| Tuesday, October 27, 2009 |
| वाढदिवस... |
इथे आमच्या घरापासून दिड मिनीटाच्या अंतरावर एक डंकीन डोनट आहे. मला कधी अँटी-सोशलाईझिंगचा अॅटॅक आला, डोक्याला शॉट बसला (तो बसायला कुठलंही कारण पुरत.. :) ) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्याचदा बाहेरच बसतो.. ओल्ड मिल्टन पार्कवे वरचा ट्रॅफिक बघत, येणार्या जाणार्या गाड्यांमधून उतरणारी माणसं बघत छान वेळ जातो... बर्याचदा हातातलं पुस्तक नुसतच धरलं जातं आणि एक पानही पूर्ण वाचून होतं नाही..
आज सकाळी डंकीन मधे जायला रूढार्थाने तसं काहीच कारण नव्हतं... म्हणजे मला ना अँटी-सोशलाईझिंगचा अॅटॅक आला होता, ना डोक्याला शॉट बसला होता, ना पुस्तक वाचायचं होतं पण का कोण जाणे मी देवळातून परत येताना डंकीन डोनट च्या दिशेने गाडी वळवली...नेहमी प्रमाणे कॉफी घेऊन ती खूप गरम असल्याने नुसतचं प्यायल्या सारखं करत मी ट्रॅफीक बघत बसून राहिलो.. गेल्या दोन दिवसातल्या बड्डे जश्न बद्दल विचार करत बसलो...
वाढदिवस... ! कधीकधी मला वाटतं वाढदिवस हा वर्षातला एका असा दिवस असतो की ज्या दिवशी तुमचं स्वतःचं काही कर्तुत्व नसताना उगीच तुमचं भारी कौतूक केलं जातं !!!!! हो म्हणजे आपल्याला जन्माला घालणं हे आपल्या आई-बाबांचं कर्तुत्व.. नंतर वाढवणं मोठं करणं हे पण त्यांचंच काम.. थोड्या वर्षांनी आपण आपोआपच मोठे होतं असतो.. ह्या सगळ्यात आपला स्वतःचा सहभाग् किती ? ते कौतूक आपण खरचं डिसर्व्ह करतो का? असा प्रश्न कधीकधी पडतो.. ! तसंच माझं ही बरच कौतूक आणि लाड त्यादिवशी झाले.. १२.०१ वाजता आलेल्या शिल्पाच्या फोन पासून दुसर्या दिवशी ११.५० वाजता तिच्या भावाच्या आलेल्या फोन पर्यंत दिवसभर फोन चालूच होते. अनेक जणांनी ऑर्कूट, फेसबूक, इमेल वर शुभेच्छा दिल्या. मायबोलीवरही पार्ले बीबी मला दिलेल्या शुभेच्छांनीच भरला होता.
इथल्या प्रथेप्रमाणे माझे मित्र रात्री १२ वाजता केक घेऊन आले. पण ह्या वेळचं वेगळेपण म्हणजे माझ्या मित्राने आणि त्याच्या रूमी ने स्वतः घरी केक बनवून आणला होता. फार भारी वाटलं मला.!!!! घरच्या व्यतिरिक्त बहूदा पहिल्यांदांच इतर कोणी केक केला होता.. ! मागच्या वर्षी मला साधं विश पण न करणारे माझे ऑफिसमधले काही कलिग्ज रात्री १२ ला घरी आलेले बघून मला भरून वगैरेच यायचं बाकी राहिलं होतं. :) खूप दंगा झाला एकूण... दुसर्या दिवशी देसी बुफे ला तुडूंब खाणं झालं.. नंतर छान झोप ही झाली. माझा मित्र, त्याचा रूमी, माझा रूमी, ऑफिसमधली काही जनता, त्यातले कोणाकोणाचे बाकीचे मित्र अश्या सगळ्या मंडळींचा मिळून रात्रीचा प्लॅन पण तयार झाला होता. इथे एका क्लब मधे देसी पार्टी होती. ११:३० पर्यंत गेलं तर फ्री एंट्री वगैरे ऑफर्स पण होत्या. खर म्हणजे मला पब/ क्लब मधे जायचा फारसा उत्साहं नसतो.. पण चांगला ग्रुप असेल आणि ग्रुप मधलं एकतरी कोणी ड्रिंक्स न घेणारं असेल (किंवा मग तो पब मायामी किंवा न्यू ऑर्लीन्स चा असेल ;) ) तर मग मी जातो. का माहित नाही पण एकूणातच मला तिथली सगळी एंजॉयमेंट ही बर्याचदा बुरखा पांघरल्यासारखी किंवा उसना आवेश आणल्या सारखी वाटते.. म्हणजे वर सगळ्यांचे चेहेरे हसरे, आनंदी दिसतात पण मागे काहितरी वेगळचं दडलय की काय असं वाटतं..
रस्ते चुकणे, पार्किंग शोधणॅ असे सगळे नेहमीचे प्रकार करत आम्ही एकदाचे त्या पब मधे जाऊन पोचलो. पार्टीच्या वेळेपेक्षा जरा जास्तच लवकर पोचल्याने तिथे त्या वेळी काहिच चालू नव्हतं. सो त्याच्याच शेजारी असलेल्या एका फिरंगी पब मधे गेलो. तिथे लाईव्ह बँड चालू होता. म्युझिक एकदम छान होतं.. आमची जनता पण एकूण खुष झाली आणि त्यांचं पेयपान ही एकीकडे चालू झालं.. मी आणि माझा मित्र स्प्राईट पित त्यांना कंपनी देत होतो.. :) पेय आणि गाण्यांबरोबर पार्टीचा रंग हळूहळू चढत होता.. तिथे हॅलोवीन बॅश असल्याने बँड पण एकदम उत्साहात होता.. २/३ ड्रिंक्स झाल्यावर सगळ्यांना परत देसी पार्टीची आठवण झाली आणि आम्ही एकूण रागरंग बघायला त्या जागी परत आलो. त्यावेळपर्यंत इकडचा माहोल एकदम बदलला होता.. आता तिथे चांगलीच गर्दी झाली होती आणि गाणी पण जोरदार सुरु होती. लोकांच्या पोटात गेलेल्या पेयाचा परीणाम होऊन सगळ्यांची पावलं गाण्यांवर थिरकायला लागली होती... माझा रूमी अगदी टिपीकल नॉर्थी असल्याने त्याचं पार्टी-शार्टी / डान्स- वान्स एकदम जोरात चालू होतं.. :) भुतापेक्षा ही डान्सफ्लोरला भिणार्या आणि ड्रिंक्स न घेणार्या मला वास्तविक तिथे करण्यासारखं काहीच नव्ह्तं. पण मित्र मंडळींबरोबर टाईमपास आणि "इकडे तिकडे चोहीकडे" बघणे ह्यात वेळ छान चालला होता.. आमच्या जनतेच्या ड्रिंक्सची लेव्हल पण बियर सोडून वर गेली होती आणि त्याची पातळी डोक्यातही वर वर जात असल्याने एकूण मजा मजा चालली होती. लोकाग्रहास्तव मीही १/२ वेळा डान्सफ्लोर वर जाऊन आलो पण एकूण माझे रंग बघता त्यांनी मला आग्रह करणं सोडून दिलं.
