P.S. खाली लिहिलेली विनोदी घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून जर कोणा व्यक्ती किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो फक्त योगायोग समजावा.. आणि ह्यात विनोदच नाही असे मत पडल्यास ते आपले वैयक्तिक मत समजावे.. !!
रविवार कसा छान चालला होता...ऑफिस मधला माझा एक खास मित्र आणि त्याची बायको कॅलिफोर्नियाहून माझ्याकडे आले होते.. ते दोघं, मी आणि आमचा अजून एक मित्र बाकीच्या गॅंग ला कलटी देऊन भरपूर भट्कून आलो होतो.. आमच्या इथे चालू झालेल्या नविन देसी रेस्टॉरंट मधे मॅंगो लस्सी आणि मुगाच्या डाळीच्या शिर्यावर आडवा हात मारून झाला होता आणि ते रात्री निघून जवळ्च एका नातेवाईकांकडे drive करून जाणार असल्याने दुपारी घरीच गप्पांचा अड्डा टाकून, संध्याकाळी डाऊनटाऊन मधे चक्कर टाकून यायचा प्लॅन होता... सगळे एकाच कंपनीत काम करत असल्याने गप्पांचा विषय साधारण ऑफिस शी रिलेटेड च होते.. त्यातही बॉसेस ना शिव्या घालणे, कोणाचा बॉस जास्त माठ हे prove करणं असे "जिव्हाळ्याचे" विषय अगदी चविने चघळणं चालू होतं.. त्यात माझा मित्र विवेक mimicry expert असल्याने तमाम दुनियेची acting बघून आमची हसून पुरेवाट झाली होती...
असाच कोणतातरी किस्सा विवेक रंगवून सांगत असताना माझा मोबाईल त्याच्या मंजूळ आवाजात किणकिणला.. आत्ता कोण इतक्या दुपारी दुपारी असा विचार करत मी display बघितला.. "Ajit Joshi Calling...." अशी अक्षरं दाखवत तो मोबाईल जणू दात विचकावून छदमी पणे हसत असल्याचा मला भास झाला... माझ्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं इतक दाट झालं की "चेहेरा जरा सरळ कर नाहितर त्या आठ्यांचा गुंता होईल आणि तो सोडवता पण नाही येणार." अशी खास कोकणस्थी सुचना कम पिजे विवेक च्या बायकोने म्हणजे मनिषा ने केली..!!
तर हा अजित जोशी म्हणजे आमचा एक कॉमन बॉस... स्वत: असतो texas मधे... अगदी "typical boss" category मधला..म्हणजे कोणाला ही पकडून कामाला लावणारा..जे texas मधे आहेत त्यांना तर लावणारचं पण बाकीच्यांना फोन आणि इमेल वर छळणारं...त्याची कोणावार वक्रद्रुष्टी झाली म्हणजे संपलच... अगदी आडनावाला शोभतिल अश्या शैलित शालजोडित ले available असलेल्या सगळ्या माध्यमांमधून म्हणजे emails, phone, messenger आणि शिवाय प्रत्यक्ष तोंडावर आणि ते पण चारचौघात मिळतात.. म्हणजे तुम्हाला "व्यर्थ आपले जिवन" असं सारखं वाटत राहिलं पाहिजे असा त्यामगचा उद्देश... आणि कोणावर कधी कृपाद्रुष्टी होणं ही तर "not applicable" गोष्ट.. आठवडाभर आमच्या माहितीतल्याच एकाला पिळून झालेलं असून देखिल आत रविवारी दुपारी ह्याला माझी "सुपारी" कोणी आणि का दिली असा विचार करतच मी फोन उचलला..
मी ही माझ्या मूळ गावाची दुपारी कोणी फोन केल्यावर त्याला उत्तर द्यायची पध्दत वापरून म्हणजे आवाजात दुपारची झोप मोडल्यावर येणारा त्रासिकपणा शक्य तितका आणून "हॅलो" असं म्हंटलं.. "पराग, अजित बोलतोय.."
"कळलं ते.. आमच्या कडचे मोबाईल caller ID दाखवतात.. आणि तू काय मला पहिल्यांदा नाही पिळतेस..त्यामूळे तुझा नंबर आहे माझ्या कडे.." असं मनातल्या मनात म्हणून प्रत्यक्ष मात्र "ya Ajit Tell me" असं professional उत्तर professional आवाजात दिलं... आता मी जेव्हा ह्याच्याशी मराठीत बोलायला जातो तेव्हा हा मला हिंदित उत्तर देतो मग दोन मराठी माणासांनी एकमेकांशी हिंदित काय बोलायचं असा माझा मराठी बाणा जागा होऊन मी हिंदी पेक्षा english बरी निदान professional .. असा विचार करून त्याला english मधे उत्तर देतो..
