
मागच्या आठवड्यात मी माझ्या भावा बरोबर पुन्हा एकदा शिकागो वारी केली... गेल्या वर्षभरातील ही माझी ६ वी शिकागो ट्रिप.. st louis (stl) आणि शिकागो म्हणजे अगदी मुंबई पुण्यासारखं.. म्हणजे मुंबई किंवा पुण्याशी दोन्ही शहरांचं काही साम्य नाही पण येण्याजाण्याच्या द्रुष्टीने अगदी सारखच.. म्हणजे माझा जो मित्र भारतात असताना दर week end ला मुंबई पुणे ये जा करायचा तोच आता stl शिकागो ये जा करतो..
तर हे शिकागो साधारण २५० वर्ष जुनं.. शिकागो नदी च्या परीसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्या वासावरुन नदी ला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण)असं नाव दिलं.. पुढे त्या नदी काठी वसलेल्या शहराचं नाव देखिल तेचं पडलं... पुढे त्याचा अपभ्रंश होत आज प्रचलित असलेलं शिकागो असं नाव झालं.. भौगोलिक द्रुष्टिने अतिशय सोयिच्या ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या पूर्व पश्चिम व्यापार आणि द्ळणवळण शिकागो मार्गे मोठ्या प्रमाणावर चालत असे.. जवळच असलेल्या मिशिगन लेक मुळे पाण्याचा मुबलक साठा होता...त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कारखाने आणि उद्योग वाढले... ह्या सगळ्या कारखान्यामधून येणारं प्रदुषित पाणि पुन्हा लेक मधेच सोडल्याने लेक चं आणि शिकागो नदीच्या पाण्याचं बेसुमार प्रदुषण झालं... ह्यावर पुढे आनेक प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवले जात असे.. शिकागो नदी चे पाणी अजुनही direct पिण्यासाठी वापरत नाहीत.. एव्हडच काय तर ते पोहण्यायोग्य पण नाहिये...दरम्यान शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा जो downtown area आहे तो वसण्यास सुरवात झाली.. उंचच उंच इमारती आणि offices ह्यानी हा परिसर गजबजू लागला... मात्र १८७१ मधे लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला... "The great chicago fire" नावाने ओळखल्या जाणार्या ह्या आगीची व्याप्ती एव्हडी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबी आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला.. त्यावेळेला असलेल्या सोईंच्या अभावमुळे आगीची माहिती fire brigade ला सुमारे ४० मिनीटांनंतर समजली... नदीच्या पाण्यावर प्रदुषणामुळॆ तयार झालेल्या ग्रीस सारख्या जाड थरामुळे ही आग नदी मार्गे ही पसरली... त्यावेळेला कोणी कल्पनाही केली नसेल की एव्ह्ड्या भिषण आगी नंतर हे शहर पुन्हा उभं राहीलं.. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणण होतं की झालं ते चांगलच झालं शहर बांधताना आधी ज्या चूका झाल्या त्या सुधारायची संधी मिळाली..हवामानाच्या द्रुष्टीने शिकागो वाईटच.. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही एकदम भिषण... आपल्याला उन्हाळ्याची तशी सवय असते प्ण थंडीत नको होते..एकतर कधिही पडणारं बर्फ़ आणि बोचरं वारं.. एकदा बर्फ़ पडला की तो थंडी संपेपर्यंत वितळतच नाही..Ice skating, sking सारखे खेळ खेळायला मिळतात पण ते एखाद दिवस बरं वाटत.. लेक मिशीगन पण थंडीत गोठतो...
शिकागोच्या उपनगरांमधे राहाण्याच्या खूप जागा आहेत... अठरा पगड जातिंचे लोक शिकागोत रहातात.. आफ़्रिकन अमेरीकन पण खूप आहेत.. New York आणि washington ला पोलिस बंदोबस्त खूप कडक झाल्यापासून शिकागो आणि LA ही देखिल मह्त्त्वाची गुन्हेगारी केंद्र बनली आहेत...तशिही प्रत्येक बाबतित new york आणि शिकागॊ ची एकमेकांशी स्पर्धा चालू असते..आणि एकमेकांवर jokes करण सुद्धा.. आपल्याकडे जसं मुंबई पूणे चालू असत तसं.. :) (पण काहिही म्हंटलं तरी मुंबई ती मुंबईच तसच new york ते new york च त्याला कासलिही तोड नाही.. !!) New york ला गेल्यावर खूप homely वाटतं.. कारण मुंबई ची खूप आठवण येते.. शिकागो ला तसं होतं नाही त्यामूळे नविन काहितरी बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद मिळतो.. शिकागो down town म्हणजे एकदम happening जागा... इतर शहरांप्रमाणेच इथेही cruise tour मधून sky line चं दर्शन घेता येतं.. संध्याकाळी सूर्यास्त होता होता जर ही cruise tour घेतली तर खरोखरच डोळ्यांचं पारण फ़िटतं..
