त्याकाळी, म्हणजे २००५/२००६ साली मराठी ब्लॉगविश्व फारच छोटं होतं. (कदाचित त्यामुळेच ?) खूप छान होतं. सगळे एकमेकांना ओळखायचे. ब्लॉग आवडले तर सांगायचे, नाही आवडले तर ते ही सांगायचे, कोणी थोडे दिवस नाही लिहिलं तर लगेच मेल, कमेंट्स मधून चौकश्या व्हायच्या. तेव्हा आज आहे तितका युनीकोडचा सर्रास वापर सगळ्या ठिकाणी होत नव्हता. ब्लॉग असला तरी त्यावर टाईप करायला बरहा वापरायला लागायचं. मला मराठी ब्लॉगविश्वाचा शोध अचानकच लागला होता. "मासा आणि मासोळी" हे मी तेव्हा वाचलेलं मराठी ब्लॉगवरच पहिलं पोस्ट. नंतर मी रेग्युलरली ब्लॉग्ज वाचायला लागलो. काही काही ब्लॉग्ज अगदी खूप लक्षात राहिले. नंतर ते परत परत वाचले गेले.
मधे एकदा बोलता बोलता विषय निघाला तेव्हा परत काही ब्लॉग पोस्ट शोधून काढले आणि वाचले. पुढच्यावेळी एकेठिकाणी सापडावे म्हणून लिंक्स एकत्र टाकतोय.
१. मराठी ब्लॉगविश्वातला माझा सगळ्यात आवडता ब्लॉग म्हणजे ट्युलिपचा ब्लॉग. ह्यातले बरेच पोस्ट्स माझे अक्षरशः शेकडो वेळा वाचून पाठ झाले आहेत ! त्यातल्या माझ्या आवडत्या काही पोस्टच्या लिंक्स.
- जोशी आणि जोशीण : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/09/blog-post_12.html
- मुंबईतला पाऊस : http://tulipsintwilight.blogspot.com/2006/07/blog-post.html
- चारुलता, स्वारोव्स्की आणि सरत्या उन्हाळ्यातली एक संध्याकाळ.. : http://tulipsintwilight.blogspot.com/2007/10/blog-post.html
- पांथविराम उचलण्यापूर्वी : http://tulipsintw
ilight.blogspot.com/2007/05/blog-post.html
- सुंदरबन : Sundarban: http://tulipsintwilight.blogspot.com/2007/04/blog-post.html
२. मी वर म्हंटलं तसं मी वाचलेलं पहिलं पोस्ट (पामरच्या ब्लॉग वरचं) : मासा आणि मासोळी : http://paamar.blogspot.com/2005/09/blog-post.html
३. नंदनच्या 'मराठी साहित्य' ब्लॉगवरचे बरेचसे पोस्ट खूप वाचनीय आहेत. त्यातला सखाराम गटणेवरचा पोस्ट खूप लक्षात राहिला. नंतर तो इमेलवरुनही बराच फिरला होता.
http://marathisahitya.blogspot.com/2007/05/blog-post.html
४. संवेदचा पूर्ण ब्लॉगच खूप सही असतो. अगदी ब्लॉगच्या नावला शोभेल असा !
http://samvedg.blogspot.com/
५. त्या काळी अभिजीत बाठे हा ब्लॉगर खूप अॅक्टीव असायचा. हल्ली फारसं लिहित नाही बहूतेक तो.
त्याचा 'एक डाव भुताचा' (आयटमच भुत) हा पोस्टपण खूप आवडला होता.
http://abhijitbathe.blogspot.com/2007/03/blog-post.html.
६. गायत्रीचं 'समईच्या शुभ्र कळ्या' गाण्याचं रहग्रहण फार सुंदर आहे. सारेगमप मध्ये जेव्हा जेव्हा हे गाणं सादर झालं तेव्हा मी हे पोस्ट काढून वाचलय. http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html
७. केतन कुलकर्णीचा ब्लॉग पण मला फार आवडायचा. त्याचं लिखाणं खूप ड्रिमी असायचं.
त्यातलं हे एक पोस्ट आणि VOF चं प्रवासवर्णन आवडलं होतं. http://asach-aapla.blogspot.com/2008/08/post-50.html
८. संवादिनीचा ब्लॉग एकदम हलकाफुलका असायचा. त्यातली काही पोस्ट वाचून 'अगदी अगदी' असं म्हणावसं वाटायचं. त्यातले काही लक्षात राहिलेले पोस्ट.