पण आज तर हा स्वत:हून मराठीत बोलतोय.. आश्चर्यच आहे..
"पराग जरा काम होतं.."
"आता बिन कामाचा तू मला फोन करायला तू माझा कोण? काका की मामा? लोकं उगाच redundant गोष्टी बोलतात.." हे ही पुन्हा मनातच.. आणि तोंडावर "हां बोल.." !!
"रेखा ची आई येत्ये आज अमेरीकेला आणि त्यांचं फ्लाईट वाया शिकागो आहे.."
आता ही कोण रेखा आणि तिची आई अमेरिकेला येण्याशी तुझा माझा काय संबंध.. "अं.. बरं बरं.." काय बोलावं हे न कळून मी देलेली प्रतिक्रिया..
"म्हणजे माझी सासू रे.. "
....... ह्याची सासू येत्ये???? बरं झालं चांगला सासुरवास केला पाहिजे... बर्याच जाणांचे "दुवांए" मिळतिल त्यांना.. माझा डोळ्यासमोर लगेच हातात जळतं लाकूड घेतलेली ललिता पवार आणि तिच्यासमोर भांडी घासत असलेला हा असं चित्र उभं राहिलं...
"त्यांना त्या एअरपोर्ट वर टर्मिनल बदलायचं आहे.. आणि त्यांना wheel chair मिळाली नाही असा india हुन फोन आला होता... रेखा ला जरा काळजी वाटत्ये जरा तर तू जाऊ शकशिल का जरा please त्यांना दुसर्या टर्मिनल वर सोडायचं आहे फक्त.." घ्या म्हणजे रेखा ला काळजी म्हणून हा फोन..
एकतर कहितरी काम सांगून त्याच्या तोंडून please शब्द ऐकून माझ्या मनात आनंदाची कारंजी बिरंजी उडायला लागली... आणि जावई कसाही असला तरी खुन्नस त्या सासू वर का काढा असा अगदी सभ्य आणि सुसंस्क्रुत घरातल्या मुलासारखा विचार करून मी म्हंटलं "हो जाईन.. matter of 15 mins... shouldn't be a problem.. कधी येणारे फ्लाईट?"
"आत्ता ४ ला.. एअर इंडिया AI 137"
४ ला विमान येणार म्हणजे आम्हाला अर्ध्यातासात निघा... बाहेरच्या ३६ डि च्या चांदण्यात आणि एव्ह्डं खाल्लेलं असताना एअर पोर्ट आणि ते ही ह्याच्या सासूला शोधायला.. अरेरेरे..
"ठिके.. निघतोच आम्ही साधारण अर्ध्यातासात..."
मी फोन ठेऊन बाकिच्या तिघांना हे सांगितल्यावर ते माझ्यावर तुटूनच पडले... "काय गरज होतॊ हो म्हणायची??? उगाच काहिही कामं delegate करायची का? चांगला chance होता बदला घ्यायचा.... bla bla bla..."
शेवटी कसंबसं सगळ्यांना पटवून आम्ही निघालो...
गाडीत बसता बसता लक्षात आलं की आमच्या कडे त्यांचा फ्लाईट नंबर सोडून बाकी काहिच माहिती नाही.. "अरे कमितकमी नाव तरी विचारायचसं..त्या काय पाटी घेऊन उभ्या रहाणार आहेत.. की मी अजितची सासू म्हणून.." मनिषा नी पुन्हा एक कोक्णस्थी dialigue टाकला.. शेवटी मी अजित ला फोन लावला.. आता आपली सासू आज अमेरीकेला येणारे आणि आपला मोबाईल नंबर तिच्याकडे आहे म्हंटल्यावर तो फोन आपल्यापासून कमाल ५ फूटांच्या परिघात ठेवावा एव्हडं तरी त्यांच्या लक्षात येत असावा असं आम्हाला वाटलं होतं.. पण नाही.. शेवटी पंघरा मिनिटं वाजवल्यानंतर तो फोन एकदाचा उचलला..
"तुम्ही try होतात का.. तो फोन आत राहिला आणि आम्ही बाहेर च्या खोलित होतो.. ही ही ही.. "
"नाव काय त्यांचं?" मी घाईघाईत विचारलं..
"मी जोशी.. आणि माझी बायको कुलकर्णी त्यामुळे तिची आई पण कुलकर्णी.. ही ही ही.. वसुमती कुलकर्णी.. "
मी पण उगाच ही ही ही..
