गेलं शतक सरताना कॉलेजात शिकलेल्या आमच्या पिढीला 'गुरुकुल' म्हटलं की मिश्या फुरफुरत परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनाचे फंडे देणारा बच्चन आणि थंडी असूनही स्वेटर अंगात न घालता तो खांद्यांवर लटकवून फिरणारा शहारूख आठवतात. पण मी म्हणतोय ते 'गुरूकुल' हे नव्हे. आमचं गुरूकुल म्हणजे सुमारे वीस वर्षांपूर्वी सिअॅटलला सुरू झालेली भारतीय भाषा शिकवणारी शाळा. सुरुवातीला हिंदी आणि आता हिंदी बरोबरच मराठी, कानडी आणि गुजराथी ह्या भाषांचं केजी ते सहावीपर्यंतच शिक्षण गुरुकुलमध्ये दिलं जातं.
आम्ही अटलांटाला असताना तिथल्या मराठी शाळेने रियाला जन्मदिनांकाचे कारण सांगून प्रवेश नाकारला होता. रियाला एलिमेंटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पण दहा दिवसांच्या फरकामुळे मराठी शाळेतला प्रवेश हुकला. त्यांचे वयाचे निकष इलिमेंटरी स्कूलच्या निकषांपेक्षा वेगळे होते. तसे निकष ठरवण्याचा निर्णय हा त्यांनी "अत्यंत विचारपूर्वक" घेतलेला होता म्हणे! अर्थात आम्ही वर्षाच्या मध्यात सिअॅटलला आलो त्यामुळे फार काही फरक पडला नाही. झी मराठीच्या मालिका, आमच्या भारतवार्या आणि रियाच्या आजीआजोबांच्या अमेरीकावार्या ह्यांच्याआधारे रिया मराठी व्यवस्थित बोलत होती.
अमेरिकेत वाढणार्या मुलांनी मराठी नक्की का शिकावं? अश्या विषयावर मध्यंतरी मायबोलीवर चर्चा झाली होती. तेव्हा रिया नव्हतीच त्यामुळे त्या विषयावर कधी खोलात शिरून विचार केला नव्हता पण आता करायची वेळ आली. पुढे-मागे मिळेल तेव्हा मिळणारे हायस्कूल क्रेडीट तसेच व्हिसाचे झोल किंवा इतर कुठल्याही कारणाने अचानक भारतात परतायची वेळ आली तर तिथे गेल्यानंतर अडचण व्ह्यायला नको हे काही प्रत्यक्ष फायदे आहेतच पण त्याखेरीज अजूनही काही कारणं महत्त्वाची वाटली. आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे सगळेच मराठीतून विचार करतो, मराठीत बोलतो, मराठी वाचतो, सिनेमे/ मालिका पहातो, गाणी ऐकतो आणि आम्हांला ते सर्व आवडतं. हे सगळं आपल्या मुलीलाही आवडलच पाहिजे असं नाही पण त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तरी तिच्यात असावी हा आमचा तिला मराठी शिकवायचा हेतू आहे. शिवाय आम्ही (तिला किंवा एकमेकांना किंवा इतर कोणालाही) मारलेले टोमणे, कुजकट बोलणं आणि "माझं नाव काय? आणि मी कुठे जाते आहे? ह्याचं उत्तर एकच आहे!" छापाचे मराठीतले अत्यंत पांचट विनोद तिला कळावे हा एक छुपा हेतूही आहेच.
गुरूकुलमध्ये रियाचं नाव नोंदवल्यावर संचालकांतर्फे पालकांसाठी एक माहितीपर मिटींग होती. त्यात संस्थेच्या संस्थापकांनी गुरुकुलची माहिती सांगितली तसेच वर्षभराची साधारण रुपरेषा सांगितली. हल्ली एकदंरीत सगळ्यांना प्रत्येक गोष्टीचे "प्लॅटफॉर्म" बनवायचे असतात, त्यात गुरूकुल तर साक्षात मायक्रोसॉफ्ट, अमेझॉमच्या जन्मभुमीत जन्माला आलेलं, त्यामुळे गुरुकुल हा भारतीय भाषा शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे. नवीन भाषा शिकवणं सहज सुरू येऊ शकतं म्हणे. (मला वाटलं आता आमचे सेल्फ सर्व्हिस API आहेत असंही सांगतात की काय पुढे! पण नाही अजून तेव्हडं "अॅटोमॅटीक्क" झालेलं नाही ते.) ही संस्था स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते आणि बहुतांशी शिक्षक हे शिकायला येणार्या मुलांचे पालक असतात. अर्थात अभ्यासक्रम वगैरे ठवरण्यासाठी त्या क्षेत्रातले अनुभवी असतातच. दर रविवारी तीन तास भरणार्या ह्या शाळेत तीन भाग असतात लेखी भाषा, बोलीभाषा आणि कल्चर. कल्चरमध्ये भारतासंबंधीची सगळी माहिती म्हणजे इतिहास, भुगोल, समाजशास्त्र वगैरे शिकवले जाते. कल्चरचा भाग इंग्रजीतून शिकवला जातो आणि तो सर्व भाषांच्या वर्गांना सारखाच असतो.
आम्ही दोघांनीही शिकवण्यासाठी इच्छुकांच्या यादीत नाव दिलं (आणि आम्ही बर्यापैकी 'अनकल्चर्ड' लोकं आहोत, त्यामुळे शक्यतो कल्चर शिकवायला देऊ नका असा एक पिजेही मारून घेतला). पुढे आम्हांला प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून वर्गाचं कामकाज बघण्याची संधी मिळाली तसेच मराठीच्या curriculum team बरोबर बातचीतही झाली. यथाअवकाश शिक्षकांच्या नेमणूका झाल्या. मला पाचवीच्या वर्गाला 'बोलीभाषा' म्हणजे Spoken शिकवायचं होतं. शिल्पाला एक कुठला वर्ग न देता लागेल तसं substitute म्हणून यायला सांगितलं. सगळेच शिक्षक स्वयंसेवक असतात आणि हे कोणाचच पूर्णवेळ काम नसतं त्यामुळे वैयक्तिक अडीअडचणींच्या वेळी substitute लागतातच. काही कारणांनी शिल्पाला पुढे हे करण जमलं नाही पण मला फुम टाईम वर्ग मिळाल्याने आणि तिला पार्ट टाईम मिळाल्याने मला तिला चिडवायची आयतीच संधी मिळाली! पहिल्याच वर्षी एकदम पाचवीच्या वर्गाला शिकवायचं ह्या विचाराने थोडसं टेन्शनही आलं. पण माझ्या दोन्ही सहशिक्षिका मेघना आणि शुभा अनुभवी होत्या. हे त्यांचं गुरुकुल मधलं अनुक्रमे तिसरं आणि दुसरं वर्ष. त्यांच्या अनुभवाचा मला वर्गात शिकवण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम तसेच खेळ घेण्यासाठी आणि मुख्यतः मी लिहीलेल्या इमेल्स, क्लास रिव्ह्यू, स्टुडंट रिव्ह्यू ह्यांचं "मुळमुळीकरण" करण्यासाठी खूपच फायदा झाला! हवा तो मेसेज द्यावा पण मधाचं बोट लावून, नाहीतर पुढे फार गुंता होते हा त्यांचा सल्ला मला फार उपयोगी पडला. प्रत्येक वर्गाला Curriculum coordinator असतो. आमच्या CC मानसीताई ह्या गुरुकुल मराठीच्या संस्थापक सदस्य आहेत. (आमच्या गुरुकुलमधलं "बच्चन" म्हणता येईल असं व्यक्तिमत्त्व त्यातल्या त्यात हेच.. ). शिक्षकी पेश्याचं औपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव असलेल्या त्या (बहुतेक) एकट्याच. त्यांच्या अनुभवाचा आमच्यासारख्या कामचलाऊ शिक्षकांना खूपच फायदा होतो. काहीकाही बाबतीत मतभिन्नता झालीही पण चर्चेअंती मार्ग निघाला. चर्चा, मतं, सुचना विधायक असतील तर त्या स्विकारायला काहीच हरकत नाही हे त्यांचं तत्व आम्हांला नेहमीच उपयोगी पडतं.
