इये घराचिये नगरी....

काही बारीक सारीक बदल झालेत.. खूप मोठं असं काहीच नाही.. तसही ८/९ महिन्यात काय बदलणार म्हणा...पण मला आपलं वाटतं होतं की एखादा तरी drastic बदल झालेला असावा आणि मी तिथे असणार्या नविन "मुलांना" एकदम uncle style मधे सांगावं की आमच्या वेळी हा रस्ता असा नव्हता किंवा घराजवळ हे दुकान झाल्याने किती सोईस्कर झालयं.. नाहीतर आम्हाला किती हाल काढावे लागले इ. इ.... :) (तसही तिथे नुकताच आलेला अवंती चा replacement मला आल्यापासून अहो-जाहो करत असल्याने मला अंकल झाल्यासारखच वाटत होतं.. ! असो.. )
दुसर्या इनिंग साठी इथे आल्यापासून मला home sickness सारखाच (की त्यापेक्षा जरा जास्तच??) सेंट लुइस सिकनेस जाणवत होता... त्यामुळे गेल्यावर आमच्या जुन्या ग्रुप मधले ४/५ जणं तरी तिथे असे पर्यंत तिथे जाऊन यायचच असं ठरवलं होतं... तिथल्या प्रत्येकच जागेशी काही ना काही आठवणी जोडलेल्या असल्याने मला तर सगळीच कडे जायचं होतं पण रात्र थोडी आणि सोंगं फार अशी स्थिती व्हायला लागली..
अवंती जायच्या आदल्यादिवशी तिथे पोचायचं होतं खरं म्हणजे तिच्या send off निमित्त सगळे एकत्रच भेटले असते.. आणि शिवाय शेवटच्या दिवशी पॉटलक.. मग त्यानिमित्तानी केलेला रात्रभराचा टाइमपास नंतर steak n shake मधे किंवा deny's मधे जाऊन घातलेला धूडगुस हे सगळं पण करता आलं असतं.. पण शेवटी अवंती ची आणि माझी भेट मात्र अगदी हिंदी पिक्चर स्टाईल मधे फ्लाईट्च्या गेट वर झाली म्हणजे मी c-7 वर land झालो आणि ती c-9 वरून निघणार होती.. फक्त हिंदी पिक्चर सारखी अचाट आणि अतर्क्य धावाधावी करायची वेळ मात्र आली नाही.. :)
दरवेळी प्रमाणे लॅंडिंगच्या वेळी मी आर्च दिसत्ये का ते बघायचा आटॊकाट प्रयत्न केला पण ह्यावेळी काही दिसली नाही ती.. तिथे सध्या आलेल्या पुरामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं होतं.. त्या पुराच्या पाण्यात आर्च वाहून बिह्नन गेली नाही ना असा एक फनी विचार पण मनात येऊन गेला... जवळ जवळ वर्षभर चालू असलेलं aa च्या गेट जवळचं काम अखेर संपलेलं दिसलं त्यामुळे एअर पोर्ट वर एकूणात पसारा कमी वाटत होता.. आणि तसही आज मला ते एअरपोर्ट फारच सुंदर वगैरे वाटत होतं... !
बाहेर आमची जनता थांबलेलीच होती.. विनोद, LP ह्यांच्याबरोबर नेहमी प्रमाणे ओरडाआरडा करून झाला.. I-70 वर नेहमी प्रमाणेच किचाट गर्दी होती.. पण 270 वर आल्यावर मात्र कसं एकदम होमली वाटलं... तुम्ही एखाद्या शहरात आलात की त्यातल्या एखाद्या भागाशी, रस्त्याशी चटकन नातं जोडलं जातं..आणि तो भाग चटकन "आपला" वाटू लागतो... तसच काहीस आमचं I-270 बद्दल झालं होतं.. त्यामुळे मी, चंदना आणि कधी कधी गौतम फारच nostalgic झालो की तिथल्या exits ची नावं आठवत बसायचो... ! आणि तिथे असताना त्या हायवे वरचा एक bridge चंदना ला पुण्यातल्या म्हात्रे पुला सारखा वाटायचा... :D
"अरे वा i-64 चं काम शेवटी सुरू झाल वाट्ट", "इथे speed limit दाखवणारे electronic boards नविन दिसतायत", "Dierberg समोरची सगळी झाडं तोडून काय टाकली??", "वा st anthony ला रंग दिला की.." अश्या माझ्या comments वर गाडीतल्या लोकांच्या reactions हुंकार, दुर्लक्ष, तुच्छ कटाक्ष आणि मग चिडचिड अश्या क्रमाने बदलायला लागल्यावर मात्र मी त्या comments मनातल्या मनातच मारायला लागलो.. :) पण होतं काय आपल्या मनातल्या snap shot शी समोरची गोष्ट जुळ्ली नाही की अशी पटकन ते तोंडातून निघून जाते.. पण शेवटी घराजवळचं टॅकोबेल न दिसल्यावर मात्र मी न रहावून तोंड उघडलंच.. नाही म्ह्टलं तरी आम्ही घराच्या shifting च्या वेळी जगलो होतो त्या टॅकोबेल वर.. !!! पण ते बंद झालं नाही तर रस्त्याच्या दुसर्या बाजुला गेलयं आता...