"आम्ही ओळ्खणारं कसं त्यांना?"
"साधार्ण ६५ वर्षांच्या आहेत.. चालायला जरा त्रास होतो..."
मागून विवेक ची comment "उनकी त्वच्या से उनके उमर का पता ही नही चला तो??" आणि लगेच मनिष्याची ही comment "आता काय air port वर साठ सत्तरी च्या प्रत्येक देसी बाई ला चालून दाखवायला सांगणार का? त्रास होतोय का नाही ते बघायला?" एकूण ह्या सगळ्या प्रकाराला मनिषा फारच वैतागली होती...
विवेक नको तिथे नको ते dialouges मारण्यात एक्दम expert.. त्यामूळे गाडी चालवताना मी मनिषाला माझ्या शेजारी speaker फोन धरून बसवलं होतं... नाहीतर ह्याच्या comments अजित ला ऐकू जायच्या.. ह्यातली एक जरी comment पलिकडे पोचली असती तरी आमची काही खैर नव्हती..
"दिसतात कश्या साधारण??"
"अगदी रेखा सारख्या दिसतात.. पण साधारण २५ वर्षांनी मोठ्या.. ही ही ही..."
आता आम्ही रेखा ला कुठे बघितलेलं होतं त्यावरून तिच्या आईला ओळखणार... पण इकडे रेखाचं नाव ऐकताच विवेकचे डोळे चमकले..." वा !!! रेखा सारख्या.. २५ वर्षांनी मोठी रेखा.. बाकी काही बदललं तरी ओठांचा चंबू मात्र तसाच राहील.."
लगेच मनिषा ची reaction "अरे मठठा.. तो... bollywood रेखा नाही.. तो त्याच्या बायको बद्दल बोलतोय.."
आज जाणु शिकागो मधल्या समस्त गाड्या बाहेर आल्या होत्या आणि प्रचंड ट्रॅफीक झाला होता...
"साडी किंवा केसांचा चा रंग वगैर माहित आहे का? " मी trafic jam मधे गाडी "हाकत" जो काय सुचेल तो प्रश्ण विचारला..
"अगंSSSS आईंच्या साडी चा रंग माहित आहे का ??" हे मागचं बोलणं.. "कहितरीच..!!! आता भारतातून आई ने निघताना कोणती साडी नेसली हे मला इथे बसून कळणारं... पण हां सकाळी वाहिनी म्हणत होती खरं की तिला मागच्या दिवाळीत मी घेतलेली साडी नेसलिये म्हणून.. कोणता होता हो रंग त्य साडीचा?? बहूतेक निळा होता..."
"आता ते मला कसं माहित असणार?"
"अहो असं काय करता आपणच नव्हतो का गेलो लक्ष्मी रोड ला आणायला...मागच्या सुट्टित..."
"हां हां...ती होय ती लाल होती... " " नाही हो... लाल तुमच्या आई ला घेतली होती.."
"अरे पराग... ही म्हणत्ये निळी साडी.. पण मला वाटतय लाल.. तर बघा साधारण तशाच रंगाची.."
एकडे मी.. "निळी किंवा लाल..??? :। " आणि मागून विवेक.. "अगदी chemistry च्या लॅब मधे लिटमस टेस्ट केल्यासारखं वाटटतयं.. " आणि मागुन त्याच्या पाठित धपाटा मारल्याचा आवाज...
ह्या सगळ्या गडबडीत आम्ही एकदाचे एअर पोर्ट वर पोचलो... तिथे जाऊन बघतो तर ह्या वर्णनाशी जुळ्णारी एकही व्यक्ती तिथे दिसेना... दरम्यान आमच्या इतका वेळ शांत बसलेल्या चौथ्या मित्राने म्हणजे निल ने एक genuin doubt विचारला... "जर त्या भेटल्या तर त्यांना हाक काय मारणारं?? अहो अजित च्या सासू ??? "
मग आज्जी, माई, काकू, मावशी, अहो वसुमती असे अनेक पर्याय शोधून शेवटी typical मध्यम वर्गिय "काकू" final झालं.. ह्या सगळ्या गोंधळात आमच्यातल्या दोघांनी दुसर्या टर्मिनल ला जाऊन त्या तिथे आहेत का हे बघावं असं ठरलं आणि मनिषा आणि निल तिकडे गेले..
मी आणि विवेक नी परत अजित ला फोन केला.. "त्या आम्हाला भेटल्या नाही अजून.. त्या नक्की बसल्या ना विमानात?"