दरम्यान तिथे एक एबीसिडी ग्रुप आला..चाळीशीच्या वरच्या स्त्रिया आणि पुरुषांचा हा ग्रुप अगदी साड्या, कुरते वगैरे ट्रॅडिशनल अवतारात आणि ते सगळे जणं बोलण्याचालण्या वरून अगदी "क्युल" वाटत होते.. ! आमची मित्र मंडळी जिकडे नाचत होती त्याच्याच आसपास त्यांचाही नृत्याविष्कार चालू होता.. रात्रीचे अडीच वाजले आणि पार्टी संपायला अर्धाच तास उरला.. तो पर्यंत माझा रूमी बराच हाय झाला होता.. आणि त्यामुळे आपण आता निघावं असं माझा मित्र मला येऊन सांगून गेला.. पण नंतर अचानक अर्धाच तास राहिलाय सो ३ लाच जाऊन असं ठरलं.. दरम्यान तो देसी ग्रुप आणि आमचा ग्रुप सगळे एकत्र नाचायला लागले... त्यातल्या एक बाई फारच उत्साहात येऊन माझ्या रूमी बरोबर नाचायला लागल्या.. बघता बघता मर्यादेपेक्षा जास्तच जवळ येत गेले आणि अचानक त्या बाईंनी मला उचल असा आग्रह माझ्या रुमीला सुरु केला.. त्यानेही तो तात्काळ मान्य करुन प्रयत्न केले आणि ते दोघेही खाली पडले.. एकूण प्रकार जरा अवघड होणार हे (बहूतेक) त्याच्या लक्षात आल्याने तो तिथून दुर गेला.. त्या बाईंच्या नवर्याने त्यांना उचलून काही बाही प्रकार केले.. एकूणात त्या बाईंचं वागणं मला तरी फारच डेस्पो वाटतं होतं. नंतर लक्षात आल्यावर त्या परत माझ्या रूमी ला शोधायला लागल्या आणि तो सापडल्यावर परत त्यांचं नाचणं सुरू झालं ते शेवटपर्यंत .. मला त्यातल्या काही स्टेप्स आणि तो सगळा प्रकारच बर्यापैकी हिडीस वाटला.. नंतर गाणी बंद झाल्यावर सगळ्यांचं एकमेकांच्या गळ्यात पडून "इट वॉज सो नाईस.. सो क्यूल" वगैरे करून झालं.. आमच्या ग्रुप ने माझ्या रूमी ला त्याच्या डांसिंग "स्कील्स" करता डोक्यावर घेतलं... नंतर गाडीतून घरी परतताना भ, फ च्या सर्व बाराखड्या वापरून त्या बाईंना, नवर्याला आणि फॉर दॅट मॅटर जे काय सुचेल त्या सगळ्याला शिव्या घालून झाल्या.. !! मला सगळ्या प्रकरात नक्की काय रिअॅक्ट व्हावं हेच कळेना कारण मुळात मला काय खटकलं होतं ते कळत नव्हतं.. तो सगळा प्रकार बघून मला कल्चरल शॉक बसला होता ?? पण त्यासाठी काही मी अमेरीकेतल्या पब मधे पहिल्यांदा गेलो नव्हतो, देसी बाईच्या जागी फिरंग बाई असती तर परिस्थिती बदलली असती ? कदाचित नाही ! मग झाल्या प्रकाराची पूर्ण शुध्दीत असलेल्या माझ्या मित्रासकट सगळ्यांनी केलेली भलावण मला आवडली नव्हती? कोणी काय एंजॉय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. माझ्या अपेक्षांचा संबंधच कुठे येतो?? माझ्या रूमी ची भाषा मला खटकली होती? ते ही नसावं कारण मी काही त्याच्या तोंडून वल्गर गोष्टी पहिल्यांदाच ऐकत नव्हतो.. की मग सगळं जग एंजॉय करत असताना न पिणारा आणि डांस फ्लोर वर न जाणारा मीच एकटा करंटा ह्याची मला खंत वाटतं होती ? पण ती ही शक्यता कमीच होती कारण ही सिचुएशन पण पहिल्यांदा आली नव्हती... अँड इट वॉज नॉट माय कप ऑफ टी.. वास्तवीक माझा रूमी, त्या बाई, आमच्या ग्रुप मधली बाकीची मंडळी, त्या डांस फ्लोर वरची ईतर मंडळी ह्या कोणालाच त्या प्रकाराबद्दल काही वाटत नसताना माझ्या सारख्या बाहेर बसून मजा बघणार्याने त्याबद्दल काही विचार करायचा संबंधच नव्हता.
पण तरीही परतीचा वाटेवर ना मी काही ऐकू शकलो ना काहॉ बोलू शकलो...
डंकीन मधे बसून विचार केल्यावर सहज जाणवलं.. आपण एखादं चांगलं मासिक वाचतो, चांगल सिनेमा पहातो. एखाद्या चांगल्या बुफे ला जातो.. पण कधी कधी त्यातला एखादा लेख, एखादं प्रसंग/ गाणं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नाही म्हणून संपूर्ण गोष्टीचा आनंद का घालवा... खटकलेला अर्धा तास सोडून वाढदिवसाच्या दिवशीचे खूप आनंदात गेलेले बाकी साडे- तेवीस तास परत एकदा आठवत मी डंकीन मधून बाहेर पडलो.. :) |
posted by Parag @ 8:54 PM  |
|
|
|
| Sunday, July 13, 2008 |
| इये घराचिये नगरी.... |
काही बारीक सारीक बदल झालेत.. खूप मोठं असं काहीच नाही.. तसही ८/९ महिन्यात काय बदलणार म्हणा...पण मला आपलं वाटतं होतं की एखादा तरी drastic बदल झालेला असावा आणि मी तिथे असणार्या नविन "मुलांना" एकदम uncle style मधे सांगावं की आमच्या वेळी हा रस्ता असा नव्हता किंवा घराजवळ हे दुकान झाल्याने किती सोईस्कर झालयं.. नाहीतर आम्हाला किती हाल काढावे लागले इ. इ.... :) (तसही तिथे नुकताच आलेला अवंती चा replacement मला आल्यापासून अहो-जाहो करत असल्याने मला अंकल झाल्यासारखच वाटत होतं.. ! असो.. ) दुसर्या इनिंग साठी इथे आल्यापासून मला home sickness सारखाच (की त्यापेक्षा जरा जास्तच??) सेंट लुइस सिकनेस जाणवत होता... त्यामुळे गेल्यावर आमच्या जुन्या ग्रुप मधले ४/५ जणं तरी तिथे असे पर्यंत तिथे जाऊन यायचच असं ठरवलं होतं... तिथल्या प्रत्येकच जागेशी काही ना काही आठवणी जोडलेल्या असल्याने मला तर सगळीच कडे जायचं होतं पण रात्र थोडी आणि सोंगं फार अशी स्थिती व्हायला लागली.. अवंती जायच्या आदल्यादिवशी तिथे पोचायचं होतं खरं म्हणजे तिच्या send off निमित्त सगळे एकत्रच भेटले असते.. आणि शिवाय शेवटच्या दिवशी पॉटलक.. मग त्यानिमित्तानी केलेला रात्रभराचा टाइमपास नंतर steak n shake मधे किंवा deny's मधे जाऊन घातलेला धूडगुस हे सगळं पण करता आलं असतं.. पण शेवटी अवंती ची आणि माझी भेट मात्र अगदी हिंदी पिक्चर स्टाईल मधे फ्लाईट्च्या गेट वर झाली म्हणजे मी c-7 वर land झालो आणि ती c-9 वरून निघणार होती.. फक्त हिंदी पिक्चर सारखी अचाट आणि अतर्क्य धावाधावी करायची वेळ मात्र आली नाही.. :) दरवेळी प्रमाणे लॅंडिंगच्या वेळी मी आर्च दिसत्ये का ते बघायचा आटॊकाट प्रयत्न केला पण ह्यावेळी काही दिसली नाही ती.. तिथे सध्या आलेल्या पुरामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं होतं.. त्या पुराच्या पाण्यात आर्च वाहून बिह्नन गेली नाही ना असा एक फनी विचार पण मनात येऊन गेला... जवळ जवळ वर्षभर चालू असलेलं aa च्या गेट जवळचं काम अखेर संपलेलं दिसलं त्यामुळे एअर पोर्ट वर एकूणात पसारा कमी वाटत होता.. आणि तसही आज मला ते एअरपोर्ट फारच सुंदर वगैरे वाटत होतं... ! बाहेर आमची जनता थांबलेलीच होती.. विनोद, LP ह्यांच्याबरोबर नेहमी प्रमाणे ओरडाआरडा करून झाला.. I-70 वर नेहमी प्रमाणेच किचाट गर्दी होती.. पण 270 वर आल्यावर मात्र कसं एकदम होमली वाटलं... तुम्ही एखाद्या शहरात आलात की त्यातल्या एखाद्या भागाशी, रस्त्याशी चटकन नातं जोडलं जातं..आणि तो भाग चटकन "आपला" वाटू लागतो... तसच काहीस आमचं I-270 बद्दल झालं होतं.. त्यामुळे मी, चंदना आणि कधी कधी गौतम फारच nostalgic झालो की तिथल्या exits ची नावं आठवत बसायचो... ! आणि तिथे असताना त्या हायवे वरचा एक bridge चंदना ला पुण्यातल्या म्हात्रे पुला सारखा वाटायचा... :D "अरे वा i-64 चं काम शेवटी सुरू झाल वाट्ट", "इथे speed limit दाखवणारे electronic boards नविन दिसतायत", "Dierberg समोरची सगळी झाडं तोडून काय टाकली??", "वा st anthony ला रंग दिला की.." अश्या माझ्या comments वर गाडीतल्या लोकांच्या reactions हुंकार, दुर्लक्ष, तुच्छ कटाक्ष आणि मग चिडचिड अश्या क्रमाने बदलायला लागल्यावर मात्र मी त्या comments मनातल्या मनातच मारायला लागलो.. :) पण होतं काय आपल्या मनातल्या snap shot शी समोरची गोष्ट जुळ्ली नाही की अशी पटकन ते तोंडातून निघून जाते.. पण शेवटी घराजवळचं टॅकोबेल न दिसल्यावर मात्र मी न रहावून तोंड उघडलंच.. नाही म्ह्टलं तरी आम्ही घराच्या shifting च्या वेळी जगलो होतो त्या टॅकोबेल वर.. !!! पण ते बंद झालं नाही तर रस्त्याच्या दुसर्या बाजुला गेलयं आता... साउथमूर मधे मात्र विषेश काही फरक झालेला नाही जाणवला... नाही म्हणायला "Now we acceept dogs too !" अशी पाटी लावून घरात कुत्रा पाळणं allow केल्यावर त्या पाळलेल्या कुत्र्यांसाठी bark park नावाचा प्रकार चालू केलाय...