अखेर मागच्या week end ला आमचं shifting (एकदाचं) पार पडलं... घरात असलेल्या प्रचंड सामनासह परत shifting करायचं नाही असं ठरवूनही परत एकदा ते करावच लागलं... stl मधलं माझं हे तिसरं आणि एकूणातलं सहावं घर...
डोंबिवली ला असताना आम्ही अगदी सुरुवातिला पतंगे बिल्डिंग नावच्या एका चाळित रहात असू... मला आता फारच अंधूक आठवतं त्या घराबद्दलं... तिन (किंवा अडिच म्हणायला हवं खरतर) खोल्या असलेलं आणि मोठी balcony असलेलं ते घर बर्यापैकी जूनाट होतं.. टिपीकल चाळ असलेल्या त्या building मधे आई बाबा सुमारे १४ वर्ष रहात होते.. मोठी corridor वजा balcony, एका ओळीत असलेली ५/६ घरं आणि अगदी शेवटी असलेले २ common संडास... खालच्या मजल्यावर मालक आणि वर आम्ही ३/४ भाडेकरू... त्या घरातली मला ठळक पणे आठवणारी गोष्ट म्हणजे जांभळाच झाडं... रात्री गच्चीत झोपून सकाळी उठून जांभळं तोडून मग खाली यायचं असा काहीसा उन्हाळातला कार्यक्रम असायचा.. एकूण त्या वेळेला गल्ली मधे सगळे वाडे होते.. छान कौलारू घरं, मागे पुढे अंगण, मागे विहीर आणि प्रत्येकाचा घराभोवती मस्त झाडं...
पुढे आमच्याच गल्लीतला एक वाडा पाडून तिथे बिल्डींग बांधायला सुरुवात झाल्यावर आम्ही तिथे नविन आणि ownership च घर घेतलं... दुसर्या मजल्यावरचं, ५ खोल्यांचं, पुढच्या बाजूचं आणि भरपूर हवा उजेड असलेलं हे घर अतिशय छान होतं... मोठा हॉल, प्रशस्त किचन, दोन बेडरुम आणि एक अभ्यासाची खोली (जिथे बसून मी कधिच अभ्यास केला नाही :) आणि पुढच्या बाजूला गॅलरी अश्या ह्या घरात गेल्यावर पतंगे बिल्डींग मधल्या नाकपुडी एव्हड्या आणि common संडास असलेल्या घरात एव्हड्या सामानासह आपण कसं रहात होतो हे आम्हालाच कळायचं नाही... आमच्या मजल्यावर आम्ही, दातार आणि अमोदकर असे तिघं जण खूप वर्ष एकत्र होतो.. बाकीच्या दोन घरातले लोकं बदलत असायचे... अति गळ्यात गळे नाहित आणि कचाकचा भांडणही नाहीत त्यामूळे मजल्यावर नेहमिच "शांतता" असायची... आणि आज आम्ही सगळे जण वेगळी कडे रहायला गेल्यावरही सगळ्यांचा contact असतो... ह्या घरातल्या फरश्या बिल्डरच्या "artistic view" मूळे मघेच डार्क तर मधेच पांढर्या होत्या.... मी लहानपणी फक्त पांढर्या किंवा फक्त काळ्या फरशांवरच चालायचा असा नियम असल्यासारखा बर्याचदा उड्या मारत चालायचो... :) अभ्यासाची खोली ही फक्त पुस्तकं ठेवायलाच बाकी अभ्यास मी जवळ जवळ प्रत्येक जागी बसून केला आणि ठिकठिकाणी माझी पुस्तकं, वह्या, पेन काही ना काही सापडायचच .. !!! रात्री बर्याचदा आई तिचं लिखाण आणि मी माझा अभ्यास करत बसायचो आणि रात्री कॉफी करून प्यायचो... त्यावेळी घराचं decoration, रंगकाम, furniture ह्या तुलनेने low priority गोष्टी असल्याने ते सगळं बरेच वर्ष चाललं होतं.... ह्या घराशी इतक्या आठवणी जोडलेल्या आहेत की पूण्याला shift झाल्यावर ही ते घर विकायचं ही concept च पचनी पडत नव्हती... मी आणि आज्जी ने बाकी सगळ्यांशी fight मारून त्या घराच विकणं सुमारे ६ वर्ष लांबवलं होतं...!! आणि विकल्यानंतर आम्ही आमचं उरलेलं सामान घ्यायला गेलेलो असतान त्या लोकांनी लावलेली घराची लावलेली वाट बघून मला इतक वाईट वाटलेलं आणि राग ही आला होता.. की त्या लोकांना तिथून हकलून देऊन पूर्ण साफ सफाई करावी असं वाटत होतं...