मी शाळेत शिकवणार हे ठरल्यावर घरून पहिली प्रतिक्रिया आली की तुझ्यात पेशन्स इतका कमी आहे त्यामुळे एकतर तू शाळ सोडशील किंवा तुझ्या वर्गातली मुलं शाळा सोडतील! पण हे दोन्ही झालं नाही कारण आमचा वर्ग एकदम मस्त होता. तीन मुलं आणि सात मुली. त्यापैकी प्रसन्न, आदित्य, रिथ्वी, सची ही एकदम अतिउत्साही, तुडतुडी मंडळी. अभ्यासापासून दंगा मस्ती पर्यंत सगळं करायला कायम पुढे. इशा, आर्या, तन्वी, अक्षत ही जरा शांत पण तरीही लिखाण, वाचन सगळं एकदम समजून-उमजून करणारी. रिया, सची, मिताली आणि रिथ्वी ही चांडाळ चौकडी वर्गात इतकी बोलायची की बस! एकदा जरा एकमेकांच्या ओळखी झाल्यावर वर्गात मस्त मजा यायची. एकदा रिथ्वी जांभया देत होती म्हणून मी हटकलं तर "तूच इतका जास्त होमवर्क दिलास. तो संपण्यासाठी मला जागावं लागलं त्यामुळे आता झोप येते आहे!" असं म्हणत अगदी डोळे मोठ्ठे करून तिनेच मला झापलं! मानसीताईंकडे Audio books किंवा Audio visual प्रकारातील बर्याच गोष्टींचा खजिना आहे. त्यातले काही गोष्टी आम्ही गृहपाठात ऐकायला देऊन त्यावर पुढच्या तासाला चर्चा करायचो. मुलांनाही तो प्रकार आवडायचा. एका आठवड्यात मी अरूणीमाची गोष्ट मुलांना वाचायला /ऐकायला सांगितली होती. त्यावर "अशी अॅक्सिंडेटमध्ये पाय तुटलेल्या मुलीची गोष्टी आमच्या सारख्या लहान मुलांना वाचायला लावणारा तू किती insensitive आहेस!" असं म्हणून आदित्यने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकले. एका तासाला चितळे मास्तरांची गोष्ट आम्ही मुलांना ऐकायला दिली होती. त्यावर "हे फनी नाही आहे. It just doesn't make any sense!" अशी खरमरीत प्रतिक्रिया प्रसन्नने दिली. कारण मुलांनी शिक्षकांच्या घरी शिकायला जाणं, शिक्षकांनी वर्गातील मुलींच्या लग्नाबद्दल काही बोलणं हे इथे अमेरिकेत शिकणार्या मुलांच्या पचनीच पडू शकलं नाही. खरतर चितळे मास्तरांची गोष्ट मुलांना ऐकायला द्यायला मीच फार उत्सुक नव्हतो कारण त्यातले प्रासंगिक विनोद मुलांना कळणार नाही असं मला वाटलं पण एक प्रयोग म्हणून तो करून बघितला पाहिजे असा मानसीताईंचा आग्रह होता आणि तो रास्त होता कारण मराठीतल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीं मुलांपर्यंत पोहोचवणे हाच तर मराठी शाळेचा हेतू आहे. आता पुढच्या वर्षी चितळे मास्तरांऐवजी पुलंचं अजून कुठलंतरी जरा सोपं कथाकथन देऊन बघू.
पहिल्या सत्र परिक्षेचा तोंडी परिक्षेत आम्ही एक प्रयोग केला. मुलांना पुस्तकातले धडे वाचून दाखवायला सांगायच्या ऐवजी बाहेरचे परिच्छेद वाचायला देऊन त्यावर प्रश्न विचारले. इथे एलिमेंटरी किंवा मिडल स्कूलमध्ये शिकणारी ही मुलं बहुतांशी वेळा इंग्रजीतून विचार करतात. अश्यावेळी माहित नसलेला मराठी परिच्छेद वाचणे, तो समजून घेणे, त्यावर विचार करून मराठीत उत्तरं देणे ही मोठीच क्रिया. कौतुस्कापद गोष्ट म्हणजे सगळ्यांने जवळ जवळ ९०% भाग बरोबर वाचला आणि प्रश्नांची उत्तरही दिली.