पण बाकी सगळ्या गोष्टी अगदी होत्या तश्याच दिसल्या.. कधीकधी एखाद्या ठिकाणच्या लोकांपेक्षा आपली त्या जागेशीच ओळख होऊन जाते.. तस काहीसं आमचं सगळ्यांच stl आणि southmoor बद्द्ल झालयं.. माझ्या जुन्या ग्रुप पैकी कमी जणं शिल्लक असून आणि नवीन आलेल्या कितीतरी लोकांना मी पहिल्यांदाच भेटूनही अजिबात परके पण जाणवलं नाही.. कारण चेहेरे वेगळे असले तरी जागेशी ओळख जूनीच असल्याने असेल कदाचित... ! आमचं घर अजून आहे तसच आहे.. ! काही माणसं बदल्यावर झालेले बदल वगळता विषेश फरक असा नाहीच.. एव्हडच काय पण मी जाताना घेतलेल्या पण वजन जास्त झाल्याने मी तिथेच ठेवून दिलेल्या गोष्टी अजून त्याच जागी आहेत.. !!!! कावरे साहेबांनी नी अगदी "मुझे परिवर्तन पसंद नही" थाटात सगळा कारभार चालवलेल दिसतोय.. :) आपण कोणाला बर्याच दिवसांनी/ वर्षांनी भेटलो की त्यांच्या वयाप्रामाणे किंवा इतर अनेक कारणांनी त्यांच्या दिसण्यात/वागण्यात फरक पडलेला जाणवतो.. आणि बर्याचदा हा फरक नकोसाच असतो.. जागेचही बहूदा तसच असतं.. मागच्या वेळी पुण्याला गेल्यावर काही ठिकाणी तसच झालेलं... stl किंवा southmoor मधे तसं काही व्ह्यायची शक्यता कमीच होती.. पण दोन्ही ठिकाणांनी माझा अपेक्षाभंग न केल्याने आनंद झाला... Hindi movies दाखवणारं थिएटरं, तिथे तिकीट चेक करणारे ते देसी दुकानातले काका, तिथल्या फक्त देसी पिक्चरलाच असलेली लाईन, आम्हाला न मिळालेल्या जागा आणि मग शेवटी आम्ही बसलो त्या पायर्या ह्या मधे ही अगदी काही फरक नाही.. त्या थिएटर मधे जिन्यावर न बसता सिट वर बसून आम्ही किती पिक्चर पाहिलेत कोण जाणे.. ! येता जाता YMCA आणि library पण दिसली... ही दोन्ही ठिकाणं आणि वॉलमार्ट अगदी जवळची आणि खास ओळखितली.. YMCA मधली rectopion counter वरची आज्जी शेवटच्या दिवशी अगदी प्रेमानी म्हणाली होती.. परत इथे येशिल तेव्हा stl लाच ये.. !! I-55, Downtown, आमच्या ऒफिसची बिल्डींग, ऑफिस मधलं breve coffee shop, Hunana chinese rest, Baielies chocolate bar ह्या सगळ्या गोष्टी वेळेअभावी राहूनच गेल्या... पण अर्थात परत तिथे जायला काहीतरी कारण पाहिजे ना... ! आमचे बाहेरचे मित्र म्हणतात तसं stl मधे लोकं बदलली, "पिढ्या" बदलल्या पण तिथे चालणार्या ativities, परंपरा, टाइमपास, फेरवेल्स, गणपती, दिवाळी, mid night birthday celebrations, दारूपार्ट्या, पॉटलक, टेनिस sessions, एकूणच सगळी हौस आणि उत्साह हे मात्र कधीच नाही बदललं... आता पुढच्या long week end पर्यंत आमच्या जुन्या ग्रुप मधले जवळ जवळ सगळेच तिथून बाहेर पडले असतिल.. मी कधी परत जाईन त्तिथे माहित नाही.. पण माझं US मधलं पहिलं शहरं म्हणून stl माझ्यासाठी नेहमीच घराचिये नगरीच राहिल.. ! |
posted by Parag @ 6:19 PM  |
|
|
|
| Sunday, June 22, 2008 |
| Second inning.. ! |
शेवटी आज एकदाचा ब्लॉग अपडेट करायला आणि template बदलायचा मुहूर्त लागला... :) (भारतात असताना ब्लॉग लिहायला बंदी आहे का काय?? असा प्रश्न माझा एका मित्रान already विचारून झालाय... !) US मधली दुसरी इनिंग मागच्या रविवारी चालू झाली... आणि त्याबरोबरच ब्लॉग पण जरा उघडून त्यावरची जळमट दूर करून, जरा थोडा बदल करून अपडेट ही करायचं ठरवलं.. मधे प्रचंड काम, नसलेला मूड आणि काहीही विशेष न घडणारं आयुष्य ह्यामुळे इथे येऊन काही खरडायला नकोच वाटायचं.. ऑफिस मधे एकूणच चालू असलेलं crap डोकं फिरवून टाकयचं... पण ब्लॉग वर ब्रेक घेण्यापूर्वी इतरांनी लिहिले तसे छान छान पोस्टही लिहिता आले नाही... आणि त्यात मधे चालू असलेल्या आपण का लिहितो च्या thread मधे मला कोणीच tag न केल्याने आण्खिनच depression आलं... असो.. (मी आणि depression यायची कारणे ह्यावर एक मोठी series च लिहिता येईल.. :) US मधली हि Second inning किती दिवस चालेल माहित नाही.. कारण प्रोजेक्ट आधिच बरच फाटलेलं आहे.. मी अजून काही वाईट करू शकत नाही ते एक बरय पण तरीही.. एकूण हे नविन शहर, इथली घरं, ऑफिस, आजूबाजूचा परिसर हे मात्र एक्दम मस्त आहे... पण मी इथे सगळ्य़ात मिस करतोय ते आमचा stl मधला ग्रुप.. मला अजूनही पचनीच नाही पडते की आपण आता इथेच रहणार आहोत.. मधेच अचानक वाटतं की उद्या flight पकडून stl ला परत जायचय...आणि त्यातच येताना एअर्पोर्ट वर माझं flight आलं त्याच्या शेजारीच stl ला जाणारं flight होतं.. त्यामुळे इथे आल्याआल्या homesickness यायच्या आधी stl sickness जास्त जाणवतोय... !! काल बसल्या बसल्या मराठी ब्लॉगविश्वातले बरेच पोस्ट वाचून काढले... मधल्या काळात मी बरच काही मिसलय की... (आणि माझ्या ब्लॉग चं नाव देखिल अजून दोघांनी ढापलय... ;) पण आता मात्र इथे regularly चक्कर मारायचं ठरवलयं... बघूया ही us मधली Second inning आणि ब्लॉग अपडेट करायचा उत्साहं किती दिवस टिकतोय ते... :) |
posted by Parag @ 5:44 PM  |
|
|
|
| Monday, February 04, 2008 |
| हे असचं चालायचं... |
हे पोस्ट असचं.. उगीच.. खर्या अर्थानी "लोकाग्रहास्तव" :D इथे परत आल्यापासून वाचन वाढल्याने ब्लॉग अपडेट करणं कमीच झालय... काही वेळा लिहायचं असतं पण राहून जातं.. काही वेळा आळस नडतो.. तर काही वेळा उगीच टाळाटाळ होते.. पण आज सकाळ पासून जरा जास्तच जणांनी ब्लॉग बद्दल विचारल्यावर मात्र आज लिहून बघायचच असं ठरवलं होतं.. बघू या हा tempo किती दिवस राहातोय ते...
