"आमच्या वेळी असं नव्हतं"

परवा घरी फोन केला तर माझ्या २.५ वर्षांच्या पुतण्याने उचलला आणि अगदी व्यवस्थित गप्पा मारल्या... फोन कसा धरावा, सुरुवातीला hello म्हणावं, नंतर "मी निशू बोत्तो" असं आपलं नाव सांगावं हे सगळ अगदी न शिकवता त्याला कळतं.. लहानपणा पासून फोन, computer, गाडी, TV, CD player हे सगळ घरात असल्याने ते वापरणं वगैरे शिकवाव लागतच नाही... पण मग असही वाटतं की फोन, computer, TV हे सगळं नविन घेताना जेव्हडी मजा आली जे अनुभवलं ते त्यांना कधिच मिळणार नाही... मला आठवतं आमच्या घरी जेव्हा पूर्वी blank and white टिव्ही होता...त्याला एका बाजूला ८/१० काळी गोल बटणं होती... मधेच थंडी वाजायला लागल्या सारखं टिव्ही वरचं चित्र थरथरायला लागायचं.. मग त्या ८/१० बटणांमधलं एक कोणततरी फ़िरवायल्यावर ते थांबायचं.. नाहीच तर मग त्याला बाजूने एक झापड मारायची... झापड मारणे का एकदम रामबाण उपाय होता... मी तो पूढे computers, कॉलेज मधले circuit boards, CRO, microwave oven, printers ह्या सगळ्यांना वापरला... :) पण त्या टिव्ही ला सारखं सारखं मारलं तर तो मोडून जाईल ह्या भितीने जास्त बडवता पण येत नसे... नंतर आम्ही Sony चा रंगित टिव्ही घेतला.. तो एकदम चांगला होता पण त्याला Remote control नव्हता... तरीही तो घरी आला तेव्हा आमचा घरी अगदी दिवाळी झाली होती... :) त्यावेळी रंगित टिव्ही वर दुरदर्शन पहायला फ़ारच मजा यायची... पुढे घरात पहिल्यांदा फोन आला तेव्हा फोन वाजला की कोणी उचलायचा ह्यावरून अगदी भांडणं व्ह्यायची... माझा भाऊ तेव्हा शिकायला पूण्याला असायचा त्यामूळे तो घरी आलेला असला की मग फोन तो उचलणार अशी मला ताकिद मिळायची.. तेव्हा Bill वर control रहावा म्हणून फोन च्या शेजारी एक डायरी ठेवलेली असायची आणि त्यात आम्ही नंबर लिहून ठेवायचो.. :) मी पण अगदी शहाण्या मुला सारखे माझ्या सगळ्य़ा मित्रांचे नंबर त्यात लिहायचो आणि मग bill आल्यावर मला ओरडा बसायचा.. :) पुढे पुढे त्या डायरी चं एक पान दिवसातले calls लिहायला अपुरं पडायला लागल्यावर मग ती "प्रथा" बंद झाली... सुरवातिचं अप्रूप संपल्यानंतर, आपल्याला एखादा महात्त्वाचा फोन येणार असेल आणि आपण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम त्यावेळी करत नसू आणि बाकीच्यांनी अगदी नाहीच उचलला तरच मग स्वत: उठून फोन उचलायचा अशी पध्दत घरात चालू झाली... ! मी शाळेत असताना कोणाच्या घरी वगैरे computer नसायचे.... पण आमच्या Building मधे एकांनी computer घेतला होता... आम्हाला "लहान" मुलांना त्या computer च्या खोलीत पण जायला मिळ्त नसे... ती ताई अगदी दारं, खिडक्या बंद करून आत computer वर काम करत असे.. तिचा भाऊ मात्र कधितरी आम्हाला computer लावून दाखवत असे... तेव्हा मला तिचा खूप राग यायचा... आणि आज ऑफ़िस मधे, घरी अगदी अत्याधूनिक desk tops, laptops वापरल्यानंतर ते आठवलं की हसू येतं.. मधे एकदा तर इथे माझे आणि roomies चे मिळून ६ laptop घरात होते... :) पुण्याला आमच्या घरी computer आला तेव्हा तर मला "computer वर लई भारी काय काय करता येतं" एव्हडच ऐकून माहित होतं पण काय ते काही कळायचं नाही.. :D.. मग मी रोज सकाळी computer लावून paint brush वर चित्रं काढून ती save करत असे.... नंतर internet म्हणजे काय हे जरा जरा