विस्कळित...

बरेच दिवस झाले ब्लॉग अपडेट करून... काहितरी लिहायचं होतं पण नक्की काय ते सुचत नव्हतं... काही पोस्ट थोडे लिहून नंतर उडवून टाकले.. तर काही लिहायला चालू केल्यावर मला स्वत:लाच कंटाळवाणे वाटले.. इतरांच्या ब्लॉग्ज वर नजर टाकल्यावर लक्षात आलं की बर्याच जणांची अशीच अवस्था आहे.. प्रत्येकाने आपापल्या style मधे असंच काहीसं व्यक्त केलं आहे.. मग ते अंधाराचे कवडसे सारखं hifi साहित्यिक पदधतिचं असो किंवा मग अबतक छप्पन सारखं काही हलकं फुलक असो... अगदी Tulip च्या style मधे विचारायचं झालं तर.. लिहायचं कशावर?
ontime आणि zero defect झालेल्या महत्वाच्या release वर की काही चूक नसताना आपल्या team वर शेकलेल्या एखाद्या फालतू issue वर?
गेले २ महिने चाललेल्या "to be or not to be" च्या घोळावर की ह्यावर्षी तरी US open ला जाता येणार ह्या आनंदावर.. ?
थंडी संपून उन्हाळा चालू झाल्याच्या आनंदावर की ह्या वर्षीचा उन्हाळाही आंब्याशिवाय गेला ह्या हूरहूरी वर..?
Project कसं smooth चाललयं ह्या बद्दलच्या समाधानावर की सगळी challenges संपून गेली की काय असं वाटून येणार्या वैतागाबद्दल... ?
रश्मी ने अचानक केलेल्या लई भारी मसाला डोश्यांबद्द्ल की मिता ने अगदी आगोदर पासून invitation देऊन खाऊ घातलेल्या tasty पावभाजी बद्दल.. ?

आणि माझ्या limited आणि अगदी छोट्या अश्या विश्वात रोज घडणार तरी काय?
एखादं escalation एखादं appreciation... एखादी movie.. एखादी पार्टी...कधी सगळ्यांनी एकत्र बसून केलेला जबरी timepass तर कधी नको असलेल्या लोकांनी उगिच टपकून डोक्याला दिलेला शॉट..कधी एखाद्या senior नी दाखवलेला समंजसपणा तर कधी त्याच senior नी केलेला माठपणा आणि आपण senior आहोत हे दाखवून देण्यासाठी केलेला अट्टाहास.. कधी घरी फोन करुन झालेल्या मस्त गप्पा..निरज निशांत नी फोन वर केलेला दंगा तर कधी आईने उगाच सांगितलेले कोणत्यातरी नातेवाईकांचे आचरट किस्से...
कधी दुसर्यादिवशी लवकर उठायचय हे माहित असूनही अजिबात न येणारी झोप.. तर कधी शुक्रवारी रात्री देखिल अजिबात उघडे न रहाणारे डोळे...
एकूण काय तर विचारंचा गुंता आणि सगळच विस्कळित..
अगदी काहीच नाही असं नाही..काही typical blog लिहिण्यासारख्या घटना घडल्या होत्या.. मला ब्लॉग लिहायला लागून एक वर्ष झालं कदाचित त्यावर एखादा छान छोटासा पोस्ट लिहिता आला असता किंवा मग मला st louis मधे येऊन २ वर्ष झाली त्याबद्द्ल ही काही लिहिता आलं असतं... किंवा मग मधेच अचानक मारलेल्या शिकागो वारी बद्द्ल आणि summer च्या उन्हात चकाकणार्या शिकागो downtown बद्द्ल नाहिच तर मग मला मधेच आलेल्या "anti socialism" च्या attack बद्द्ल... (ज्यावरून मी lunch table वर लोकांना बर्यापैकी bore केलं..:) नाहितर मग मी पहिल्यांदाच केलेल्या chocolate dipped strawberies आणि butter chicken बद्दल..
किंवा मग उत्साहाचे भांडार घेऊन दाखल झालेल्या उन्हाळ्या बद्दल आणि आम्ही केलेल्या अनेक पॉटलक पार्टिज बद्दल...
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या GREAT फ्लोरीडा ट्रिप बद्द्ल..
एकून काय वैयक्तिक किंवा आत्ममग्न, मी आणि माझं जग ह्यात अडकणारे किंवा सामजिक भान नसलेले जरी असले तरी बरेच विषय आहेत की लिहायला... फक्त हा विस्कळितपणा जाऊन विचार आणि key board कधी "वाहायला" लागलो ते बघायचंय... :)

6 प्रतिसाद:

पूनम छत्रे said...

hmm. i can relate to this phase. mala tar roj sakali kahitari navin suchata lihayala, pan keyboard sarasawala ki achanak sagala faltu vatayala lagata :)
of course this will pass. tuzhya ajibatach happening nasalelya chotya ayushyat kay happen hotay te lavakarach lihi :)

Monsieur K said...

yea - when u start blogging, there is a lot of initial enthusiasm. then s'where, life seems to have become routine. u start feeling - what shud i write, n why shud i write it...
its similar to clicking photos. when i first bought a digicam, i was busy in taking snaps n posting them online - and in some cases, i was amazed to see the snaps - hadnt actually admired the place when i was there.
so, recently, i have stopped taking pics (as far as possible) :D

hopefully, this doesnt carry forward to blogging ;-)

keep writing, whenever u have the enthu!