पाचवी आणि सहावीच्या वर्गाला एका विषयावर प्रोजेक्ट करायचं असतं. आमच्या वर्गाला 'युगप्रवर्तक श्रीकृष्ण' असा विषय होता. श्रीकृष्णाची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दाखवणार्या वेगवेगळ्या गोष्टी मुलांनी वर्गात सांगितल्या. पुढे वार्षिक दिनाला ह्यातल्याच चार गोष्टी घेऊन आमच्या वर्गाने छोटसं नाटक सादर केलं. केवळ दोन-तीन रविवार प्रॅक्टीस करून मुलांनी नाटक उत्तम सादर केलं पण कदाचित मोठे मोठे शब्द, पल्लेदार वाक्य ह्यांचा मोह आम्ही शिक्षकच आवरू शकलो नाही. मल स्वतःला तिसरी, चौथीच्या वर्गांनी सादर केलेल्या संहिता जास्त आवडल्या कारण त्यांचे विषय, त्यातली भाषा ह्या मुलांच्या वयाला साजेसे आणि जास्त वास्तववादी होते. मात्र ह्या नाटकाच्या तयारी दरम्यानही आम्ही चिकार धमाल केली. खूप हसलो. एकमेकांना चिडवलं, खोड्या काढल्या. अगदी आमच्या शाळेच्या गॅदरींगची आठवण झाली.
मला बाकीच्या वर्गांच्या अभ्यासक्रमाबद्दल माहीत नाही पण आमच्या वर्गाच्या अभ्यासक्रमात पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींवर खूप जास्त भर वाटला. वर्षभरात श्रीकृष्णाचा तर अगदी ओव्हरडोस झाला. 'गंमत-गोष्टी' ह्या प्रश्नमंजुषेच्या उपक्रमाच्या वेळी मी म्हटलं काहीतरी "उथळ आणि पांचट" गोष्ट द्यायला हवी आता नाहीतर ह्या मुलांना वाटायचं की मराठी भाषेतल्या गोष्टी म्हणजे कायमच काही हजार वर्षांपूर्वीच्या आणि गंभीर वगैरे असतात. अभ्यासक्रम निर्मितीतलं माझं ज्ञान किंवा शिक्षण शून्य. अभ्यासक्रम ठरवणं हे प्रचंड अवघड आणि विचारपूर्वक करायचं काम असणार आणि गुरुकुलमध्येही ते विचारपूर्वक केलं गेलं असणार हे खरच पण एक अजिबात अनुभव नसलेला शिक्षक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मला हलक्या फुलक्या गोष्टी, सोप्या कविता, इथल्या मुलांना जवळचे वाटणारे विषय (जस की इथल्या एखाद्या मोठ्या शहराबद्दलचा किंवा राष्ट्रीय उद्द्यानाबद्दलचा लेख, इथल्या कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीचं व्यक्तीचित्रण, Diary of a wimpy kid पद्धतीची विनोदी गोष्ट वगैरे) शिकायला/शिकवायलाही आवडलं असतं. दर रविवारी वर्ग सुरू व्हायच्या आधी कॉमन एरियात सगळ्या शाळांची असेंब्ली होते. त्यात पाचवी आणि सहावीच्या मुलांपैकी एकाला आठवड्यातील घडामोडी दोन-तीन वाक्यांत सांगायच्या असायच्या. बहुतांशी जण मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्या लिहून आणायचे. पण आमच्या वर्गातल्या सचीने इथल्या अमेरिकन फुटबॉटच्या टीमबद्दलची (सीहॉक्स) एक बातमी स्वतःच्या शब्दांत सांगितली. मला अगदी खात्री आहे की ही बातमी तिला मराठी वर्तमानपत्रांत सापडली नसणार! सहावीच्या एका मुलाने मायक्रॉसॉफ्ट करत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा त्याने वापरलेला "आपली कंपनी मायक्रोसॉफ्ट" असा शब्दप्रयोग आठवून मला आजही हसू येतं. मायक्रोसॉफ्ट शब्दश: बॅकयार्डात असल्याने इथल्या मुलांना ते "आपलं" वाटत असणार नक्की! स्वतःला जवळचे वाटतील असे विषय मुलांनी मराठीत बोलले की दर रविवारी इथे आल्याचं सार्थक झालं असं वाटायचं.
