मी आणि शाळेत..?? हो, म्हण्जे त्याचा जरा किस्साच झाला.. परवा सकाळी सकाळी पेपर मधे बालकुमार चित्रकला स्पर्धेबद्द्ल वाचल आणि (ऑफिस मधला proactiveness घरी दाखवत) निरजला (भावाच्या मुलाला) विचारलं की तू घेणार का भाग ह्या स्पर्धेत.. एरवी फारसा उत्साह न दाखवणारा निरज अचानक हो म्हणाला..आणि माझी अवस्था अगदी "आ बैल.. " का काय म्हणतात ना तशी झाली... कारण मग त्या स्पर्धेची माहिती काढणे, निरज ला तिथे घेऊन जाणे हे सगळं ओघाने आलच.. स्पर्धेची सगळी माहिती काढून झाली आणि जवळात जवळ सेंटर वगैरे शोधून पण झालं... फक्त प्रोब्लेम हाच होता की वेळ रविवार पहाटे ९ ची होती.. !
तो आणि मी दोघेही कसेबसे उठून एकदाचे त्या शाळेत पोचलो.. जाऊन बघतो तर तिथे हीSSSSS एव्हडी गर्दी.. ! आणि एकूणच सगळे पालक आणि त्यांची पोरंटोरं अश्या थाटात थंडी चे कपडे घालून आहे होते की कोणाला काल अगदी पूण्यात snow fall होऊन गेलाय की काय असं वाटावं.. पूण्यात थंडी पडते मान्य पण म्हणून एव्हडं..?? असो..
तर थोड्यावेळाने तिथे मुलांना वर्गान सोडायला सुरुवात झाली.. मुलांपेक्षा त्यांच्या आयांनाच जास्त उत्साहं होता.. शेवटी एक कडक चेहेर्याच्या बाई तिथे आल्या आणि त्यांनी सगळया उत्साही आयांना बाहेर काढलं.. त्या बाईंचा चेहेरा इतका कडक होता की त्यांच्या वर्गात मुलं कशी काय बसतात काय माहीत.. त्या पण बिचर्या एकूण फारच वैतागलेल्या होत्या... त्यांनी कोणत्या मुलाला "which standard you are in?" असं विचारलं की ते कार्ट हमखास "पहिलीत आहे.. कोणत्या वर्गात जाऊ ??" असं मराठीत उत्तर द्यायचं आणि त्यांनी मराठीत विचारलं की "first standard" असं उत्तर त्यमूळे त्यांना नक्की कोणत्या भाषेत बोलावं ते कळत नव्हतं आणि त्या अत्यंत (पूणेरी) त्रासिक आवाजात दोन्ही भाषांत प्रश्ण विचारत होत्या..
स्पर्धा चालू झाल्यावर मी बाकी काही काम नसल्याने उगाच एकडे तिकडे हिंडत होतो... आता रविवारी सकाळी मी कोणाला फोन केले असते तरी मलाच शिव्या बसल्या असत्या..त्यामूळे "इकडे तिकडे चोहीकडे" बघत आणि ऐकत मी फिरत होतो..
एकेठिकाणी मगाचच्याच त्या उत्साही आया आपल्या मुलांच्या भवितव्या बद्दल तावातावानी चर्चा करत होत्या..
एका मुलीला यायला थोडा उशिर झाल्याने तिला शेवटचा कागग मिळाला होता आणि त्यावर कोपर्यात डाग होता आणि तो नेमका तिच्या आई ने पाहिला त्यामूळे ती आपल्या मुलीवर फार मोठा अन्याय झाला आहे कारण त्या डागामुळे त्तिचं बक्षिस गेलं तर तिच्या मनावर विपरीत परीणाम होऊन हे जग एका मोठया चित्रकाराला मुकेल अश्या आशयाचे dialogue तावातावाने इतरांना ऐकवत होती.. !
नंतर त्यांची चर्चा अचानक मुलांचं करियर प्लॅनिंग ह्या विषयावर घसरली.. अजून एका मातेची तिच्या मुलाने IT त career करावं अशी ठाम इच्छा होती आणि त्या द्रुष्टीने त्याच्या analytical abilities सुधाराव्या म्हणून ती त्याला कोणत्या तरी क्लास ला घालणार होती.. मला अगदी जाऊन सांगावसं वाटत होतं की "अहो काकू (!), IT त काम करणार्य़ांना देखिल आपण एखाद्या analysis मधे आपण नक्की काय आणि का करतोय हे कळत नाही.. आणि तुम्ही उगाच त्या लहान मुलाचा कुठल्या तरी क्लास ला घालून छळ का करता??" आता एश्या odd वयाच्या व्यक्तिंना नक्की काय संबोधाव हे मला एक कळतं नाही.. म्हणजे त्यांना टिपिलक मराठी प्रथे प्रमाणॆ काका काकू पण म्हणता येत नाही.. आणि नावाने पण हाक मारता येत नाही.. ! असो..
दुसर्या एका ग्रुप मधे ह्या शाळेत extra curricular activities फारच कमी आहेत त्यामूळे मुलांची personality development होत नाही ह्यावर नापसंती व्यक्त केली जात होती.. तर त्याउलट कुठे बास झाल्या ह्यांच्या activites जरा अभ्यास घा आता.. enaglish, maths नीट आल्या शिवाय आयुष्यत काही राम नाही अशीही मतं व्यक्त होतं होती..
तिथे आलेले बाबा पालक मात्र शांत होते... एकतर बरेच जण रविवार सकाळ ची झोप मोडल्याने वैतागलेले होते.. आणि ते कंपू करून गप्पा मारत नव्हते.. कुठे कोपर्यात उभं राहून मोबाईल वर बोलत किंवा पेपर वाचत होते..
इतक्यात स्पर्धा संपल्याची घंटा वाजली आणि परत त्या कडक चेहेर्याच्या बाई बाहेर आल्या.. "आम्ही सगळ्य़ा मुलांना ओळखत नाही त्यामूळे एकेक मुलगा पुढे आला की पालकांनी पुढे येऊन त्याला घेऊन जा.." असं खरमरीत आवाजात aanounce केलं आणि तिथे ओळख परेड चा कार्येक्रम सुरू झाला.... निरज दिसल्यावर मी पुढे जाऊन सांगितल्यावर त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून "बघून तर वाटत नाही मुलगा बिलगा असेल ह्याला.." अश्या टाईप expression दिले... तितक्यात निरज नी मला "काकाSSS" म्हणून जोरात हाक मारल्यावर त्या बाईंना जरा हायसं वाटलं.. आणि त्यांनी निरज ला सोडलं..
बाहेर आल्या आल्या निरज मला म्हणतो.. "फिश मार्केट मधे काय असतं?? मला फिश मार्केट बघायला जायचय.." आम्ही जरी nonveg अगदी आवडीने खात असलो तरी ते बाहेर त्यामूळे एकारांत कुलोत्पन्नाने अचानक फिश मार्केट मधे जायची इच्छा व्यक्त केल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं.. मी त्याला विचारलं अचानक हे कुठून आठवलं तुला तर तो म्हणतो.. "आतल्या टिचर म्हणत होत्या केव्हडी गर्दी झाली स्पर्धेला शाळेचं अगदी फिश मार्केट करून टाकलय ह्या मुलांनी.. म्हणून मला फिश मार्केट पहायचय.. "
हे ऐकून माझी हसून वाट लागली.. एकूण काय शाळेतला एक तास मात्र एकदम मस्त.. !!!!!
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !