिक्स हून flight पकडायच असल्याने परतिचा प्रवास लवकरच चालू केला... परत एकदा त्या वाळवंटाच सौंदर्य़ अनूभवलं.. :) (ते सुंदर असलं तरी आपल्या कोकणाचं असं कॅलिफ़ोर्निया नको करायला... :)
सुक्रुत आणि निलेश ला घरी सोडून मी air port वर वेळेवर पोचलो आणि flight चालू होताच मनात प्लॅन चालू झाले ते thanks giving च्या long week end चे.. :)