गेले अनेक दिवस चालत आलेल्या पण माझ्या अलिकडेच लक्षात आलेल्या काही गोष्टी.. १. प्रत्येक apprisal cycle मधे माझ्या टिम ला काहीही ratings दिली तरी "तू तुझ्या टिम शी फारच linient वागतोस.." अश्या शब्दातल्या माझ्या बॉस च्या आणि "कितीही काम केलं तरी तू आम्हाला हवी ती ratings कधीच देत नाहिस" अश्या माझ्या टिम च्या म्हणजे दोन्ही कद्डच्या शिव्या मलाच खाव्या लागतात.. आणि तरीही दोघांचही समाधान होईल अशी काहितरी थातूर मातूर उत्तर ही द्यावी लागतात.. २. कुठल्याही खेळाशी related hindi movie मधे अगदी (लगान पासून गोल पर्यंत via चक दे इंडिया..) भारतीय वंशाच्या खेळाडूंसाठी तो फक्त सामना नसून "जीने मरने का" किंवा "सर उपर उठाके चलने" का वगैरे सवाल असतो.. भारतीय लोकं एखादा खेळं हा खेळं म्हणूनच का नाही खेळू शकतं? ३. एखादा पाकिस्तानी खेळाडू इतर कोणत्याही देशाविरुद्ध चांगला खेळत नसला तरी भारताविरूद्ध मात्र खोर्य़ाने runs किंवा wickets काढतो.. e.g. अकिब जावेद (आठवतोय का हा?), सलिम मलिक किंवा आत्ताचे सलमान बट, मिसबाह इ.. ४. पूर्ण कपड्यांमधे बिपाशा बसू कितीही चांगली दिसत असली तरी एकदा तरी तिला कमी कपडे घालायला लावल्याशिवाय कुठचिही movie पूर्ण होऊ शकत नाही.. ! (आठवा.. गोल मधला तो पिवळा ड्रेस..) ५. कुठच्यही प्रकारच्या लाईन मधे उभं असताना म्हणजे रेल्वे रीझर्वेशन असो किंवा अगदी कॅंटिन मधली कुपन घ्यायची लाईन असो..आपण उभं असतो ती सोडून दुसरी लाईन भराभर पुढे सरकते.. ६. मला जेव्हा फारच बोर झालेलं असतं तेव्हा messenger वर कोणिच online भेटत नाही आणि जेव्हा मी call वर किंवा desk वर कोणाशी बोलत असतो तेव्हा कधिही न उगावणारे लोक पण धुमकेतू सारखे अचानक येऊन मला ping करून शिव्या घालून जातात पण.. आणि वर इतर सर्व माध्यमातून "तू हल्ली reply पण करत नाहिस" वगैरे वगैरे शिव्या पुढचे अनेक दिवस घालत बसतात.. ७. मला जेव्हा वेळेवर घरी जायला निघायचं असतं तेव्हा बॉस ला निघायच्या आधी १५ मिनीट काहीतरी अति महत्त्वाचं काम सुचतं आणि ते करण्यात माझी बस हमखास चूकते.. ! ८. जेव्हा मला खूप काम असतं तेव्हा एका वेळी चार चार जणं कॉफी ला जायचं का म्हणून विचारतात आणि नाही तेव्हा त्या चारही जणांना कामं असतात.. ९. कॉल चालू असताना, मिटींग मधे, session मधे, बस मधे मला एखादा लई भारी topic सुचून ह्या वर खूप सही पोस्ट होईल असं वाटून जातं आणि प्रत्यक्षात घरी येऊन लिहायला बसल्यावर काहीच सुचत नाही.. आणि नंतर मग उगिच ह्या सारखं एखादं टुकार पोस्ट टाकलं जातं... :) |
posted by Parag @ 12:28 PM  |
|
|
|
| Sunday, December 16, 2007 |
| एक तास शाळेतला... |
मी आणि शाळेत..?? हो, म्हण्जे त्याचा जरा किस्साच झाला.. परवा सकाळी सकाळी पेपर मधे बालकुमार चित्रकला स्पर्धेबद्द्ल वाचल आणि (ऑफिस मधला proactiveness घरी दाखवत) निरजला (भावाच्या मुलाला) विचारलं की तू घेणार का भाग ह्या स्पर्धेत.. एरवी फारसा उत्साह न दाखवणारा निरज अचानक हो म्हणाला..आणि माझी अवस्था अगदी "आ बैल.. " का काय म्हणतात ना तशी झाली... कारण मग त्या स्पर्धेची माहिती काढणे, निरज ला तिथे घेऊन जाणे हे सगळं ओघाने आलच.. स्पर्धेची सगळी माहिती काढून झाली आणि जवळात जवळ सेंटर वगैरे शोधून पण झालं... फक्त प्रोब्लेम हाच होता की वेळ रविवार पहाटे ९ ची होती.. ! तो आणि मी दोघेही कसेबसे उठून एकदाचे त्या शाळेत पोचलो.. जाऊन बघतो तर तिथे हीSSSSS एव्हडी गर्दी.. ! आणि एकूणच सगळे पालक आणि त्यांची पोरंटोरं अश्या थाटात थंडी चे कपडे घालून आहे होते की कोणाला काल अगदी पूण्यात snow fall होऊन गेलाय की काय असं वाटावं.. पूण्यात थंडी पडते मान्य पण म्हणून एव्हडं..?? असो.. तर थोड्यावेळाने तिथे मुलांना वर्गान सोडायला सुरुवात झाली.. मुलांपेक्षा त्यांच्या आयांनाच जास्त उत्साहं होता.. शेवटी एक कडक चेहेर्याच्या बाई तिथे आल्या आणि त्यांनी सगळया उत्साही आयांना बाहेर काढलं.. त्या बाईंचा चेहेरा इतका कडक होता