जग्गू : http://samvaadini.blogspot.com/2008/01/blog-post.html
दिल्ली आणि नेलपॉलीश : http://samvaadini.blogspot.com/2008/06/blog-post_19.html
लग्न : http://samvaadini.blogspot.com/2009/01/blog-post_29.html ह्यातलं 'नविन सूनबाईंच विविध गूणदर्शन' वाचून फार हसलो होतो !!
९. विद्या भूतकरचा ब्लॉगही मी फॉलो करायचो. साधा सिंपल छान असायचा. http://vidyabhutkar.blogspot.com/
१०. अभिजीत कुलकर्णीचा ब्लॉगपण सही असायचा. पण त्याने तो आता डिलीट केला की काय माहित नाही. आता सापडत नाहिये. :|
पुढे ब्लॉगविश्वाशी संपर्क थोडा कमी झाला. आता परत ब्लॉग्ज वाचणं सुरु करायचं आहे. सध्याच्या "पिढीतल्या" आपल्या आवडत्या ब्लॉग्जच्या लिंक कोणी इथे टाकल्यास माझी काही हरकत नाही.
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
1 प्रतिसाद:
धन्यवाद पग्या ही सगळी यादी दिल्याबद्दल. मी माझे काही आवडते नव्या पिढीतले ब्लॉग्स देते आहे :) आणखी बरेच आहेत. वेळ मिळेल तशी यादी टाकेन. तू वर दिलेले पण काही आहेत माझ्या आवडीचे. ह्याशिवाय तू, बस्के, पूनम, मिनोती :)
झुला : सामाजिक जाणिवा आणि चित्रविचित्र अनुभवांची रेलचेल असलेला हा ब्लॉग. कित्येक नोंदी अशा आहेत की वाचून सुन्न व्हायला होतं.
लेख संग्रह : वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत छापून आलेले अनेक विचारवंतांचे वाचनीय नवे जुने लेख ह्या ब्लॉगवर सापडतील. मला राजकन्या मस्तानीवर आलेला लेख फारच आवडला होता.
पाटी माझी पटेल काय ? : नीरजाने लिंक दिली म्हणून हा ब्लॉग हाती लागला. अनघा खूप नियमीत लिहिते ह्याचं मला खरच कौतूक वाटतं. तिचे बरेच लेख स्त्री-वेदनेशी जोडलेले असतात.
आतल्यासहित माणूस : ही लिंक तू दिली आहेस का ? नी बद्दल मी काय सांगु ? आळसाईने लिहिले तर फार जबरी लिहिते.
शब्दपट : मणिकर्णिकेचा ब्लॉग. तिचे काही लेख फार छान असतात.
सैनिकहो तुमच्यासाठी : हा माझा फार आवडता. माझ्या माहिती प्रमाणे ह्या बाईंचे सासरे भारतीय सैन्यदलात आहेत/होते. त्यांच्या अनुभवांवर बेतलेला हा ब्लॉग आहे. पण गेल्या कित्येक महिन्यात नवी पोस्ट नाही.
खाईन तर तुपाशी : मेघनाच्या गोष्टी वेल्हाळ पाककृती वाचायला फार मज्जा येते. तिने पण बर्याच दिवसांत लिहिलेले नाही ह्या ब्लॉगवर.
आपला सिनेमास्कोप : हा अजून एक चित्रपट विषयक.
दृष्टीआडची सृष्टी : ह्याच्या बहुतेक सगळ्या पोस्ट्स चित्रपटविषयक असतात.
अर्ध्य : हिच्या काही कविता फारच आवडल्यात. मातृदिनानिमित्त लिहिलेली आणि एक कृष्णावर आहे. बाकी बर्याच डोक्यावरुन जातात. अर्थात माबुदो ;)
उन्हाळ्याची सुट्टी हा एक फार फार गोड ब्लॉग होता.
खा रे खा : ह्याच्या पाककृती, फोटो आणि वर्णनं वाचून 'हाणा रे ह्याला' असं वाटतं. भारी ब्लॉग :)
वटवट सत्यवान !! : सत्यवान खूप वटवट करतो. पण त्याचे काही लेख आवडले होते. रॉक ऑन वर त्याने लिहिलेला मस्त होता.
Post a Comment