ही पोस्ट वाचणार्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. गेल्यावर्षी अपूर्ण राहिलेल्या तसच यंदाच्या यादीतल्या नवीन इच्छा ह्या वर्षात पूर्ण होवोत ही सदिच्छा! "दिसांमाजी काहीतरी" लिहायला जमत नाहीच (आणि लिहूही नये) पण निदान महिन्यामाजी लिहीण्याचा संकल्पही गेले काही वर्ष मोडीत निघाला. मधली दोन वर्षे ब्लॉगवर एकही पोस्ट न पडता भाकड गेली. २०१८ला STP ने तारले. त्यामुळे ह्या वर्षी पहिल्याच दिवशी पोस्ट टाकून "वर्षामागे काहीतरी"ची सोय करावी असा सुज्ञ विचार करून हा पोस्टप्रपंच.
यंदाच्या हॉलिडे सिझनमध्ये ठरवलेली बरीच कामं पूर्ण केली. त्यातलं एक काम होतं ते म्हणजे पुस्तकं आवरणे आणि त्यांची यादी करणे. इतके दिवस यादी करण्याएव्हडी पुस्तकच नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बरीच पुस्तकं घेतली गेली. प्रत्येक भारतवारीत यादी करून ती आणली गेली. त्यातली बरीच अजून वाचायची आहेत. पण पुस्तकांची दोन मोठी शेल्फ भरवून टाकण्याची इच्छा हळूहळू पूर्ण होते आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे पुस्तकांची दोन मोठी शेल्फ वाचून झालेल्या पुस्तकांनी भरवून टाकणे अशी ठेवावी लागेल. केलेली यादी कुठेतरी लिहून ठेवायची म्हणून ती आज ब्लॉगवर टाकायचं ठरवलं.
२०१८ मध्ये वाचलेली काही पुस्तकं खूप आवडली, काहींनी अपेक्षाभंग केला.
सौरव गांगुली हा माझा सर्वात आवडता भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन. त्याची एकंदरीत कारकीर्द बघता, त्याच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण "Century is not enough" हे त्याचं पुस्तक वाचल्यावर निराशा झाली. एकंदरीत पूर्ण पुस्तक एका नकारात्मक भावनेतून लिहिल्यासारखं वाटतं रहातं. लहानपण, क्रिकेटचं प्रशिक्षण, घरातली मंडळी ह्यांच्याबद्दल काहीच येत नाही. चॅपेल बॅशिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहेच पण ते ही सचिनने जास्त चांगलं केलं आहे असं मला वाटलं.
सई परांजपे ह्यांचं सय हे पुस्तक वाचलं. पुस्तकातल्या घटना कालानुक्रमे न येता, आठवणी जशा येतील तसं सांगितलं आहे. काही ठिकाणी ते चांगलं वाटतं पण काही ठिकाणी घटनांची संगती लागत नाही. संदर्भ न कळल्याने कारण आणि परिणाम ह्यांची जरा गल्लत होते. पुस्तकातली भाषा एकदम ओघवती आहे.
पुस्तकांच्या दुकानात दिसलं आणि तिथल्या काकांनी सुचवलं म्हणून मधुकर देशमुख ह्यांचं शिकारनामा हे पुस्तक आणलं. माहुरच्या संस्थानचे राजे आणि शिकारी असलेल्या लेखकाने जंगलाचं तसच शिकारींच वर्णन मस्त केलं आहे. बिबट्याच्या शिकारींचे काही प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.
बाकी अजून काही पुस्तकं तसेच दिवाळी अंक अर्धवट वाचून झाले आहेत ते जसजसे वाचून होतील तसं त्यांच्याबद्दल लिहायचा प्रयत्न करेन.
ही यादी
गुरुकुल मधली माझी सहशिक्षिका मेघना हिच्याकडून काही पुस्तक मिळाली. त्यांची ही अपडेटेड यादी.