की त्यांच्या वर्गात मुलं कशी काय बसतात काय माहीत.. त्या पण बिचर्या एकूण फारच वैतागलेल्या होत्या... त्यांनी कोणत्या मुलाला "which standard you are in?" असं विचारलं की ते कार्ट हमखास "पहिलीत आहे.. कोणत्या वर्गात जाऊ ??" असं मराठीत उत्तर द्यायचं आणि त्यांनी मराठीत विचारलं की "first standard" असं उत्तर त्यमूळे त्यांना नक्की कोणत्या भाषेत बोलावं ते कळत नव्हतं आणि त्या अत्यंत (पूणेरी) त्रासिक आवाजात दोन्ही भाषांत प्रश्ण विचारत होत्या.. स्पर्धा चालू झाल्यावर मी बाकी काही काम नसल्याने उगाच एकडे तिकडे हिंडत होतो... आता रविवारी सकाळी मी कोणाला फोन केले असते तरी मलाच शिव्या बसल्या असत्या..त्यामूळे "इकडे तिकडे चोहीकडे" बघत आणि ऐकत मी फिरत होतो.. एकेठिकाणी मगाचच्याच त्या उत्साही आया आपल्या मुलांच्या भवितव्या बद्दल तावातावानी चर्चा करत होत्या.. एका मुलीला यायला थोडा उशिर झाल्याने तिला शेवटचा कागग मिळाला होता आणि त्यावर कोपर्यात डाग होता आणि तो नेमका तिच्या आई ने पाहिला त्यामूळे ती आपल्या मुलीवर फार मोठा अन्याय झाला आहे कारण त्या डागामुळे त्तिचं बक्षिस गेलं तर तिच्या मनावर विपरीत परीणाम होऊन हे जग एका मोठया चित्रकाराला मुकेल अश्या आशयाचे dialogue तावातावाने इतरांना ऐकवत होती.. ! नंतर त्यांची चर्चा अचानक मुलांचं करियर प्लॅनिंग ह्या विषयावर घसरली.. अजून एका मातेची तिच्या मुलाने IT त career करावं अशी ठाम इच्छा होती आणि त्या द्रुष्टीने त्याच्या analytical abilities सुधाराव्या म्हणून ती त्याला कोणत्या तरी क्लास ला घालणार होती.. मला अगदी जाऊन सांगावसं वाटत होतं की "अहो काकू (!), IT त काम करणार्य़ांना देखिल आपण एखाद्या analysis मधे आपण नक्की काय आणि का करतोय हे कळत नाही.. आणि तुम्ही उगाच त्या लहान मुलाचा कुठल्या तरी क्लास ला घालून छळ का करता??" आता एश्या odd वयाच्या व्यक्तिंना नक्की काय संबोधाव हे मला एक कळतं नाही.. म्हणजे त्यांना टिपिलक मराठी प्रथे प्रमाणॆ काका काकू पण म्हणता येत नाही.. आणि नावाने पण हाक मारता येत नाही.. ! असो.. दुसर्या एका ग्रुप मधे ह्या शाळेत extra curricular activities फारच कमी आहेत त्यामूळे मुलांची personality development होत नाही ह्यावर नापसंती व्यक्त केली जात होती.. तर त्याउलट कुठे बास झाल्या ह्यांच्या activites जरा अभ्यास घा आता.. enaglish, maths नीट आल्या शिवाय आयुष्यत काही राम नाही अशीही मतं व्यक्त होतं होती.. तिथे आलेले बाबा पालक मात्र शांत होते... एकतर बरेच जण रविवार सकाळ ची झोप मोडल्याने वैतागलेले होते.. आणि ते कंपू करून गप्पा मारत नव्हते.. कुठे कोपर्यात उभं राहून मोबाईल वर बोलत किंवा पेपर वाचत होते.. इतक्यात स्पर्धा संपल्याची घंटा वाजली आणि परत त्या कडक चेहेर्याच्या बाई बाहेर आल्या.. "आम्ही सगळ्य़ा मुलांना ओळखत नाही त्यामूळे एकेक मुलगा पुढे आला की पालकांनी पुढे येऊन त्याला घेऊन जा.." असं खरमरीत आवाजात aanounce केलं आणि तिथे ओळख परेड चा कार्येक्रम सुरू झाला.... निरज दिसल्यावर मी पुढे जाऊन सांगितल्यावर त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळून "बघून तर वाटत नाही मुलगा बिलगा असेल ह्याला.." अश्या टाईप expression दिले... तितक्यात निरज नी मला "काकाSSS" म्हणून जोरात हाक मारल्यावर त्या बाईंना जरा हायसं वाटलं.. आणि त्यांनी निरज ला सोडलं.. बाहेर आल्या आल्या निरज मला म्हणतो.. "फिश मार्केट मधे काय असतं?? मला फिश मार्केट बघायला जायचय.." आम्ही जरी nonveg अगदी आवडीने खात असलो तरी ते बाहेर त्यामूळे एकारांत कुलोत्पन्नाने अचानक फिश मार्केट मधे जायची इच्छा व्यक्त केल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं.. मी त्याला विचारलं अचानक हे कुठून आठवलं तुला तर तो म्हणतो.. "आतल्या टिचर म्हणत होत्या केव्हडी गर्दी झाली स्पर्धेला शाळेचं अगदी फिश मार्केट करून टाकलय ह्या मुलांनी.. म्हणून मला फिश मार्केट पहायचय.. " हे ऐकून माझी हसून वाट लागली.. एकूण काय शाळेतला एक तास मात्र एकदम मस्त.. !!!!! |
posted by Parag @ 8:32 AM  |
|
|
|
| Thursday, November 08, 2007 |
| Happy Diwali.....!! |
आज Diwali चा पहिला दिवस.. :) एकदम मस्त festive आणि उत्साही वातावरण आहे.. त्याच आनंदात आणि उत्साहात इथे येऊन उगाच काहिबाही खरडावासं वाटलं.. तसं ही गेल्या महिन्यात इथे यायची तारीख ठरल्यापासून इतक्या happening गोष्टी घडल्या पण काही लिहायला जमलच नाही.. एकतर मला जे काही लिहावासं वाटायचं ते मी लिहायला बसेपर्यंत विसरून जायचो नाहितर मग wind up ची कामं असायची.. तर आधी STL मधल्या शेवटच्या दिवसांबद्द्ल.. आमच्या ग्रुप मधल्या तिघांचं परत यायची साधारण आसपासची तारीख ठरली आणि अचानक आमचे जोरदार लाड चालू झाले.. माझे roomies अगदी "जाऊ दे आता काय जाणारच आहे.." ह्या सबबी खाली माझी दादागिरी अगदी पूर्ण सहन करू लागले.. :) रितीप्रमाणे आमची जोरदार farewell party, gifts देणे , आमची भाषणे , मग घरी येऊन ice cream आणि दारू पार्टी हे सगळं देखिल पार पडलं.. आधी मी परत चाललोय हे कोणाच्या पचनीच पडत नव्हतं आणि "हा काय येईल आत्ता परत" किंवा मग "gift द्यायच्या आधी, पुढचे ६ महिने तरी परत येणार नाही अश्या करारावर सही घ्या" वगैरे सर्व comment मारून झाल्या.. ही farewell party झाल्यावरही अनेक जणांकडे individually lunch किंवा dinner ची पण invitations आली होती..थोड्क्यात अगदी केळवणं झाली तिथे.. :D शिवाय आमच्या relacements नी मिळून, जे की नीट settle पण झाले नव्हते त्यांनी पण एका संध्याकाळी स्नॅक्स ला बोलावलं होतं.. :) माझा replacement आल्यानंतर तर मी ऑफिस मधे पण विषेश काम करत नसे.. transition च्या नावाखाली तोच बिचारा सगळं करत असे.. Meanwhile मी तो वेळ आमच्या travel desk शी झगडून singapore airline चं मला हवं ते, हवं तेव्हा पोचणारं अश्या अनेक "अखूड शिंगी बहू दुधी..." वगैरे requirements असलेलं flight booking मिळवण्यात सत्कारणी लावला.. ! शेवटी तर इतकं झालं होतं की माझ्या त्या replacement ला वाटायला लागलं की मी singapore airlines च्या website tesing project वर वगैरे काम करतोय का काय.. :D But SQ simply rocks.. !! अशक्य सही arlines आहे.. आणि शिवाय ३२ किलो bag allowance.. ! आधी आधी मला स्वत:लाच वाटत नव्हत की मी परत चाल्लोय.. पण मग जशी जायची तारीख जवळ आली तस मात्र feel यायला लागलं.. तेव्हा खूप वाटून गेलं की हे सगळं खूSSSSSप miss करणार आहे.. बदल प्रत्येकाला हवा असतो पण existing set up मात्र बदलायचा नसतो.. त्यात माझ्या rommies नी मी जायच्या आदल्या दिवशी surprize pizza party आणि advanced b'day celebration घरी केलं होतं.. आयुष्यातला सगळ्यात दण्क्यात साजरा झालेला वाढदिवस हाच असावा... STL मधे २ केक्स, इथल्या ऑफिस मधे २ आणि शिवाय घरी २.. आणि balloons, cards ओव्हरऑल खूप धमाल.. काहीही विशेष कर्तुत्त्व न करता एव्हडं कौतूक आणि importance मिळणं मी मात्र खूप enjoy केलं.. :) भारतात येऊन पण घरी, ऑफिस मधे लाड चालूच आहेत.. घरी एकदम साग्रसंगीत फराळ, शिवाय रोज b'fast, घरचा डबा, ऑफिस मधून आल्यावर स्वत:च्या जेवणाची सोय स्वत: करा असे काही प्रकार नसतात.. ! ऑफिस मधे पण टिम माझ्या पेक्षा junior त्यामूळे ते उगाच माझ्याशी फार अदबिने वगैरे बोलतात.. :D seniors ना पण मी आल्याआल्या काम करीन असं फार expect नाहिये.. ;) त्यामुळे त्तिथे ही तसे लाडच म्हणायचे.. दिवाळी चा माहोल तर एकदम मस्त आहे.. घरी फराळाचे डबे भरलेले आहेत, कालच दिवाळी अंक आलेत, फटाक्यांचा आवाज आणि धुराचा वास, कंदिल, पणत्यांचा उजेड, निरज निशांत साठी बनवलेला किल्ला, बाहेर काढलेली रांगोळी, सगळी कडे एकदम चकचकाट.. नाहिये ती फक्त थंडी.. दरवेळी दिवाळी ला पुण्यात असणारी "गुलाबी" थंडी ह्यावेळी आलेल्या अवेळी पावसाने गायब केली बहूतेक.. तर एकूण I am enjoying the celebrations and festivals.. !!!
