नेमेची येतो...

ते उदास वातावरण... ५ वाजता होणारा सूर्यास्त.. त्यामूळे रोजच ऑफ़िस मधून बाहेर पडताना असणारा अंधार,आपण किती उशिरा घरी चाललो आहोत असं feeling देऊन जाणारा... ती निष्पर्ण, चेहेरे पाडून बसलेली झाडं...निस्तेज पांढरट छटा असलेली लॉन ची लांबच लांब बेटं...दाराची फ़ट जरी उघडली तरी झोंबणारी थंड्गार हवा... बाहेर पडलं की येणारं बोचरं वारं..श्वास घेतला तरी नाकात टोचणारी थंडी.. सकाळी गाडी काढ्नाता ती साफ़ करण्यासाठी घ्यावे लाग्णारे कष्ट... त्यात वेळीअवेळी पडणारा पाऊस...shoes, प्रसंगी socks देखिल ओले करून आणखिनच थंडी वाजवणारा... मूळात आपल्याला माहितच नसलेला भर थंडीत पडणारा तो पाउस...कुंद वातावारणात मिणमिण जळणारे ते typical पिवळे दिवे...रस्त्यावरून मंद पणे पूढे सरकणारा traffic...defroster महत्त्वाचा की मागे बासलेल्यांपर्यंत पोहोचणारा गरम हवेचा झोत ह्या कसरतित केलेले ते संथ driving...छान उबदार गाडीतून उतरूच नये असं वाटत असताना गाडी चा दरावाजा उघडल्यावर भसकन येउन अंगावर आदळणारी ती थंड गार हवा...प्रत्येकवेळी घराबाहेर पडताना घालावे लागणारे ते अवजड थंडी चे कपडे... leather jacket चा तो typical वास... कुठे बाहेर गेलंच तर ग्लोव्हज घातलेल्या हातांनी camera stable धरून फोटो काढायची केलेली खटपट... आणि एव्ह्ड करून घरी येउन पाहिल्यावर ते हललेले फोटो...रिकामे ओकेबोके दिसणारे ते jogging tracks, tenis courts... थंडी वाजू नये म्हणून जणू पांघरूणच घेऊन पडून राहिलेले swimming pool... ऑफ़िस मधेही weather बद्दलचे उसासे सोडून झाल्यावरच चालू होणार्या meetings.. week end ला ११:३०-१२ ला उठला की ३/४ तासात संपून जाणारा दिवस...एकंदरितच hybernate झालेलं वातावारण...
ह्या सगळ्याबरोबरच हलकेच चालू होणारा snow fall.. !!!! सकाळी खिडकीतून बाहेर बघितल्यावर पडताना दिसणारे जणू कापसाचे पुंजके...पार्कीगमधून ऑफ़िस पर्यंत जाताना jacket वर जमलेलं बर्फ़... ऑफ़िस मधे शिरता शिरता दारा पाशीच असलेल्या कॉफ़ी शॉप मुळे दरवळणारा कॉफ़ी चा वास...झोंबणार्या वार्यातून breve किंवा starbucks मधे शिरून घेतलेल्या हॉट चॉकलेट किंवा mocha च्या कपाचा उबदार स्पर्श आणि जिभेवर रेंगाळ्णारी चव...ऑफ़िसच्या १९ व्या मजल्यावरुन खिडकी ला नाक लावून बघितलेलं हिमाच्छादित शहराचं द्रुष्य...घराभोवती जमलेल्या बर्फ़ावर केलेली मस्ती...गारठणार्या हातांनी बनवलेला snow man...दुसर्यादिवशी च्या उन्हात घट्ट झालेल्या बर्फ़ाचे चकाकणारे स्फ़टिक...थंडीतून घरी आल्यावर fire place पाशी शेकलेले हात... कधितरी बर्फ़ात केलेलं sking.. ते करताना झालेली धडपड...कधितरी भर थंडीत हौसेने बाहेर पडलेली gang... हॉटेल मधे जागा मिळेपर्यंत बाहेर केलेला दंगा... पाय गारठून जाउ नये म्हणून मारलेल्या उड्या... हौसेला मोल नाही म्हणत -१० deg मधे disc पर्यंत जाउन केलेलं New Year celebration...कधितरी अचानक पड्णारं ऊन आणि blinds मधून आत येणारी चूकार सूर्य़किरणं... हळूहळू शून्याच्या वर जाणारं तापमान..घरासमोरच्या झाडावर दिसणारी दोन इवलिशी पानं..वसंताची चाहूल देणारी.. hybernate झालेल्या निसर्गाला जागं करणारी... !!!

Winter is back....lets face it to enjoy the beautiful spring which will follow shorlty....(:-o) !!!!!!!!!

6 प्रतिसाद:

hemant_surat said...

पराग,
अतिशय जीवंत चित्रण केलं आहेस. वाचताना केव्हा तुझ्याकडे पोचलो आणि वातावरण share करायला लगलो ते कळलंच नाही. तुझे gloves, boot, car या सगळ्यांबरोबर आम्हीही बर्फ़ाचे साक्षीदार बनलो. आता जेव्हा हे वातावरण बदलून cheerful बनेल, तेव्हाही आमच्याबरोबर share कर.

hemant_surat said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

fundoo!
:)

Anonymous said...

Very optimistically written but a realistic view of winter ... :) I'm already counting the days to spring ...

Anonymous said...

निसर्गाच्या बदलाचे अतिशय सुरेख वणर्न. छोट्या छोट्या निरिक्षणांवरुन जी गुफंण करतोस, त्यातच तुझ्या लेखांचे वाचकाशी नाते जुळते.

शुभेच्छा!!!
~ श्रीश

komal said...

amazing blog!!!! phaaarach bhari!!!!!