कंटाळा.. प्रचंड कंटाळा.. ! सध्या रूटीन फारच बोर होतय. दिवाळी झाली. किल्ला केला, कंदिल केला, अंक आणले, माळा/लायटींग केलं. मनसोक्त फराळ हाणला. माहेरच्या, सासरच्या मंडळींबरोबर गेट टू गेदर केली. पण ह्या सगळ्याची मजा ४ दिवसच टिकली. नंतर परत कंटाळा यायला लागला.
टेनीस खेळायला जावसं वाटत नाही. पळावसं त्याहून वाटत नाही. सकाळी उठून तासभर पेपर वाचत बसतो पण पळायला बाहेर पडत नाही. सायकल घ्यायची तर बजेट मध्ये बसत नाही. पोहायला जायचं तर सकाळी थंडी वाजते. बसमध्ये कंटाळा येतो. संध्याकाळची बस अनकम्फर्टेबल आहे. त्यात बसून (बसण्याच्या पोझिशन वर डिपेंडींग) पाय किंवा मान दुखते. सहा महिने फॉलोअप करूनही कंपनी बस काही बदलत नाही! ऑफिसमध्ये जायला यायला फारच वेळ लागतो!
बाकी ज्या गोष्टी करतो त्या बर्याचदा उसनं अवसान आणून करतो. सध्या उसनवारी फार वाढल्याने अवसानही येत नाहीये!
सोशल लाईफ फारसं उरलं नाही. म्हणजे कोणी मित्र मैत्रिणी अमेरिकेतून आले तरच मित्रांशी भेटी गाठी होतात. कारण असलेले सगळे मित्र मैत्रिणी बाहेरच आहेत. इथे आहेत त्यांना आम्ही नसण्याची सवय होऊन गेली आहे. शिवाय न भेटाण्याची इथली नेहमीची यशस्वी कारणे आहेतच. ऐनवेळी टांग मारणे, दिलेल्या वेळेपेक्षा खूप उशीरा येणे, वन वे कम्युनिकेशन वगैरे वगैरे..
ऑफिसातही खूप काही वेगळं घडतं अश्यातला भाग नाही. रोजचे तेच ते इश्यूज, तीच पाट्या टाकणारी लोक, त्यांच्या डोक्यावर बसा, आपली कामं पुढे सरकवा.. कधी कधी असं वाटतं ही कामं करून ते आपल्यावर काही पर्सनल फेवरच करयातय की काय! शिवाय ह्या सगळ्यातून 'इनोव्हेटीव्ह' वगैरे गोष्टी करण्याच्या अपेक्षा. मग ऑफिसमधल्या अवसानाची उसनवारीही वाढते. तरी बरं टीम चांगली आहे आणि बॉसेस ऐकून घेणारे आहेत.
आजचं ह्यावरचं एक डिलबर्ल्ट सापडलं. ह्या सिच्युएशेनला अगदी परफेक्ट!
http://dilbert.com/strips/comic/2007-06-23/ ह्या लिंकवरून साभार!
तर हा कंटाळा घालवण्याचा तुर्तास एकच उपाय आहे तो म्हणजे रियाशी खेळणे, तिचे बोबडे बोल ऐकणे आणि तिच्या रोजच्या नवनव्या करामती पहाणे आणि जे मी अगदी मनापासून एन्जॉय करतो!

2 प्रतिसाद:
:)I can imagine.I hope the Pune 10K will boost your morale. :)
Vidya.
Thanks Vidya ! Saw your comment now :)
Post a Comment