Wish you all a vey happy Diwali.. May the warmth and splendor, that are a part of this auspicious occasion, fill your life with happiness and bright cheer, and bring to you joy, prosperity and peace, for the whole year… |
posted by Parag @ 1:30 AM  |
|
|
|
| Saturday, November 03, 2007 |
| इस्ट या वेस्ट... |
To be or nor to be चा प्रश्ण थोड्य दिवसांपूरता मिटवून किंवा may be तात्पुरता पुढे ढकलून अखेर भारतात आगमन झाले.. ! बाकी अनेSSSक गोष्टी बदलल्या असल्या तरी मुंबई एअरपोर्ट वरचा पसारा, custom ची खाबू गिरी हे मात्र सगळं तसच आहे.. ! पोचल्या पोचल्या घरी बासुंदी पूरी चं मस्त जेवण झालं.. जेटलॅग आणि बासुंदी मधलं जायफळ हे combination १६ तासांच्या "छोट्या" झोपेसाठी एकदम perfect झालं... कोथरूड चा हुलिया एक्दम बदललाय... कुठे कुठे नविन नविन रस्ते झालेत.. ते पण इतके मोठे की आधिचे रस्ते एकदम लहान लहान गल्ल्या झाल्यात.. प्रचंड बांधकामामूळे "जिकडे तिकडे मातीच माती" अवस्था झालीये... ट्रॅफिक अजून पण तसाच आहे.. in fact खूप जास्त वाढलाय.. ! मी आपलं उगिच yeild करायच्या नादात एका टर्न वर ५/१० मिनिट थांबून राहिलो.. :) बाहेरचं कशाला आमच्या घरात पण geographical changes झालेत.. आधिच्या खिडक्या गायब, कुठे कुठे नविन खिडक्या, नविन नविन कपाटं, कंपाऊंड वॉलची वाढलेली उंची, जून्या जाऊन नविन आलेल्या २ wheeler आणि असच काही बाही.. निरज निशांत उंच झालेत.. निरज तर एकदम big boy झालाय.. निशू अजून बाळच आहे.. :) काही काही नातेवाईक, आजी ह्यांच्या दिसण्यात वाढलेल्या वयामूळे नक्कीच नको वाटणार बदल झालाय.. म्हणजे इथून जायच्या अधिची किंवा एकूणच मनात जी इमेज असते त्यापेक्षा समोर वेगळं दिसलं की ते आवडत नाही.. तसं काहिसं झालय.. ऑफिस तर फारच जास्त बदललय.. एकही ओळखिचा चेहेरा नाही.. सगळी कडे कॉलेज सारख वातावरण.. अवाढव्य बिल्डींगज.. अजूनही मला ऑफिस ची Geography झेपत नाही.. कॅंटीन मधे लोकं ४० रुपयांची बाटली घेऊन Gatorade पितात..! आणि चहा कॉफी सारख्या गोष्टी पण ८ रुपयांना मिळतात.. तिथले queues, courtesy वगैरे इथे अजिबातच दिसत नाही... त्यामूळे आपण ते पाळत बसलो तर लिफ्ट २ वेळा येऊन गेली तरी मला त्यात शिरता येत नाही.. ऑफिसच्या area त झालेल्या २ नविन सिग्नल मुळे तिथे ट्रॅफिक आणखिनच वाढलाय.. तिथे जवळच २ नविन फूड जॉंईंट्स झालियेत ती एकदम मस्त आहेत... एकूण २ विकएंड मिळून बराच खादाड्पणा करून झाला.. आता घरी हळूहळू फराळाच बनवणं चालू झालय.. कालच कर्वे रोड वर गाडी आणि बाईक दोन्ही चालवून झालं... त्यात बाईक भर नळ स्टॉप च्या सिग्नलला बंद पडली.. त्यानंतर मागून हॉर्न चा जो काय भडिमार झालाय त्याने गेल्या २ वर्षांची कसर भरून निघालिये.. :D आणि गाडी.. गियर बदलायची सवयच गेलीये.. त्यामूळे वळणवर थांबताना तिसर्याच गियर वर असल्याने ३ वेळा गचके खाऊन ती बंद झाली... त्यात परत क्लच ब्रेक चा गोंधळ आणि एकूण सगळा राडा... :D एकूण दिवाळी ची तयारी जोरदार चालू झालिये.. कंदिल, माळांची मोठी मोठी दुकानं, कपडे, इलेकट्रॉकोक्स च्या दुकानांमधे सेल आणि ऑफर्स.. एकदम चकचकाट.. :) फटाक्यांचे स्टॉल दिसले नाही विशेष.. लोकं पर्यावरणाबद्दल फारच जागरूक झालेली दिसतायत.. ! घरातलं वायफाय एकदाच सेट झालं.. इंटरनेट क्षेत्रात पण एकदम क्रांती झाल्यासारख जाणवलं.. मी घरी जे काय करतो इंटरनेट वर त्यासाठी हे ब्रॉड्बॅण्ड एकदम सही आहे... बॅंकांनमधल्या बायका (जरी आधिच्या जाऊन नविन young generation) आल्या असल्या तरी तशाच खडून पणे बोलतात.. त्यांना काय बॅंकेतला जॉब चालू करण्याआधी खडूसपणे बोलण्याचं ट्रेनिंग देतात की काय?? आणि हा अनुभव अगदी ICICI सारख्या बँकेतई तोच... मोबाईल मात्र एकादिवसात चालू झाला.. एकदम प्रॉम्प्ट सर्व्हिस.. :) एकूण काय सध्या एकदम India shining.. ! East ya west India is the best.. वगैरे मी नाही म्हणणार but ofcourse.. it is getting better.. :) |
posted by Parag @ 8:43 AM  |
|
|
|
|
| About Me |
Name: Parag
Home: St Louis, Missouri, United States
About Me:
See my complete profile
|
| Previous Post |
|
| Archives |
|
|
| Links |
|
|
| Powered by |

|
|