ह्या वर्षी हिवाळ्याची सुरुवात जरा जास्तच लवकर झाली... मागची वर्षी thanks giving च्या आधिच्या week end ला पहिल्यांदा jackets,gloves घालायची वेळ आली होती... यंदा मात्र ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यापासूनच winter accessories वापराव्या लागतायत... मागच्या वर्षी snow fall, skiing हे सगळ enjoy करून देखिल ह्या वर्षी पण snow fall ची वाट बघणं चालू होतच.. आणि हे मी आमच्या ऑफ़िस मधल्या फ़िरंग्यांना सांगितल्यावर त्यांच्या शिव्या पण खाव्या लागल्या.. :) त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सारखे "परप्रांतिय" इथे येउन snow fall व्ह्यायची वाट बघतात आणि मग snow fall झाला की त्रास त्यांना सहन करावा लागतो.. !
Thanks giving ची चाहूल लागली आणि थंडी चांगलीच वाढू लागली.. गाडीवर रोज सकाळी snow flakes दिसू लागले..त्यातच east coast वर बर्यापैकी बर्फ़ पडल्याच्या बातम्याही येऊ लागल्या.. आमचा १९ जणांचा कोलोरॅडो ला जवळ जवळ १५ तास drive करुन जायचा मेगा प्लॅन बनत होता...लोक जास्त चालणारी डोकी ही जास्त त्यामूळे rounds of discussion होऊन ट्रिप final झाली... ह्या ट्रिप मधे overall सगळंच मेगा होतं... डोकी १९, ३ SUVs, १७/१८ तासांचा मोठा drive, रहायला घेतलेली २ मोठी cabins सगळच huge...आधी मी christmas ट्रिप च्या ठरवाठरवीत आणि नंतर परत एकदा शिकागो ला गेल्यामुळॆ, कोलोरॅडो ट्रिप च्या organization मधे मी अजिबातच involve नव्हतो...आणि "तरूण रक्ताला वाव देण्याचा उदात्त हेतू" ही त्या होत..:D अर्थात अर्पणाच्या शिव्या खाव्या लागल्याच त्यामूळे...:)
डेन्वर ला पोहोचता पोहोचता उजाडलं आणि रस्त्यावरून rocky mountains च्या शिखरांचं सुंदर द्रुष्य दिसलं..त्याच्यावर बर्फ़ शिंपडल्यासारख दिसत होतं.. आम्ही west ला drive करत असल्याने सूर्योदय दिसत नव्हता .. पण अचानक मागे लक्ष गेलं आणि एव्हडे सूंदर रंग दिसायला लागले...त्या रंगांचे गाडीतूनच जमतिल तेव्ह्डे फोटो काढले.. पण exit घेउन थांबे पर्यंत ते रंग गायब झाले... Denver ते brekenridge चा drive होता साधारण १५० मैल चाच पण पूर्ण डोंगरा मधून..आणि जसे जसे वर जाऊ तसा बर्फ़ वाढ्त होता...आजूबाजूला द्रुष्य खूप छान दिसत होती पण गाडी चालू असल्याने फोटो निट घेता येत नव्हते...
कोलोरॅडो ट्रिप मधली एक मुख्य activity म्हणजे snow mobilling... snow mobiling च्या track वर अर्थातच पूर्ण बर्फ़ होता आणि एव्हडच काय तिथे तर नजर जाई पर्यंत सगळी कडे बर्फ़ च बर्फ़ होता... सगळी कडे पूर्ण पांढरा रंग..मधे मधे तूरळक हिरवळ.. काही भाग सूर्यप्रकाशात चकाकणारा आणि त्यात धावणार्या आमच्या snow mobils..!!
मधूर snow mobil चालवत असताना मी मागे बसून फोटो काढायाची हौस भागवून घेत होतो... overall ते सगळं इतकं सूंदर होतं की किती ही वेळ पहिलं आणि किती ही फोटो काढले तरी समधान च होतं नव्हतं..
त्यादिवशी रात्री vail नावाच्या गावाला drive करत असताना अचानक snow fall चालू झाला...तो पूर्ण रस्ता नदी काठून होत्ता.. नदी काठून जाणारा drive, चालवायला SUV, बाहेर होत असलेला हलकासा snow fall आणि गाडीत चालू असलेली आशा भासलेंच्या जून्या गाण्यांची CD.. ह्या पेक्षा आधिक ideal condition काय असू शकते...
ह्याच ट्रिप मधे skiing देखिल करायचं होतं.. skiing चे tracks अर्थातच डोंगर उतारावर होते...तिथे जात असताना समोर त्याचं द्रुष्य दिसत होतं.. डोंगरावर भूरभूरलेल्या बर्फ़ात मधे मधे तयार झालेली सपाटी आणि त्यावरून खाली घरंगळणारे काळे लाल ठिपके..आपल्याकडे दिवाळीच्या किल्ल्यांवर बनवण्यासाठी हा एकदम perfect scene आहे. :D
skiing tracks अजस्र्त होते...तिथे registration करत असताना counter वरची मुलगी अगदी काळजीने सांगत होती की गेले ८ दिवस बर्फ़ पडला नाही..आता पडायलाच हवा नाहितर ski resort ला problem होईल.. मला आपल्याकडच्या पावसाची वाट बघणार्या शेतकर्याची आठवण आली..!! skiing करतानाही मनसोक्त बर्फ़ात खेळून झालं...
हा एव्हडा बर्फ़ कमी पडू नये म्हणून का काय तर आम्ही st louis ला परत आल्यवर ४ च दिवसात Ice Rain ची alert यायला लागली...गुरुवारी त्या निमित्ताने ऑफ़िस मधून लवकर सटकताही आलं...:)
पावसाबरोबर बर्फ़ ही पडत होता...हा ना धड snow होता ना गारा होत्या...हवा पण इतकी थंड होती की पडणारं पावसाचं पाणी गोठत होतं... इतकच काय झाडांवरून, घराच्या छ्परावरून घरंगळणारं पाणी पण गोठून जात होतं...हे असच रात्र भर चालू होतं...
दुसर्या दिवशी ऑफ़िस ला जाताना सुमारे तास भर गाडी खणून काढण्यातच गेला...जवळ जवळ १५ मिनिटं तर गाडीची दारच उघडत नव्हती... मला तर handle तुटून हातात येतं का काय अशी भिती वाटत होती... wipers मधेही एतका Ice जमा झाला होता की ते हलत पण नव्हते... आरसे तर संध्याकाळ पर्यंत साफ़ झालेच नाहीत... आधी तास भर गाडी स्वच्छ करणे आणि नंतर तास भर drive करून आमची gang एकदाची ऑफ़िस ला पोचली...बाहेर अजूनही Ice slit आहे..
एकूण काय गेल्या ८/१० दिवसात मिळून आत्तापर्यंत पाहिला त्याच्यापेक्षा हजारपट बर्फ़ पाहून झाला...पहावं तिकडे "Ice Ice Baby" अशीच अवस्था आहे.. ! :)
skip to main |
skip to sidebar
मला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. !
2 प्रतिसाद:
waah.. parat jaun alyasarkhe watle!
फ़ारच छान लिहिला आहेस पराग..keep it up...
Post a Comment