दरम्यान जरा स्थिर झाल्यावर आणि आमची शिक्षणं "मार्गी" लागल्यावर बाबा आणि आज्जीनी त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न असलेलं "पूण्यातलं स्वत:च घर" बांधायचं ठरवलं... आज्जीला तर पूण्यातल्या घराची इतकी हौस होती की तिनी सुमारे ३० वर्षा पूर्वी पूण्यात एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता... बिल्डर, आर्किटेक्ट आणि आम्ही असे तिघेही अगदी एकारांत कोब्रा असून ही त्या घराचं बांधकाम ठरलेल्या schedule पेक्षा सुमारे २.५ वर्ष जास्त चाललं... !!!! आम्ही जेव्हा मे महिन्यात पुण्यात ल्या तयार झालेल्या घरात पहिल्यांदा रहायला गेलो तेव्हा जिकडे तिकडे सिमेंटच सिमेंट अशी अवस्था होती.. सुरुवातिला आम्ही दर मे महिना आणि दिवाळीत तिथे रहायला जात असू आणि नंतर माझी १० वी झाल्यावर कायमचे पूणॆकर झालो... ह्या घरातली बाकीची कामं डोंबिवली पेक्षा relatively लवकर आवारली.... पुढे दादाचं लग्न झाल्यावर आणि निरज झाल्यावर ह्या घरावर अजून एक मजला वाढ्वावा असा विचार झाला आणि माझ्या ऐन शेवटच्या वर्षात वरच्या खोल्यांच काम चालू झालं... पुन्हा जूनी "कोकणस्थ" टिम एकत्र आल्याने ४ महिन्यांच काम १ वर्ष चाललं.. :D एकदा तर त्या बांधकामाचा आवाज मला अभ्यास करत असताना इतका असह्य झाला की मी त्या कामगारांना हकलूनच दिलं... एक पान सुमारे ४ दा वाचून ही मला त्यातलं एक अक्षरही कळतं नव्हतं... ते काम पूर्ण झाल्यावर मला आयूष्यात पहिल्यांदाच स्वतंत्र खोली मिळाली होती.. :) साधारण इतर खोल्यांमधे न बसलेली कपाटं, बेड आणि computer टेबल असं सामान माझ्या खोलीत होतं... अगदी लहान पणा पासून ते आत्तापर्यंत आज्जीच्या खोलीत झोपायची सवय असल्याने माझ्या खोलीत मला सुरुवातिला झोपच यायची नाही.. ! घर शोधणं आणि ते लावणं ह्यातली खरी "मजा" st louis ला आल्यावर होती... इथे सगळं स्वत: करायचं होतं जे आत्ता पर्य़ंत कधिच करायची वेळ आली नव्हती.. :) तसा southmoor चा परिसर बघितल्याबरोबर आवडून जाईल असा होता...आत गेल्यागेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी... २ मजल्यांची उतरल्या छपरांची मधे मधे विटांचं डिझाईन असलेली टुमदार घरं, मोठी लॉन्स, त्या भोवतिचे फुलांचे ताटवे, टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल...एकूण सगळं कसं सुंदर होतं.... मुख्य म्हणजे जिना चढून वर गेल्यावर मोठं coridor आणि त्या भोवती दोन्ही बाजूला घरं अशी हॉटेल सारखी रचना नव्हती... सुरुवातिला घरात माझ्या आणि roomie च्या बॅगा सोडून काही सामान नव्हतं... तेव्हा deals शोधून किंवा गराज सेल मधे जाऊन घरातलं सामान आणायला खूप मजा यायची... पूण्याला घरातली इकडची काडी तिकडे न करणारा मी स्वैपाकापासून सफाई पर्यंत सगळं करायला लागलो होतो.. :) आमचं घर आणि especially किचन southmoor मधलं सगळ्य़ात साफ आहे असं certificate soouthmoor मधल्या housewife gang नी दिलं होतं... :D