गुरूकुल संस्थेचा एकंदरीत पसारा मोठा आहे! फक्त मराठीचा विचार केला तरी २००+ विद्यार्थी, जवळ जवळ ३० शिक्षक, कमिटीतले लोकं, Parent volunteers सगळ्यांनाचे वर्षभराचे काम बघितले तर बरेच Person hours खर्ची पडतात. हे सगळं स्वयंप्रेरणेने असलं तरीही कष्ट घ्यावे लागताततच. ह्या सगळ्यांतून मुर्त स्वरूपातला फायदा अजूनतरी मिळत नाही कारण मराठीसाठीचे हायस्कूल क्रेडीट मिळायला सुरुवात झालेली नाही. हिंदी आणि गुजराथी नंतर आता मराठीसाठीही प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच ते फलद्रुप झाले तर नवीन विद्यार्थ्यांचा सहभाग असून वाढेल.
संस्थेचे संचालक, मराठीचे चेअर तसेच पालक आम्ही शिक्षक करत असलेल्या कामाबद्दल वेळोवेळी खूप कृतज्ञता व्यक्त करत असतात. मला स्वत:ला आपण खूप मोठं सामाजिक कार्य वगैरे करत आहोत असं कधी अजिबातच वाटलं नाही. मुळात हे मला करून बघायचं होतं, आवडेल असं वाटलं होतं म्हणून नाव नोंदवलं होतं. काम किती असणार, काय असणार ह्याची आधी कल्पना होतीच. संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक आधी माहीत होतं. त्यामुळे रविवारी सकाळी उठून गुरुकुलला जायचं कधीच जिवावर आलं नाही. किंबहुना रविवार सकाळची वाटच बघितली जाते. इथे सगळेच स्वयंसेवक असल्याने कसलीच स्पर्धा नाही, संस्थेचे नियम पाळले जावे म्हणून काही पदांना (जसे की Curriculum coordinator, committee, chair etc) निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतात त्यामुळे त्या बाबतीतही फार गुंतागुंत नसते. काही काही वेळा चर्च्यांच्या गुर्हाळापेक्षा असे व्हिटो बरे पडतात. आमच्या वर्गाचे आम्ही तिघं शिक्षक मस्त मजा करतो, गप्पा मारतो. कामं बिनबोभाट होऊन जातात. एखाद्या कडून एखादी गोष्ट राहिली तर दुसरा ती करून टाकतो. शिकवतानाही "हा माझा विषय हा तुझा" असं कधीच झालं नाही. मला कवितांचं फार प्रेम नाही त्यामुळे पाठांतराची एक कविता मेघनाने घेतली आणि ती घेणार होती तो व्याकरणाचा भाग मी घेतला. शुभा तर कल्चरचा भाग स्वतः घेतेच शिवाय मराठीच्या दोन्ही भागांमध्ये तिचा एकदम सक्रिय सहभाग असतो. शिवाय मेघना कडून पिशवी भरून मराठी पुस्तक मिळाली आणि मेघना आणि शुभा दोघींकडूनही अधूनमधून खाऊचे डब्बे मिळतात ते वेगळच. मागे एकदा ट्रेकिंग संदर्भातल्या एका लेखात मी लिहिलं होतं की मधेमधे स्वतःच्या क्षमता ताणून बघाव्यात. ते अर्थातच शारिरिक क्षमतेबद्दल होतं पण गुरुकुलमधलं हे एक वर्षसुद्धा एक नवीन अनुभव, वेगळं काम आणि पेशन्स ह्या दृष्टीने क्षमता ताणून बघणार ठरलं. माझ्या वर्गात बसून मुलांचं मराठी किती सुधारलं ते माहित नाही पण त्यांना वर्गात बसून टवाळक्या करायला मजा आली असणार एव्हडं मात्र नक्की!