"म्हणजे काय? एव्हडा लांबचा प्रवास उभा राहून करणार का? बसल्या असतिलच की.. ही ही ही..." अरे आवरा ह्याला कोणितरी...इथे आम्ही त्याच्या सासूला शोधतोय आणि ह्याला PJ कसले सुचतायत...पण आम्ही सगळं मनातच बोलणार... !!! आता माझ्याही सहनशक्तिचा अंत होत आला होता.. पूढे काही बोलणार तितक्यात मनिषा चा फोन आला की त्या तिकडे भेटल्या.. मग आम्ही ही तिकडे गेलो.. बघितलं तर त्याच्या साडीचा रंग हिरवा होता...!!!! आणि त्यांनी मोठा काळा woolen चा overcoat घातला होता... ! इतका वेळ झालेल्या सगळ्या गोंधळामूळे आवाजात येणारा नैसर्गिक तुसडेपणा तसाच ठेऊन मनिषा एकदम बरसली.. "अहो काकू बाहेर ४० डिगरी आहे.. आणि तुम्ही woolen कोट कसला घातलाय????" "त्याचं काय झालं ना... खाऊने माझं सामान इतक भरलं की हा कोट ठेवायला जागाच उरली नाही... मग हा कोट घालूनच आले.. नाहीतरी अमेरीकेत थंडी असतेच म्हणतात.. आणि विमानात चांगलीच थंडी होती हो.. त्यामूळे फायदाच झाला कोट चा..."
आम्हाला ही ही ही करायची आता इतकी सवय झाली होती त्यामूळे आम्ही ह्यावर पण ही ही ही .. "आमच्या जावयांनी बराच खाऊ मागावला हो तिकडून... इथे भारतातून कोणी नातेवाईक आले की सगळ्यांना द्यावा लागतो ना म्हणे खाऊ दर वेळी? सांगत होते ते मला"
"अहो साधी लिमलेट ची गोळी जरी दिली ना त्यांनी आम्हाला तरी खूप झालं.. भारतातून आणलेली मिठाई कसले देतायत.." विवेक नी नको तिथे तो dialogue मारलाच..पण सुदैवानं तो काकूंपासून लांब असल्याने त्यांना ऐकू गेलं नाही..
"सगळा खाऊ नेमका check in bag मधे गेला.. नाहीतर दिला असता तुम्हाला...पण माझ्या पर्स मधे श्रिखंडाच्या गोळ्या आहेत.. त्या देते हव्या असतिल तर..."
मनिषा चवताळून काही बोलाणार त्याआधी आम्ही सारवासारवी केली.. " असू दे असू दे.. आम्ही आत्ताच जेवून आलो.. आम्ही तुम्हाला त्या टर्मिनल वर शोधत होतो.. पण तुम्ही आधिच इथे आला होतात.."
"मी आपलं विचारत विचारत आले.. उगाच तुम्हाला त्रास.. आमच्या जावयांचं असंच आहे.. उगाच tension घ्यायचं आणि लोकांना पळवायचं..."
त्यांच्या ह्या एका वाक्याने आम्हाला अत्यानंद झाला.. एव्हडा वेळ आलेल वैताग कुठल्या कुठे पळून गेला आणि "हो हो आम्हाला ही अगदी असंच वाटतं.." असं म्हणून आम्ही त्यांचाशी गप्पा मारू लागलो... :)
शेवटी त्यांना पुढच्या विमानात बसवून दिलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.....
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
12 प्रतिसाद:
hehehehehe jabari aahe.
kharach kalpanik aahe? ;-)
mast lihila aahes :)
mitranmadhale dialogues best!!!
Sahi ahe ekdum...mitranchya dialogue mule mala majha group athavla...asach PJ marun saglyanna sadvaycho amhi :)
hehehe..
tuza boss blog nahi vachat vatte?
nways chance milala ki tu pan mast thevun de ek don boss la..:)
chakali
http://chakali.blogspot.com
;) mast ahe
hehehe!!
chhanch ahe..
धन्यवाद पूनम, स्नेहल, आनंद, पराग, तेजस्विनी !
वैदेही, ते काल्पनिक आहे.. लोकांना खरं का वाटतं कोण जाणे.. :)
डिजे, join करेन हा अड्डा...
:) majja aali ho vahataana...
pan ajunahi shankach aahe ki hi goshta kalpanik nasavi... ;)
काय रे。。 काल्पनीक वाटत नाही आहे。 ;)
त्या boss ला दे वाचायला सांग काल्पनीक आहे न त्याची प्रतिक्रीया घे नक्की。
n then even u can go हा हा हा 。。。
ajibaat kaalpanik waaTat naahee Parag -- good job :)
(www.atakmatak.blogspot.com)
ek number .. pan kalpanik watat nahiye
Post a Comment