शेवटी आज एकदाचा ब्लॉग अपडेट करायला आणि template बदलायचा मुहूर्त लागला... :) (भारतात असताना ब्लॉग लिहायला बंदी आहे का काय?? असा प्रश्न माझा एका मित्रान already विचारून झालाय... !)
US मधली दुसरी इनिंग मागच्या रविवारी चालू झाली... आणि त्याबरोबरच ब्लॉग पण जरा उघडून त्यावरची जळमट दूर करून, जरा थोडा बदल करून अपडेट ही करायचं ठरवलं.. मधे प्रचंड काम, नसलेला मूड आणि काहीही विशेष न घडणारं आयुष्य ह्यामुळे इथे येऊन काही खरडायला नकोच वाटायचं.. ऑफिस मधे एकूणच चालू असलेलं crap डोकं फिरवून टाकयचं... पण ब्लॉग वर ब्रेक घेण्यापूर्वी इतरांनी लिहिले तसे छान छान पोस्टही लिहिता आले नाही... आणि त्यात मधे चालू असलेल्या आपण का लिहितो च्या thread मधे मला कोणीच tag न केल्याने आण्खिनच depression आलं... असो.. (मी आणि depression यायची कारणे ह्यावर एक मोठी series च लिहिता येईल.. :)
US मधली हि Second inning किती दिवस चालेल माहित नाही.. कारण प्रोजेक्ट आधिच बरच फाटलेलं आहे.. मी अजून काही वाईट करू शकत नाही ते एक बरय पण तरीही.. एकूण हे नविन शहर, इथली घरं, ऑफिस, आजूबाजूचा परिसर हे मात्र एक्दम मस्त आहे... पण मी इथे सगळ्य़ात मिस करतोय ते आमचा stl मधला ग्रुप.. मला अजूनही पचनीच नाही पडते की आपण आता इथेच रहणार आहोत.. मधेच अचानक वाटतं की उद्या flight पकडून stl ला परत जायचय...आणि त्यातच येताना एअर्पोर्ट वर माझं flight आलं त्याच्या शेजारीच stl ला जाणारं flight होतं.. त्यामुळे इथे आल्याआल्या homesickness यायच्या आधी stl sickness जास्त जाणवतोय... !!
काल बसल्या बसल्या मराठी ब्लॉगविश्वातले बरेच पोस्ट वाचून काढले... मधल्या काळात मी बरच काही मिसलय की... (आणि माझ्या ब्लॉग चं नाव देखिल अजून दोघांनी ढापलय... ;)
पण आता मात्र इथे regularly चक्कर मारायचं ठरवलयं... बघूया ही us मधली Second inning आणि ब्लॉग अपडेट करायचा उत्साहं किती दिवस टिकतोय ते... :)
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !