"ऑन द लाईन" हे सेरेना विल्यम्सचे आत्मचरित्र नुकतेच वाचले. सगळ्यात
पहिले वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आत्मचरित्र लिहिता येईल एव्हडं जबरदस्त
अनुभवविश्व असल्याबद्दल सेरेनाचा खूप हेवा वाटला. सध्याच्या सगळ्याच तरूण
खेळाडूंनी वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी पासून खेळायला सुरुवात केलेली
असल्याने तिशीच्या आसपासच त्यांचं साधारण वीस वर्षांचं करियर झालेलं असतं !
एक अफ्रिकन - अमेरिकन खेळाडू, घरातील सगळ्यात लहान अपत्य आणि त्यात एका प्रसारमाध्यमांचं विशेष लक्ष असलेल्या खेळाडूची धाकटी बहिण म्हणून आलेले अनुभव सेरेनाने अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहेत. व्हिनसच्या प्रगतीबद्दल, वडिलांनी तसेच प्रसारमाध्यमांनी बालपणात व्हिनसला दिलेल्या अधिक प्रसिध्दीबद्दल वाटलेला हेवा तसेच जरी सख्खी बहीण असली तरी कोर्टवर समोरा-समोर आल्यावर व्हिनस फक्त एक प्रतिस्पर्धी आहे ही असलेली जाणिव सेरेनाने अतिशय स्पष्ट पण संयतपणे मांडली आहे. सेरेनाच्या वडिलांनी दोन जागतीक दर्जाचे टेनिसपटू घडवण्यासाठी घेतलेली मेहेनत तसेच लहान्-सहान गोष्टींबद्दलची त्यांची दुरदृष्टी पाहून खरच थक्क व्हायला होतं. सेरेनेना जिंकलेल्या बर्याचशा स्पर्धा अगदी आत्ताच्या काळातल्या असल्याने त्यातल्या सामन्यांचे वर्णन वाचायला मस्त वाटलं. बर्याचदा सामने डोळ्यासमोर आले. हातातून निसटून चाललेला सामना खेचून आणणे ही सेरेनाची खासियत. अश्या सामन्यांमधे तिने केलेले विचारही वाचायलाही खूप मस्त वाटले. ह्या पुस्तकात २००९ च्या युएस ओपन मधली घटना अर्थातच नाहिये कारण पुस्तकाचे काम त्या सुमाराच पूर्ण झालेले होते. पण त्यावरही सेरेनाने प्रामाणिकपणे आणि कुठलाही आवेश न आणता टिप्पणी केली असती अशी खात्री वाटते.
पुस्तकातला फॅशन आणि ड्रेसेस बद्दलचा भाग आवडला नाही कारण त्यात विशेष रस नव्हता. तसेच काही वैयक्तीक घटना नसत्या तरी चाललं असतं असं वाटलं. पण अर्थात ते आत्मचरित्र असल्याने त्या येणारच.
पण एकूणात जेव्हा स्वत:लाच प्रोत्साहन द्यायची गरज भासेल तेव्हा वाचायला नक्कीच उपयुक्त असे पुस्तक आहे.
या पुस्तकाशिवाय खेळाडूंनी लिहिलेली "ओपन" - आंद्रे अगासी, "आऊट ऑफ द कंफर्ट झोन" - स्टीव्ह वॉ आणि मायकेल फेल्प्सची दोन पुस्तकं वाचायची आहेत.

0 प्रतिसाद:
Post a Comment