शिवाय शिकागो नदी मधून जाणारी architechtural tour पण खूप सूंदर आहे... पूर्वी लेक मिशिगन वर US Nevy चं प्रशिक्षण केंद्र (Nevy Pier) होतं... पण पुढे ते बंद करुन त्याचा tourist spot केला गेला... लेक मिशिगन आकाराने प्रचंड असून फ़क्त पाणी गोड असल्याने त्याला लेक म्हण्तात.. नाहितर समुद्र म्हणायचाच लायकीचा...Nevy Pier वर खूप दूकानं आणि खाण्याच्या जागा आहेत.. आणि फोटो काढ्ण्यासाठी खूप spots पण आहेत...चविने खाणार्यांना शिकागो downtown मधे खूप गोष्टी मिळतात...
एका हातात Ben and Jeery किंवा Hagen Dajz चं Ice cream आणि दुसर्या हातात camera सावरत संध्याकाळी cruise ride घेणं किंवा Nevy Pier वर भटकणं... म्हणजे आहाहा.. !! (ही माझ्या सूख म्हणजे नक्की काय असतं.. ह्या blog मधिल एक entry होऊ शकेल.. :)
Sears Tower आणि John honcock ह्या downtown मधल्या २ उंच इमारती.. पैकी sears tower ही सध्याची अमेरीकेतली सग्ळ्यात उंच इमारत आहे... John Hancock च्या ९६ व्या मजल्यावर एक restaurant आहे जे cocktails साठी प्रसिदध आहे.. पण आमच्या पैकी कोणीच पिणारं नसल्याने आम्ही तिथे जाउन फ़क्त फोटो काढून परत आलो होतो.. :)
शिकागो downtown चं रुप मला प्रत्येक ऋतू मधे वेगळं वाटलं.. summeer मधे ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं, fall मधे खेळून दमलेल्या पण तरीही अजून ही खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं असतं पण थंडीची चाहूल लागलेलं असते, भर winter मधे गेलात तर ते थंडीनी पिचून गेलेलं असतं त्यामूळे जरा थकल्यासारखं वाटतं chritsmas चा उत्साह जरी असला तरी तो typical US downtown मधला वाटत नाही, शिष्ठ ब्रिटन ची आठवण होते :), तर spring मधे परत एकदा उन्हाळ्याच्या तयारी ला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी सणासुदीच्या आधिचा काळ वाटतो... chistmas ला अतिशय सुंदर decorations असतात पण तेव्हा थंडी इतकी जास्त होती की फोटो काढताना हात थरथरून मी काढलेले सगळे फोटो हलले.. :(
शिकागो चं O'hare Internation airport म्हणजे US मधलं एक अतिश्य महत्त्वाचं आणि busy airpport.. पण हे "अतिसामान्य" ह्या दर्जात मोडणारं..शिकागो मधे काही बदल करायचा plan असेल तर त्यांनी तो airport सुधारला पाहिजे..
शिकागो मधे अजून एक "बघण्यासारखी" गोष्ट म्हणजे devon street..अगदी लक्ष्मी रोड ची आठवण होते. कसाही traffic, लेन न पाळणं, रस्त्यात कुठेही थांबून राहाणं.. एकदम मस्त वाटतं.. आणि तिथे सगळी Indian दुकानं आहेत खाण्यापासून दागिन्यांपर्यंत सगळं मिळतं.. पटेल लोकांची अगदी रेलचेल आहे.. :)
आपणा भारतियांना अभिमान वाटावा अशी शिकागो मधली एक गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदाचं ऐतिहासिक भाषण झालं ते सभाग्रूह..६ वेळा जाऊन अजूनही मी ते पाहिलेलं नाही.. :(
चला..निदान ते पहाण्याच्या निमित्ताने परत एकदा जायलाच लागणार.. :)
पूर्ण झालेला blog वाचून पाहिल्यावर तो जरा विस्कळित झालाय असं वाटतयं..जाऊ दे आत्ता तो repair करत बसायचा patience नाही.. पुढच्या वेळी जरा बरा लिहायचा प्रयत्न करेन.. !!