शेजारी

आज अचानक बर्याच दिवसांनी आमच्या शेजार्याचं दर्शन झालं. तो कधितरी बाहेर बसून चित्र काढत असतो तेव्हा hi hello होतं. पण बाकी काही नाही. एकूण तो जरा अत्रंगीच वाटतो. एकटाच असतो. कधिकधि मूली येतात रात्री (दरवेळी वेगळ्या).
आम्ही वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेजारी रहात असूनही आम्हाला एकमेकांची नावं पण माहीत नाहीत. हाच तर फ़रक आहे भारतात आणि अमेरीकेत.
मला अचानक डोंबिवली ला रहाणार्या आमच्या शेजार्यांची आठवण झाली. तिथे एका मजल्यावर आम्ही ३ कुटूंब अनेक वर्ष एकत्र राहीलो. बाकी २ घरात बरेच लोक बदलले. आमची building होण्याआधी सगळे त्याच गल्लीत वेगवेगळ्या वाड्यांमधे रहात होते. त्यामुळे परिचय आता जवळजवळ २५/३० वर्षांचा आहे. आमच्या अगदी दाराला लागून दार असलेल्या घरात दातार काका आणि माधूरी काकू रहात. ते पूर्ण जगाचे काका काकू. मला आठवतं तेव्हा पासून आमचे शेजारी तेच. माझ्या मोठ्या भावा पासून ते त्याच्या मुलापर्यंतची आसपासची मधली सगळी मुलं काकूच्या मांडीवर खेळली. आणि प्रत्येकाने काकूची साडी एकदातरी खराब केलीच आहे. काकू म्हणायची पण की मोठं झाल्यावर प्रत्येकाकडून एक साडी घेणार आहे. :) त्यांच्या घरात झोपाळा होता त्यामूळे सगळ्या मुलांना त्याचं पण आकर्षण असायचं. लहान मुलं काकू कडे रमत असतं. खाऊ च्या बाबतित लाड पण होतं कारण घरात लाडू, वड्या, चिवडा ह्यापैकी काहितरी नेहमीच केलेलं असे. लाडं होतं असले तरी फ़ाजिल लाड मात्र कधिही होत नसतं. उलट उत्तर देणं, हावरट पणा करणं, आचरटपणा आणि मस्ती करणं ह्यापैकी काही केलं की मात्र चांगला ओरडा मिळतं असे आणि त्या मुलाची घरी रवानगी केली जात असे. अश्या ओरडयाच्या वेळी मग कोणाची आई पण काही बोलत नसे आणि मधे पडत नसे.
कधिकधि काकू क्लास मधे शिकवायला जायची किंवा मग घरीच शिकवणी घ्यायची. बाकी चा वेळ घरीच असे. माझी आजी देखिल घरीच असल्याने त्या दोघिंचं चांगलं जमत असे. त्यांच्या पाकक्रूती च्या शिकवण्या चालतं. मघ कधिकधि कुठल्यातरी वड्यांचा प्रयोग बिघडला की हमखास दुपारी "बघा हो आजी जरा..ह्या वड्यांचा भसका होतोयं." असं म्हणून आमच्या आजीला बोलावणं येई. त्या दोघिंचं rework करुन झालं की अर्थातच वाटी आमच्याकडे ही येई. मी आणि माझा भाऊ दोघेही दिवसभर आजी जवळ असायचो त्यामुळे आजी काय करत्ये हे ओट्यापाशी उभं राहून बघताना स्वैपाकातले फ़ंडे आम्हीही ऐकत असू आणि मग काकू नी काही नविन पदार्थ केला आणि तो बिघडला की आम्हीही बिनधास्तपणे "तुझ्या चिरोट्यांमधे मोहन कमी झालयं " वगैरे काहितरी hi-fi dialouge मारत असू. :)(मग त्या चिरोट्यांमधे मोहन असो अथवा नसो. आणि मुळात मोहन म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही.)
कधि काकूचा भाऊ आला की आसपासच्या झाडांवरच्या कैर्या, जांभळं काढण्याचा कार्यक्रम होत असे आणि त्यालाही काकू चा सक्रीय पाठिंबा असे. क्रिकेट्ची match ही माझी आजी आणि काकू मिळून बघत.. म्हणजे दोघी आपपल्या घरी पण काही घडलं की दार उघडून एकमेकींना सांगणारं की हा आउट झाला, त्याची century झाली etc. सास बहू serials त्यावेळी नसल्याने दोघिंनाही cricket मधे interset होता.