आणि माझ्या साफसाफाई ची "किर्ती" जगभर पसरवायची कामगिरी माझ्या roomies नी व्यवस्थित केली होती.... :। पुढे माझ्या roomie चा परत जायचा प्लॅन ठरायला लागल्यावर आम्ही 1 BHK घर शोधायच ठरवलं... त्यावेली आम्ही आमच्या peroperty manager ला लई पिळलं होतं... हे घर पुढच्या बाजूला नाही, हे मेन रोड पासून खूप आत आहे, 1 BHK townhouse चं डिझाईन चांगलं नाहिये, २ BHK townhouse महाग आहे, ह्या घराच furniture जुनं आहे, ह्या घरात उजेड कमी आहे, इतर काही नाही तर ह्या घराजवळ काही irritating लोकं रहातात इ सगळी कारणं देऊन झाली.... शेवटी तिने आम्हाला सांगितलं की माझ्याकडे ही घरं आहेत.. कोणतं हवय ते तुम्ही ठरवून सांगा.... :) त्यावेळचं shifting फार तापदायक होतं.. भर थंडीत आणि week day ला संध्याकाळी... :(
ते 1 BHK लहान पडायला लागल्यावर आणि अजून एका मित्राला accomodate करण्यासाठी पुन्हा एकदा घर बदलणे कार्यक्रम झाला... ह्यावेळी मात्र पाहिल्याच प्रयत्नात romodelled, पुढच्या बाजूचं, भरपूर हवा उजॆड असलेलं, ground floor वरचं असं घर मिळालं... दोघांच्याही घरात प्रचंड सामन असल्याने कौशिक, विनोद, निशांत सारख्या तगड्या जवानांपासून अवंती, चंदना, मिता ज्यांनी छोटे मोठे खोके हलवायला मदत केली अश्या सगळ्य़ांनी च खारीचा का होईना पण वाटा उचलला... :)
आधी आम्ही गराज सेल मधे जाऊन सामान उचललं पण आता आम्हालाच गराज सेल लावायची वेळ आली आहे... !! सध्या घरात असलेल्या सामानातल्या काही मुख्य गोष्टी म्हणजे २ microwave, सुमारे ७ वेगवेगळ्या प्रकारची टेबल्स including 2 dining tables, २ iron boards, 3 irons, सर्वप्रकारच्या साफसफाईच्या साबणांचे १०/१२ डबे, सुमारे १५० हॅंगर, infinite चमचे, १०-१२ मसाल्याची पाकिटे, ४ मोठे conrflakes चे डबे, 3 राईस कूकर आणि वेगवेगळ्या आकाराचे असंख्य खोके जे अजूनही घरभर पडले आहेत.... !!!!
८ दिवस झाले तरी अजून आवरा आवरी संपतच नाहिये... आणि tacobell आणि burger king वर दिवस काढणं चालू आहे... ह्या shifting नंतर आता stl मधे परत shifting करायचं नाही असा निश्चय मी परत एकदा केला आहे... hopefully तो पतर मोडावा लागणार नाही... :)
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
2 प्रतिसाद:
एकदमं आवडलं पोस्ट पराग! घरं बघणे, रहाणे, त्याबद्दल बोलणे, वाचणे हा प्रकारच एकंदर माझ्या दॄष्टीने इंटरेस्टींग. घरांबद्दल बेफ़िकीर माणसं एकंदर त्यांच्या आयुष्यांबद्दलच बेफ़िकीर असा काहीसा फ़ंडा माझा अजुनही आहे. एक मात्र खरं की चांगल घर शोधायला गेलात तर अगदी तुम्ही दमेपर्यंत ते हुलकावणी देत रहातं आणि कधीकधी अचानक सामोरं येतं ते इतकं छान असतं की तुम्ही इमॅजिनही केलेलं नसतं. प्रत्येकाचीच घर घर की कहानी म्हंटली तर वेगळी तरीही एकाच समान अंगणांची.
सुरेख लिहिलं आहेस.
mala vatata ajun kimaan ekadaa tari shifting karawa lagnarach aahe ;) :)
Post a Comment