No. | Name | Author | Tag |
1 | काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे | य.न. केळकर | Non fiction |
2 | आम्ही माडिया | एम.डी.रामटेके | Non fiction |
3 | टाटायन | गिरिष कुबेर | Non fiction |
4 | एका तेलियाने | गिरिष कुबेर | Non fiction |
5 | शिखरावरून | एडमंड हिलरी | (Auto)biography |
6 | गोष्टी जम्नांतरीच्या | रेणू गावस्कर | Fiction |
7 | पर्यटन एक संजिवनी | डॉ. लिली जोशी | Travel |
8 | तोत्तोचान | तेत्सुकी कुरोयानागी (अनुवाद) | Fiction |
9 | शोध | मुरलीधर खैरनार | Fiction |
10 | वॉर्सा ते हिरोशिमा | वि.स.वाळींबे | Non fiction |
11 | व्हिन्स्टन चर्चिल | वि.ग. कानिटकर | (Auto)biography |
12 | नाझी भस्मासुराचा उदयास्त | वि.ग. कानिटकर | Non fiction |
13 | बालकळ्यांच्या झिरमिळ माळा | अपर्णा पाटणकर | Non fiction |
14 | Little woman | Non fiction | |
15 | उत्तमोत्तम एकांकिका पुरूषोत्तमच्या | खंड १ आणि २ | Non fiction |
16 | कहाणी नमोची | किंगशुक नाग (अनुवाद) | (Auto)biography |
17 | सय | सई परांजपे | (Auto)biography |
18 | द ब्लड टेलिग्राम | गॅरी बास (अनुवाद) | Non fiction |
19 | वॉल्ट डिस्ने द अल्टीमेट फँटसी | यशवंत रांगणेकर | (Auto)biography |
20 | पूर्वरंग हिमरंग | डॉ. प्रतिभा फाटक | Travel |
21 | रण दूर्ग | मिलिंद बोकील | Fiction |
22 | एकम | मिलिंद बोकील | Fiction |
23 | शिस्तीतलं मुक्तांगण | Non fiction | |
24 | कुहू | कविता महाजन | Fiction |
25 | लाकूड कोरताना | डॉ. अनिल अवचट | Non fiction |
26 | दंशकाल | हृषिकेश गुप्ते | Fiction |
27 | वाचत सुटलो त्याची गोष्ट | निरंजन घाटे | Non fiction |
28 | आलोक | असाराम लोमटे | Fiction |
29 | पर्व | भैरप्पा | Fiction |
30 | गोंदण | रत्नाकर मतकरी | Fiction |
31 | पाडस | राम पटवर्धन (अनुवाद) | Fiction |
32 | मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास | पु.ल. देशपांडे | Fiction |
33 | उरलं सुरलं | पु.ल. देशपांडे | Fiction |
34 | झुंड | दत्ता मोरसे | Nature |
35 | पूर्वरंग | पु.ल. देशपांडे | Travel |
36 | अपूर्वाई | पु.ल. देशपांडे | Travel |
37 | नस्ती उठाठेव | पु.ल. देशपांडे | Fiction |
38 | असामी असामी | पु.ल. देशपांडे | Fiction |
39 | व्यक्ती आणि वल्ली | पु.ल. देशपांडे | Fiction |
40 | माझा प्रवास | गोडसे गुरूजी | Travel |
41 | चार नगरांतले झाले विश्व | डॉ. जयंत नारळीकर | (Auto)biography |
42 | ग्रहण | नारायण धारप | Fiction |
43 | असंही | प्रिया तेंडूलकर | Non fiction |
44 | ऑफबीट भटकंती २/३ | जयप्रकाश प्रधान | Travel |
45 | कलजयी कुमार गंधर्व | कलापिनी कोमकली | (Auto)biography |
46 | एका रानवेड्यांची शोधयात्रा | कृष्णमेघ कुंटे | Nature |
47 | झिम्मा | विजया मेहता | (Auto)biography |
48 | तें दिवस | विजय तेंडूलकर | (Auto)biography |
49 | शिकारनामा | मधूकर देशमुख | Nature |
50 | एका खेळीयाने | दिलीप प्रभावळकर | (Auto)biography |
51 | वास्तव नावाचं झेंगट | सुमित खाडीलकर | Fiction |
52 | 281 and beyong | व्हिव्हिएस लक्ष्मण | (Auto)biography |
53 | Playing in my way | सचिन तेंडूलकर | (Auto)biography |
54 | A century is not enough | सौरव गांगुली | (Auto)biography |
55 | 2 states | चेतन भगत | Fiction |
56 | Five Point someone | चेतन भगत | Fiction |
57 | Out of my comfort zone | स्टीव्ह वॉ | (Auto)biography |
गुरुकुल मधली माझी सहशिक्षिका मेघना हिच्याकडून काही पुस्तक मिळाली. त्यांची ही अपडेटेड यादी.
58 | निसर्गवाचन | मारूती चित्तमपल्ली | Nature |
59 | धार्मिक | डॉ. अनिल अवचट | Non fiction |
60 | निसर्गसूक्त | ज्ञानदा नाईक | Nature |
61 | स्व देश! | भूषण केळकर | Non fiction |
62 | पुण्यभूमी भारत | सुधा मूर्ती | Non fiction |
63 | धागे आडवे उभे | डॉ. अनिल अवचट | Non fiction |
64 | सोनाली | डॉ. पूर्णपात्रे | Non fiction |
65 | फुलराणी | बालकवी | Poetry |
66 | मनुस्मृती | नरहर कुरुंदकर | Non fiction |
67 | शिवरात्र | नरहर कुरुंदकर | |
68 | डॉ. अल्बर्ट स्वाईटझर | सुमती देवस्थळे | (Auto)biography |
69 | रानवाटा | मारूती चित्तमपल्ली | Nature |
70 | कृष्णविवर | मोहन आपटे | Non fiction |
71 | आमचा बाप आणि आम्ही | डॉ. नरेंद्र जाधव | (Auto)biography |
72 | स्वत:विषयी | डॉ. अनिल अवचट | (Auto)biography |
73 | कुंपणापलीकडचा देश | मनीषा टिकेकर | Non fiction |
74 | नागझिरा | व्यंकटेश माडगुळकर | Nature |
75 | काश्मिर - एक शापित नंदनवन | शेषराव मोरे | Non fiction |
0 प्रतिसाद:
Post a Comment