माझ्या आजी ला आणि काकूला दुखणिही अगदी सारखिच होतं. दोघिंनाही थंडीचा त्रास होतं असे आणि दोघिंनाही आयुर्वेदिक औषधं घ्यायची भारी हौस त्यामुळे स्वैपाकाच्या प्रयोगांबरोबर दोघिंचेही वेगवेगळे वैद्य try करणंही चालू असे. आणि कसले कसले लेप, काढे, मात्रा वगैरेंवर चर्चा चालू असत. काका दोघिंनाही खूप चिडवायचे की आजी ७० वर्षांच्या आणि ही ४५ वर्षांची तरीही औषधं मात्र दोघिंची सारखिच. :)
काकूच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या की त्या आणि माझी आजी दुपारी पत्ते खेळतं असतं. कधि आजी गेली नाही की काकू तिला मुद्दामचं बोलावून घेत असे आणि म्हणे "तुम्ही रोज येत जा पत्ते खेळायला.. त्या तेव्हड्याच जरा busy रहतातं." ;)
आमचा मजला सोडला तर आमच्या तिनही कुटूंबांचं इतर कोणाकडे विषेश येणंजाणं होत नसे. तसच काकू स्वतःचा आवडी निवडीं बद्दल ही अगदी ठाम त्यामुळे कोणी काही बोललं की "आम्हाला असच आवडतं" असं म्हणून त्यांची बोळवण होत असे. आणि त्यामुळे दातार family शिष्ठ म्हणून famous. :) जेव्हा काकांनी नविन गाडी घेतली तेव्हा कौतूक बाजूलाच पण वर "दातारीण आधिच शिष्ठ त्यात गाडी घेतली आतातर काय बघायलाच नको. " :D अश्या comments पण ऐकायला मिळाल्या. आणि ह्या comments काकूनेच कुठूनतरी ऐकल्या आणि आम्हाला सांगितल्या.
काका काकू गप्पा मारायला एकदम jolly. आणि किस्से रंगवून सांगण्यात expert. आणि मुख्य म्हणजे कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं ह्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे माझ्या आजी पासून ते माझ्या ४ वर्षांच्या पुतण्या पर्यंत कोणाशीही समोरच्याला bore नं करता बोलू शकतातं. आम्ही पुण्याला रहायला गेल्यावर पण बरेचदा आम्हाला आठवण यायची की आत्ता शेजारी काकू असती तर पट्कन ५/१० मि. timepass करून आलो असतो. अधिक सहावासामुळे अर्थातच माझ्यापेक्षा माझ्या भावावर काका काकूंचा अधिक जिव आहे आणि मग बोलतानाही पट्कन "अमितचे बाबा ,अमितची आजी" असे उल्लेख येतं आणि मग लहानपणी मी पण लगेच "अमितचे बाबा नाही माझे बाबा" असं correction करत असे. :)
मधे आजीची तब्येत खराब झाल्याचं ऐकून काका काकू लगेच पुण्याला येऊन गेले. त्यांचाशी गप्पा झाल्यावर आजीलाही जरा बरं वाटलं. कधिकधि नात्यांपेक्षा सहवासाचे ऋणानुबंध अधिक घट्टं असतात हेच खरं. मी पण आता भारतात जाइन तेव्हा डोंबिवली ला काका काकूं च्या घरी जाइन आणि काकू ला तिची special साबुदाण्याची खिचडी करायला सांगेन आणि हो मुख्य म्हणजे त्यांचाशी भरपूर गप्पा मारेन. :)

5 प्रतिसाद:

Nandan said...

लेख आवडला. By the way, मोहन म्हणजे (बहुतेक) पदार्थ खुसखुशीत करण्यासाठी पिठात घातलेले गरम तेल. उदा. भजीच्या पिठात.

Manjiri said...

छान लिहलंय! सख्खे शेजारी असतातच मायेचे आणि हक्काचे!

Anonymous said...

Ghari jayche vedh lagle watata!
:)
Kewl (Keval navhe) blog!
:D

Pal said...

Neat blog! Vachun gharachi ani aamchya shejaryanchi aathvan jhali. :) Ithe tase shejari milnyachi kalpana dekhil karta yet nahi.

Anonymous said...

atta indiat pan shejari milana mhanje historych zali mhanayachi. life busy zalay tithepan ani nasel zala tari punyasarkhya thikani lok far kami boltat ekmekanshi mumbait tari thik ahe.