बर्निंग ट्रेन

परवा पुतळाविटंबने वरून महाराष्ट्रात झालेल्या दंगलीत डेक्कन क्वीन पेटवल्याची सचित्र बातमी वाचली.. राणिची झालेली अशी दुर्दशा पाहून कुठेतरी वाइट वाटून गेलं...लहानपणा पासून डेक्कन क्वीन बद्दल खूप कुतूहल होतं.. पण ही कल्याण ला थांबत नसल्याने आम्हा डोंबिवली करांना तिचा तसा काहीच उपयोग नव्हता..डेक्कन क्वीन मधून पूण्याला जाण्याची हौस भागवण्यासाठी एकदातर आज्जी मला दुपारी डोंबिवली हून आईच्या office मधे, VT पर्यंत सोडायला आली होती आणि मग मी आणि आई डेक्कन क्वीन ने पूण्याला गेलो होतो..त्यावेळी ही एकच सूपर फ़ास्ट दर्जाची गाडी असल्याने त्यातून प्रवास करण म्हणजे prestige समजलं जात असे..टाय सूट घालून कामनिमित्त मुंबईला जाणार्या executive पूणेकरांबरोबरच सुट्टी साठी आपल्या दादर पार्ल्याच्या नातेवाईकांकडे जाणारे प्रभात रॊड डेक्कन वरचे शिष्ठ पूणेकर देखिल "आम्ही डेक्कन क्वीन सोडून दुसर्या गाडीने मुंबई ला जात नाही" असं अगदी अभिमानानी सांगत..
राणिचा थाट ही तसा शाहीच.. ब्रिटीशांनी रेस खेळ्ण्यासाठी सकाळी मुंबई ला येता यावे म्हणून सुरू केलेली ही गाडी पुढे रोज सोडण्यात येऊ लागली..रेस खेळ्णारे उच्चभ्रू अस्ल्याने सहाजिकच राणिला कायम पहिला मान असे... पावसामूळे delay झालेली वाहातूक असो की अन्य कोणत्याही फ़ालतू कारणाने झालेला typical centra railway खोळंबा असो, जागा मिळेल तेव्हा बाकीसग्ळ्यांना बाजूला सारून राणी मात्र ऐटीत पुढे निघून जात असे..In fact ह्याच मुळे मुंबईकरांना राणी बद्द्ल कधी विषेश प्रेम वाटलच नाही... सकाळी ९/९:३० च्या आसपास डोंबिवली स्टेशन भरून वाहत असताना आणि लोक पुढ्च्या फ़ास्ट लोकल साठी थांबलेले असताना "platform no 5 च्या किनार्यापासून दूर उभे रहा एक वेग्वान गाडी पुढे जात आहे." अशी annoucement झाली की हमखास समजावं की आता डेक्कन क्वीन सगळ्यांना चिडवत पुढे निघून जाणार..
संध्याकाळी देखिल आई आणि तिच्या मैत्रिणींना यायल्या उशिर झाला की हमखास ठरलेलं कारण म्हणजे "डेक्कन क्वीन रखडली आणि आमच्या फ़ास्ट ट्रेन लेट झाल्या"...सुमारे ७६ वर्षांच्या हिच्या प्रवासात खंडाळ्याचा एक अपघात सोडला तर destination च्या आधी ही कधिच terminate झाली नाहीये...
बाकीच्यांपासून वेगळं ठेवण्यासाठी डेक्कन क्वीन चे रंग देखिल किती बदलले..पांढरा,पिवळा,लाल एव्हढ्च काय तर मधे कधितरी काळ्पट grey पोशाख देखिल हिनी घातला..पण लोकांना तो अजिबात न आवडल्याने आठच दिवसात तो बदलण्यात आला..डेक्कन क्वीन चा पांढरा रंग खूप वर्ष होता...नंतर मग सध्या असलेल्या निळा रंग आला..."मिले सुर मेरा तुम्हारा" मधे दाखवलेल्या डेक्कन क्वीन च्या वळण घेणार्या द्रुष्यामूळे तर ती जवळजवळ देशभरात कुतूहलाचा विषय बनली होती...
डेक्कन क्वीन निघताना पूणे आणि मुंबई स्टेशन वर सनई देखिल वाजलली जात असे..
डेक्कन क्वीन च्या प्रवाशांच तिच्यावर भयंकर प्रेम.. गणपती,दांडीया, सत्यनारायण, भजनं ह्यापासून पत्त्यांच्या अड्ड्यापर्यंत अनेक गोष्टी गाडीत साजर्या केल्या जातात...डेक्कन क्वीन चा ६० वा, ७५ वा वाढदिवस देखिल अगदी दण्क्यात साजरे झाले अगदी आरास, रांगोळ्या, मिठाई सकट...
मुंबई पुणे प्रवासी संख्या वाढल्यावर इंद्रायणी, प्रगती, शताब्दी अशा अनेक गाड्या चालू झाल्या पण डेक्कन क्वीन चा थाट मात्र कायम होता..इतर कुठल्या गाडी च्या वाढदिवशी पेपर मधे अग्रलेख लिहिले गेल्याच मला तरी आठवत नाही.. आणि इतर ही अनेक लेखांमधे,गोष्टींमधे डेक्कन क्वीन इतका दुसर्या गाडी चा उल्लेख दिसत नाही.. तिचा वक्तशिरपणा, तिचा वेग, तिचा रंग, तिची pantry car, तिचं मोजून ३ स्टेशन वर थांबणं, अगदी त्यात मिळणारं 20/25 रुपये किमतिचं omlet आणि cheese toast ह्या सगळ्याचा तिच्या प्रवाशांना अगदी पूणेरी style चा "जाज्वल्य" अभिमान असतो.. :)
Express highway चालू झाल्यावर आणि volvo पर्व आल्यावर राणीची शान थोड्याफ़ार प्रमाणात का होइना घसरलीच...आणि परवा तर ती अगदीच बिचारी वाटली...
जळण्यार्या डेक्कन क्वीन चे फोटो बघताना जाणवलं की ब्रिटीशांनी चालू केलेल्या ह्या राणी ची अवस्था पण त्यांच्या खर्या राणी सारखीच आहे..राणी राणी फ़क्त म्हणायला प्रत्यक्शात मात्र नुसती नावापुरती, रया गेलेली...!

1 प्रतिसाद:

Nandan said...

लेख छान आहे. सनईबद्दल आणि मिले सुर... बद्दलची माहिती नवीन होती. मला वाटतं, डबे जाळताना डेक्कन क्वीनचीच निवड करण्यामागे या गाडीची प्रतिष्ठा आणि प्रतीकात्मकता यांची असलेली जाणीवच दिसून येते.