~ketan

Anonymous said...

"Viskalit"...motive achieved...pan ata "Miami" var masta blog lihi :)

Tulip said...

kahich nahi suchal tar aligator recipees lihi pahu tujhya:))

viskaLit mhanata mhanata mast lhilayas hech post ulaT tu :D

Abhijit Bathe said...

कीबोर्ड वहायला लागणे - हा एक अल्टिमेट वाक्प्रचार आहे!

तो वहाणं महत्वाचं - त्यातुन मग बाहेर काय पडतं याने लिहिणाऱ्याला फरक पडत नाही. पडु नये. आत्मसंतोषासाठी लिहितोयस - चांगली गोष्ट आहे. कारण त्याशिवाय इतर कशासाठी लिहिणे म्हणजे मुर्खपणा.

तुला खरं सांगु का - तु इथे लिहिलेले अनुभव - पॉटलक वगैरे, किंवा इतर गोष्टी - हे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांवर प्रत्येक जणच अनुभवत असतो. आता तेच तु लिहिलेस - म्हणजे इथे गेलो, हे पाह्यलं. इथे गेलो, हे खाल्लं. इथे गेलो, हा पिक्चर पाह्यला, आवडला, त्याची स्टोरी अशी - तर मला, आणि कदाचित सगळ्यांनाच - त्यात काही इंटरेस्ट नाही. कारण ते सगळेच जण करतात. तुला काय वाटलं - हे कळुन घेण्यात मला इंटरेस्ट. ते नेहमीच पटेल असं नाही, पण ते महत्वाचं. तु ’दिल चाहता है’ पाहिला म्हणालास - त्याची स्टोरी सांगितलीस, तो मोजला, मापलास, आणि लिहिलास तर मी (अर्थात हे वैयक्तिक मत आहे) विचार करिन कि - ते वाचायचे श्रम घेण्यापेक्षा मी पिक्चरच बघतो ना! (यावरुन आठवलं - मी काहिही नविन वाचताना प्रत्येक पॅरेग्राफ मधलं फक्त पहिलं वाक्य वाचतो. मग ५ पॅरेग्राफच्या लेखामधली ती ५ वाक्य आवडली तर आख्खा लेख, तो आणखीनच आवडला तर परत, आणि फारच आवडला तर मग कमेंट - पण हे विषयांतर झालं).
तर तु ’दिल चाहता है’ बघुन तुला काय वाटलं हे लिहिलंस तर त्यात मला इंटरेस्ट. उदा. आमीरशी लग्न करुन प्रीती झिंटाने चूक केली का? किंवा असंच काहीतरी....
ते पटेल न पटेल - पण मग मी ही खुर्चीत/सोफ्यावर/बागेत सरसावुन बसेल - च्यायला या प्राण्याला नक्की म्हणायचय तरी काय? असा विचार करेन. विचार पटला तर - च्यायला - मला पण असंच वाटलं होतं वाटुन मला बरं वाटेल, किंवा - च्यायला - मी असा विचार कसा नाही केला? वाटुन माझी चिडचिड होईल.....

एकुण काय - तुला आवडो नावडो - आता जसा तुझा कीबोर्ड वहायला आणि डोक्यातला गुंता जसा बाहेर पडला - कदाचित पडला नसेल, पण तो ऍटलिस्ट इथपर्यन्त पोचला तरी!
तर असा गुंता मनमोकळेपणे माडणे - हे महत्वाचं.

बाकी तुझं लिखाण चांगलं कि वाईट - हे तुझं तु ठरवायचं.

त्याबद्दल कुणाला काय वाटतं - त्याने फरक काय पडतो?

कुणाच्या ’ठरवुन चांगलं चुंगलं’ पेक्षा तुझा असा ’निर्भेळ आणि उत्स्फुर्त वैताग’ वाचायला (मलातरी) जास्त आवडेल....

Parag said...

पूनम, हो माझ्या छोट्याशा जगात काही घडलं की लिहीन लगेच.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद... :)

केतन, हो खरं आहे.. सुरूवातिचा enthu कमी होतो..पण blog च्या बाबतित तरी अजून टिकलाय.. :) अभिप्रायाबद्दल धन्यवाद... :)

चंदना, लिहीणार मायामी बद्दल नक्की.. :)

ट्युलिप, आभिप्रायाबद्दल धन्यवाद... आपला ही एक ब्लॉग आहे हे लक्षात आहे ना.. ?? :)

अभिजित, माझ्या पोस्ट पेक्षा तुझी comment च जास्त चांगली आहे...!!!!! तुझं म्हणण खरय.. जर एखाद्या गोष्टीच्या नुसत्या तपशिलापेक्षा त्यावरील मत आणि प्रतिक्रिया लिहिल्या तर वाचणार्य़ाला जास्त interest वाटतो.. पण काही पोस्ट्चा उद्देश हा खरच फक्त तपशिल देणं हाच असतो.. e.g. एखाद्या ट्रिप चे details.. जे मी पत्र लिहून, किंवा इमेल वर किंवा फोन वर सगळ्यांना (मित्र, मैत्रिणी, घरचे) कळवू शकत नाही..
पण तू सांगितलेलं १०० % पटलं.. पुढे लिहिताना नक्की लक्षात ठेविन.. आणि असेच प्रतिसाद वेळोवेळी देत रहा.. I think माझ्या ब्लॉग वर तू पहिल्यांदाच अभिप्राय लिहिला आहेस..
पून्हा एकदा धन्यवाद..