कळल्यावर VSNL चं student account घेण्यासाठी मी आणि माझा मित्र PMT च्या बस की दिघी ला गेलो होतो... Internet चे सुरुवातिचे दिवस एकदम enjoy केलेले... मी सगळ्या जनतेला खूप forwards पाठवायचो, लोक ते वाचून मला reply करतिल अशी अपेक्षा पण ठेवायचो, मी inbox उघडला आणि मला नविन इमेल आलेला असेल की मला खूsssप आनंद व्ह्यायचा.. :) मी आणि मित्र तर college ला किती वाजता जायचं हे email वरून ठरवायचो आणि email केल्यानंतर "मी तूला email केलाय तो बघ" असं फोन वर पण सांगायचो.. :)... माझ्या uk च्या बहिणी ने पाठवलेले फोटो मी download करून घरी दाखवले तेव्हा computer शोधच मी लावला आहे असा आनंद आई, बाबा आणि आज्जीला झाला होता...! आज्जी आम्हाला तिच्या लहानपणी च्या गोष्टी सांगताना नेहमी म्हणते "आमच्या लहानपणी असं नव्हतं.. विज वगैरे काही नव्हती सगळं कंदिलाच्या उजेडात करावं लागायचं..." कदाचित आम्हीही पूढे निरज, निशांत ला सांगू.. "आमच्या वेळी असं नव्हतं... फोन आणि computer घरात आधिपासूनच नसायचे, ते घ्यावे लागायचे.. फोन वाजला की उठून उचलावा लागायचा आणि emails पण स्वत:हून type करावे लागायचे.... !!! " :D

A shining star asks me...!

बघता बघता २००६ संपले आणि नविन वर्ष चालू पण झाले... मागच्या वर्षीची New Year party आत्ता १५ दिवसांपूर्वी झाली की काय असं वाटतय... ह्या वर्षातले फ़क्त १५ दिवस मी भारतात घालवले... ते ही प्रचंड उन्हाळा चालू असताना भर एप्रिल मधे... त्यामूळे आमरस खाणे आणि झोपणे ह्या शिवाय बाकीचं काही केलं नाही.. :) २००६ तसं खूप छान गेलं... खूप फ़िरणं झालं.. मजा केली.. अमेरीका अमेरीका म्हणतात ती काय हे अगदी मनसोक्त बघता आलं... Professional life मधे ही एक दोन अपवाद वगळता सारं कसं छान झालं... नविन कामाचे अनूभव मिळाले.. इतर ही काही "अनूभव" मिळाले... घरापासून दूर राहिल्यामुळे स्वत:ची कामं स्वत: करायची जरा सवय झाली.. आणि एकूणच जरा responsibility ची जाणिव झाली.. :) मी स्वत: washing machine लावून कपडे धूतो ह्यावर माझ्या आईचा आणि स्वत:ची कपबशी स्वत: विसळतो ह्यावर माझ्या आज्जी चा अजूनही विश्वास बसत नाही.. :D नविन वर्षाच्या आरंभी मला कोणी सांगितलं की माग तूला काय हवय ते... ५ इच्छा पूर्ण केल्या जातिल तर काय मागेन मी..?? तश्या बर्याच गोष्टी आहेत.. ५ म्हणजे फ़ारच कमी आहेत.. पण हरकत नाही ५ तर ५... प्रयत्न करायला काय हरकत आहे... शांतता.. सगळ्यात महत्त्वाची आणि हल्ली फ़ारच दूर्मिळ झालेली गोष्ट आहे ही.. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारचे आवाज नुसते कानावर आदळत असतात... कधीकधी तर नळातून ठिबकणार्या पाण्याचा आवाज ही खूप irritate होतो... आणि शांतता म्हणजे नुसतीच अश्याप्रकारची नाही तर एकूणच सगळीच.. दंगे, भांडणं, युध्द ह्या सगळ्यांशिवाय जी मिळते तशी शांतता... असो... मी अचानक विश्वशांती वर वगैरे फ़ंडे मारायला लागायचो.. :) मागे मला एका forwarded email मधे एक कविता आली होती.... "कधिकधि जवळ कुणिही नसावसं वाटतं.. आपलच आपण अगदी एकट असावस वाटतं.." (ती मी office मधे माझ्या white borad वर लिहून ठेवली होती... मला सारखा येऊन त्रास देणार्यांसाठी... ;) कधिकधि खरच अगदी शांत बसावसं वाटत कोणाशिही न बोलता... तर मला हवी असलेली ही पहिली गोष्ट...