साउथमूर मधे मात्र विषेश काही फरक झालेला नाही जाणवला... नाही म्हणायला "Now we acceept dogs too !" अशी पाटी लावून घरात कुत्रा पाळणं allow केल्यावर त्या पाळलेल्या कुत्र्यांसाठी bark park नावाचा प्रकार चालू केलाय...पण बाकी सगळ्या गोष्टी अगदी होत्या तश्याच दिसल्या.. कधीकधी एखाद्या ठिकाणच्या लोकांपेक्षा आपली त्या जागेशीच ओळख होऊन जाते.. तस काहीसं आमचं सगळ्यांच stl आणि southmoor बद्द्ल झालयं.. माझ्या जुन्या ग्रुप पैकी कमी जणं शिल्लक असून आणि नवीन आलेल्या कितीतरी लोकांना मी पहिल्यांदाच भेटूनही अजिबात परके पण जाणवलं नाही.. कारण चेहेरे वेगळे असले तरी जागेशी ओळख जूनीच असल्याने असेल कदाचित... !
आमचं घर अजून आहे तसच आहे.. ! काही माणसं बदल्यावर झालेले बदल वगळता विषेश फरक असा नाहीच.. एव्हडच काय पण मी जाताना घेतलेल्या पण वजन जास्त झाल्याने मी तिथेच ठेवून दिलेल्या गोष्टी अजून त्याच जागी आहेत.. !!!! कावरे साहेबांनी नी अगदी "मुझे परिवर्तन पसंद नही" थाटात सगळा कारभार चालवलेल दिसतोय.. :)
आपण कोणाला बर्याच दिवसांनी/ वर्षांनी भेटलो की त्यांच्या वयाप्रामाणे किंवा इतर अनेक कारणांनी त्यांच्या दिसण्यात/वागण्यात फरक पडलेला जाणवतो.. आणि बर्याचदा हा फरक नकोसाच असतो.. जागेचही बहूदा तसच असतं.. मागच्या वेळी पुण्याला गेल्यावर काही ठिकाणी तसच झालेलं... stl किंवा southmoor मधे तसं काही व्ह्यायची शक्यता कमीच होती.. पण दोन्ही ठिकाणांनी माझा अपेक्षाभंग न केल्याने आनंद झाला...
Hindi movies दाखवणारं थिएटरं, तिथे तिकीट चेक करणारे ते देसी दुकानातले काका, तिथल्या फक्त देसी पिक्चरलाच असलेली लाईन, आम्हाला न मिळालेल्या जागा आणि मग शेवटी आम्ही बसलो त्या पायर्या ह्या मधे ही अगदी काही फरक नाही.. त्या थिएटर मधे जिन्यावर न बसता सिट वर बसून आम्ही किती पिक्चर पाहिलेत कोण जाणे.. !
येता जाता YMCA आणि library पण दिसली... ही दोन्ही ठिकाणं आणि वॉलमार्ट अगदी जवळची आणि खास ओळखितली.. YMCA मधली rectopion counter वरची आज्जी शेवटच्या दिवशी अगदी प्रेमानी म्हणाली होती.. परत इथे येशिल तेव्हा stl लाच ये.. !!
I-55, Downtown, आमच्या ऒफिसची बिल्डींग, ऑफिस मधलं breve coffee shop, Hunana chinese rest, Baielies chocolate bar ह्या सगळ्या गोष्टी वेळेअभावी राहूनच गेल्या... पण अर्थात परत तिथे जायला काहीतरी कारण पाहिजे ना... !
आमचे बाहेरचे मित्र म्हणतात तसं stl मधे लोकं बदलली, "पिढ्या" बदलल्या पण तिथे चालणार्या ativities, परंपरा, टाइमपास, फेरवेल्स, गणपती, दिवाळी, mid night birthday celebrations, दारूपार्ट्या, पॉटलक, टेनिस sessions, एकूणच सगळी हौस आणि उत्साह हे मात्र कधीच नाही बदललं...
आता पुढच्या long week end पर्यंत आमच्या जुन्या ग्रुप मधले जवळ जवळ सगळेच तिथून बाहेर पडले असतिल.. मी कधी परत जाईन त्तिथे माहित नाही.. पण माझं US मधलं पहिलं शहरं म्हणून stl माझ्यासाठी नेहमीच घराचिये नगरीच राहिल.. !

4 प्रतिसाद:

Sneha said...

:)
hmm hotaye hotaye... jamalyas majhya blog varachi kavita vach... asach kahitari sangatey... agadi asa nasal tari...

Monsieur K said...

welcome back!!
2nd innings nuktich suru keli aahes, so i guess i havent missed much...
this post made me nostalgic abt tampa, the place where i stayed in the US :)

jau dey...

enjoy ur 2nd innings... aani ho.. fakt US madhe astaanaa ithe update karu nakos.. bhaartaat parat aalyavar dekhil lihit jaa rey :)

स्नेहल said...

:) so u r in total love with St. L;) cool...sahi aahe.

Njoy!!!

Jaswandi said...

तुला सामाजिक कार्य़ाचा खो दिलाय!