झोप... आणि तिही वेळेवर.. Weeday la कामं, रोज रात्रीचे calls आणि week end ला timepass... ह्या मधे खोबरं होतं ते झोपेचं.. १:३०/२ ला झोपून ७ ला उठणे हे तर रोजचच झालय.. आणि मग week end ला ती राहिलेली झोप भरून काढण्यासाठी १२/१ ला उठायच... शिवाय कधी heater जास्त झाला कधी कमी झाला ह्यामूळे मधे मधे येणारी जाग.. तर overall वेळेवर आणि भरपूर झोपेची गरज आहे...
मागे एकदा teacher's day ला आम्ही एका सरांना दिलेल्या greeting card वर मेसेज होता... "A Shining star asks me, what do you want ? a bag with 10000 dollars or a good teacher.. I asked for a bag because I already have the best teacher" चांगले शिक्षक किंवा आता नोकरी करताना mentor मिळणं फ़ार गरजेचं असतं... कळतय पण वळत नाही असं बरेचदा होतं... अश्यावेळी ह्या व्यक्ती असल्या की बरं पडतं... मग ते कोणिही असो... senior, junior, manager, मित्र, मैत्रिण, आई बाबा अगदी कोणिही पण त्यांचं असणं जरूरी आहे... आत्त पर्यंत तरी असं कोणी ना कोणी मला भेटलं आहे... नविन वर्षातही भेटत राहो...
मित्र परीवार... जो की मला already खूप आहे... बरेच groups आहेत... एकत्र जमले की धमाल येते...कधी बोलणं झालं की छान वाटतं.. पण इथे आल्यानंतर "मित्र" म्हणवणार्यांकडून काही फ़ार weired अनूभव आले.. म्हणजे expense sharing साठी मैत्री हा फ़ंडा मला पटतच नाही... अश्या relation ला मैत्री म्हणावी का असा प्रश्ण पडतो....हल्ली आम्ही ह्याला professional मैत्री असे नविन नाव दिलय... :) तर असे अनूभव नविन वर्षात येऊ नयेत अशी खूप इच्छा आहे.. शाळा कॉलेज मधे असताना जशी निखळ मैत्री असते तशीच असावी असं फ़ार वाटतं... कौतूक....आपल कौतूक व्हावं असं कोणाला वाटत नाही... ? मग ते ऑफ़ीस च्या कामात असो, blog वर आलेल्या comments मधे असो किंवा मी केलेल्या चहा किंवा भाजी ला roomie नी चांगलं म्हणणं असो... ह्या छोटय़ा छोटया गोष्टींमधून पण motivation मिळतं आणि routine मधला कंटाळा निघून जातो....असं खूप कौतूक वाट्याला यावं अशी इच्छा आहे...
खरतर मी हा post १ तारखेला लिहायला घेतला आणि शेवटी आज पुर्ण केला.. मधे पल्लवी चा हा post वाचण्यात आला.. ती फ़ारच चांगली आहे त्यात लिहीलेल्या सगळ्या गोष्टी इतरांना gift देत्ये... मी मात्र ह्या स्वत:साठी मागतोय.. :) Anyways नविन वर्षात ज्याला ज्याला जे जे हवं ते मिळो हीच इच्छा आहे.. !!